Home » मंगळागौर पूजेचे महत्व, विधी आणि कथा

मंगळागौर पूजेचे महत्व, विधी आणि कथा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mangala Gauri Vrat
Share

प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी तिचे सौभाग्य हे खूपच महत्वाचे असते. आपल्याकडे प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या परंपरेनुसार, चालीरीतींनुसार अखंड सौभाग्य राहण्यासाठी संसार सुखी होण्यासाठी काही व्रत, उपवास केले जातात. त्या त्या ठराविक दिवशी हे व्रत केले जातात. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांचे सौभाग्य टिकावे, प्रेम वाढावे आदी गोष्टींसाठी काही व्रत केले जातात. यात वटपौर्णिमा तर आहेच सोबतच अजून एक व्रत केले जाते आणि ते म्हणजे मंगळागौर.

हिंदू लोकांसाठी श्रावण महिना खूपच पवित्र आणि धार्मिक मानला जातो. हा महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. जवळपास रोजच या महिन्यात सण साजरे केले जातात. उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना असलेल्या या श्रावणात आठवड्यातील सातही वारांना महत्व आहेत. या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. श्रावण महिना नवीन लग्न झालेल्या महिलांसाठी देखील खूपच खास असतो. श्रावण महिन्यात या नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचे व्रत करतात.

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी या मंगळागौरीचे व्रत केले जाते. सकाळी स्नान केल्यानंतर शुचिर्भूत होऊन सोवळे नेसून ही पूजा केला जाते. विघ्नहर्ता गणेशाची पूजा करून या पूजेची सुरुवात होते. सोबतच अन्नपूर्णेची, शंकराची अर्थात शिवपिंडीची पूजा या मंगळागौरीच्या पूजेत केली जाते. मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचे आवाहन केले जाते. सोनाराच्या दुकानात चांदी, सोन्याची मंगळागौर देखील मिळते.

या मंगळागौर देवीला अनेक प्रकारची पत्री, फुले वाहिली जातात. मंगळागौरीची कहाणी वाचली जाते. नंतर शेवट पुरणाचा महानैवेद्य अर्पण केला जारो. या मंगळागौरीची आरती 16 दिव्यांनी केली जाते. मंगळागौरीच्या पूजेसाठी पाच नवविवाहित महिलांना बोलावले जाते. त्यांना भोजन, हळदी-कुंकू द्यावे. संध्याकाळी आरती करत. रात्रभर जागरण करावे. या जागरणात सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत, गाणी गात मंगळागौर जागवतात. सलग 5 वर्षे हे व्रत करावं. सर्व पूजा संपन्न झाल्यावर जेवणाच्या आधी मंगळागौरीची कथा वाचली जाते. कथा वाचल्यानंतरच हे व्रत पूर्ण होते, अशी मान्यता आहे.

Mangala Gauri Vrat

मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ

मंगळागौरीच्या वेळी अनेक खेळ खेळले जातात. जसे की, वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा – इत्यादी प्रकारचे खेळ यात खेळले जातात.

मंगळागौर पूजा उद्यापन

सकाळी उठल्यावर स्नान करून दहीभाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात. यानंतर विहीर, तळे, नदी यांपैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात. सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या शिव मंगळागौरी पूजन, १०८ बिल्वअर्चन, सौभाग्यवर्धक १०८ कुंकुमार्चन, रुद्राभिषेक, पुंज आणि हवन असा हा संपुर्ण विधी असतो. या मंगळागौरीच्या दिवशी वाण देण्याची देखील प्रथा आहे. ज्या ठिकाणी होमहवन करतात त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. हे वाण आई वडिलांना द्यायचे असते. आई वडील जर नसतील तर भाऊ भावजय यांना हे वाण देऊन उद्यापन केल्या जाते.

मंगळागौर कथा

एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगि‍तली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल.

अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही. असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उ:शाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल, असं बोलून बोवा चालता झाला.

तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्ती आहे. त्याने मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली, घरदारं आहेत, गुरंढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे. तुला पुत्र देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे! त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं सांगितलं. माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मांगे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. देवी अदृश्य झाली.

वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, घरी नेण्याकरीता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो मोटेत आंबा एकच आहे. असं चारपाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला.

काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं, तिथं काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकीचं भांडण लागलं, एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे! हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं. हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचाईत पडली.

Mangala Gauri Vrat

काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं, तिथं काही मुली खेळत होत्या, त्यात एकमेकीचं भांडण लागलं, एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे! हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं. हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचाईत पडली.

दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी यांजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची आंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले.
======

हे देखील वाचा : श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागील वैज्ञानिक कारण माहितेय?

======
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आर्शीवाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं, यमदूत पळून गेले, गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा! तो म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितलं. यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नवर्‍यानं आंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला.

भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा! सासरमाहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र जाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं, मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.