भारतीय लोकांचं रोजचे जेवण हे डाळीशिवाय अपूर्ण आहे. रोज ताटात वरण, भात हा अनेकांना लागतो म्हणजे लागतोच. वरण किंवा आमटीशिवाय जेवण हे नेहमीच अर्धवट वाटते. वरण हा पदार्थ डाळींपासून बनवला जातो, शिवाय काही आमट्यांमध्ये देखील डाळी वापरल्या जातात. आपण डाळी मोठ्या प्रमाणावर खातो. विविध डाळींचा वापर करून आमट्या बनवणे, भाज्यांना पर्याय म्हणून डाळ खाणे हे खूपच सामान्य आहे. भारतीयांच्या घरात पाहिले तर बहुतकरून सर्वात जास्त वापरली जाणारी डाळ म्हणजे ‘तूर डाळ’.
तूर डाळ जवळपास प्रत्येक व्यक्तीचीच आवडती डाळ आहे. खायला अतिशय चविष्ट असणारी ही डाळ अनेक चांगल्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. मात्र असे असूनही तूर डाळ खाल्ल्याने बरेच त्रास होतात. अनेकांना ही डाळ पचत नाही. प्रथिने, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, सोडियम, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम यांसारखी अनेक पोषक तत्वे तूर डाळमध्ये असतात. हे सर्व आपल्या आरोग्या लाभदायक आहेत. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही, काही लोकांनी तूर डाळ खाणे टाळले पाहिजे.
जास्त प्रमाणात तूर डाळ खाल्ल्याने देखील शरीराला अनेक प्रकारचा धोका असतो. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनी आणि यकृतासह शरीराच्या अनेक अवयवांना नियमितपणे नुकसान होते. तूर डाळचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी हानिकारक असून, याचे सेवन केल्यास त्यांना फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
तूर डाळ खाण्याचे तोटे
गॅस, अॅसिडिटी
ज्यांना गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या आहेत, त्याची ही समस्या तूर डाळ आणखी वाढवू शकते. तूर डाळ पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे पोटदुखी, आंबट ढेकर येणे आणि गॅस तयार होणे असे त्रास होऊ शकतो.
किडनीचे रुग्ण
ज्यांना किडनीचा आजार आहे त्यांनी तूर डाळ खाणे टाळावे. तूर डाळीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्यामुळे किडनीच्या रुग्णांच्या समस्या आणखी वाढू शकतात. एवढेच नाही तर या डाळीचे अतिसेवन केल्याने पोटात स्टोनची समस्या देखील होऊ शकते.
मूळव्याधचे रुग्ण
मुळव्याधची समस्या असेल तर तूर डाळ खाणे टाळावे. तूर डाळमधील प्रथिने पचणे पचनसंस्थेला खूप कठीण जाते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो आणि पोट साफ करण्यासाठी जास्त दाब द्यावा लागतो. त्यामुळे मूळव्याधची समस्या वाढते आणि सूज, रक्तस्त्राव यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.
यूरिक अॅसिड
ज्या लोकांना आधीच युरिक अॅसिडचा त्रास आहे त्यांनी तूर डाळीचे सेवन करू नये. तूर डाळमधील प्रथिनांच्या मुबलक प्रमाणामुळे शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे व्यक्तीला हातपाय दुखणे आणि सांध्यांना सूज येऊ शकते.
एलर्जी
जर तुम्हाला तूर डाळीची एलर्जी असेल तर चुकूनही ही डाळ खास करून रात्री खाऊ नका. रात्री तूर डाळ खाल्ल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतात. तूर डाळीमधील प्रथिने, लोह आणि पोटॅशियम हे पोषक तत्व सहजासहजी पचत नाहीत.
लठ्ठपणा
तुरीच्या डाळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि तूर डाळ खात असाल, तर तुमचे वजन नियंत्रित ठेवण्याऐवजी ते अधिक वाढू शकते. अति कॅलरी आणि प्रथिने खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते.
रक्तातील साखर वाढते
तूर डाळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमची साखरेची पातळी वाढू शकते. वास्तविक, तुरीच्या डाळीमध्ये उच्च ग्लायसेमिक निर्देशांक असतो. जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्याला धोका वाढू शकतो.
(टीप : या लेखात देण्यात आलेली माहिती सामान्य माचीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)