आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर आपल्याला जाणवेल की, आपण दैनंदिन जीवनात ज्या छोट्या छोट्या गोष्टी करत असतो, त्या सर्व गोष्टींचा कुठे ना कुठे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. किंवा त्या गोष्टींचा वापर आपल्या आयुष्यासाठी फायदेशीर ठरतो. आपण सर्वच भात खातोच. भात करताना नेहमीच आपण तांदूळ धुऊन घेतो आणि ते पाणी फेकून देतो. मात्र तुम्हाला माहित आहे का हे तांदूळ धुतलेले पाणी आपल्या शरीराच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. ऐकून नवल वाटले ना…?
या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक आहेत; जे त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
आपण तांदूळ धुतलेले पाणी घाण पाणी म्हणून फेकून देतो. मात्र या पाण्याचे अतिशय चांगले आणि फायदेशीर असते. आता तुम्ही म्हणाल या घाणेरड्या पाण्याचे कोणते असे फायदे होणार आहे. तांदूळ धुतलेल्या पाण्यात अनेक खनिजे असतात. याव्यतिरिक्त, त्यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. जर तुम्हाला हे माहित असेल तर तुम्ही हे पाणी कधीही फेकणार नाही. चला जाणून घेऊया या तांदूळ धुतलेल्या पाण्याचे फायदे.
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी
तांदळाचे पाणी त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. सर्व प्रथम, कमी पीएच साबणाने चेहरा धुवा, नंतर तांदळाच्या पाण्यात कापसाचा गोळा भिजवून चेहऱ्यावर लावा. असे ५ मिनिटे करा. तांदळाच्या पाण्यात असलेले पोषक घटक चेहऱ्यावरील छिद्र कमी करतात आणि त्वचा मुलायम, चमकदार बनवतात.
वनस्पतींसाठी खत
तांदळाचे पाणी वनस्पतींसाठी उत्कृष्ट खत म्हणून देखील काम करते. तांदूळ धुतल्यानंतर त्याचे पाणी घरातील आणि बाहेरच्या झाडांमध्ये घाला. काही दिवसातच झाडे मजबूत आणि निरोगी दिसू लागतील.
कोरड्या त्वचेसाठी
कोरड्या त्वचेचा त्रास होत असल्यास तांदळाच्या पाण्याने आंघोळ करा आणि फरक जाणवेल. अर्ध्या बादली पाण्यात तांदळाचे पाणी मिसळा आणि १० मिनिटे सोडा. त्यानंतर त्यासोबत आंघोळ करावी. यामध्ये असलेल्या स्टार्चमुळे त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते आणि कोरडेपणा कमी होतो.
स्वच्छतेस मदत
तांदळाचे पाणी सौम्य क्लिंजर म्हणूनही काम करते. गॅस काउंटरटॉप्स, सिंक आणि डाग साफ करण्यासाठी याचा वापर करा. हे पाणी कोणतेही हट्टी डाग काढून टाकू शकते.
तेलकट त्वचेसाठी
ज्यांच्या चेहऱ्याची त्वचा अतिशय तेलकट आहे. त्यांच्यासाठी तांदळाचे पाणी हे खूप फायदेशीर आहे. हे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेला चमक येते आणि हलकी पांढरी होते.
रोपांच्या वाढीसाठी
तांदूळ धुण्याच्या पाण्यात व्हिटॅमिन बी असतात. हे रोपांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी चांगले आहे. त्यात स्टार्च असतात. हे स्टार्च केवळ रोपांच्या वाढीसाठी उपयोगी नसतात तर जमिनीतील बुसशीच्या वाढीस मदत करतात.
कोरड्या त्वचेसाठी
हिवाळ्यात त्वचा लवकर कोरडी होते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी ते तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. तसेच चेहऱ्यावर लालसरपणा आणण्यासाठी देखील मदत करतात.
चमकदार त्वचेसाठी
त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी खूप प्रभावी मानले जाते. या पाण्यात अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट व अँटी-एजिंग गुणधर्म आहेत; जे त्वचेचे संरक्षण करून त्वचा मुलायम करण्यास मदत करते. त्याशिवाय तांदळाचे पाणी त्वचेवरील सुरकुत्या आणि रेषा कमी करून शरीर हायड्रेट ठेवण्यासही मदत करू शकते. कारण- त्यात स्टार्च असते; जे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. एटोपिक एक्झिमा असलेल्या लोकांसाठी हे प्रभावी मानले जाते.
केसांच्या सौंदर्यासाठी
तांदळाच्या पाण्यात प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात; ज्यामुळे केसांची गुणवत्ता आणि वाढ यामध्ये सुधारणा करते. केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा कंडिशनर म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्याशिवाय केसातील कोंडा कमी करण्यासाठीही तांदळाचे पाणी फायदेशीर मानले जाते.