सध्या सूर्य तापल्यासारखे वातावरण आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यातून ज्यांना घराबाहेर पडून काम करत रहावे लागत आहे, त्यांना तर खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यात उन्हाळ्यात भूक कमी लागते आणि सतत पाणी प्यावे लागते. यामुळे भूक लागत नाही. परिणामी थकवा येतो. त्यातच उन्हाच्या झळांनी घामही खूप येतो. त्यामुळे शरीरातील पाणी बरेच बाहेर फेकले जाते. पण ब-याच वेळा नुसते पाणी पिऊन भागत नाही. उन्हात गेल्यावर अनेकांना चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर थकवा जाणवतो. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्यात आहाराचे बंधन पाळणे गरजेचे असते. उन्हाच्या झळांनी अन्न खायची इच्छा नसली तरी पाण्याच्या रुपात अन्न आणि पोषक मुल्य पोटात जाण्याची गरज असते. अशावेळी नारळाचे पाणी, लिंबू पाणी आणि ताक हे मदतीला येतात. याबरोबरच मोसमी फळही आहारात समाविष्ट केली तर उन्हापासून होणारा त्रास कमी होतो. शिवाय वेगवेगळ्या प्रकारची सूप ही घेतल्यास त्याचा फायदा होतो. उन्हाळ्यात पोटाला थंड ठेवायचे असेल तर या काही सुपरफूडचा समावेश करावा लागतो.(Health Tips)
उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा फटका आता सर्वानाच बसत आहे. आरोग्याच्या समस्या त्यामुळे वाढत आहे. या वातावरणात शरीर थंड ठेवण्यासाठी फ्रिजमधील पाणी प्यायल्यास किंवा बर्फाचा वापर केल्यास त्याचा उलटा त्रास होतो. अशावेळी फळं आणि सरबत यापासूनही शरीराचे गरमीपासून संरक्षण करता येते. या वाढत्या उष्णतेमध्ये शरीर थंड ठेवायचे असेल तर आपल्या आहारात हंगामी फळे, भाज्या आणि दही यांचा समावेश करावा लागेल. (Health Tips)
आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या जबरदस्त झळा लागू लागल्या आहेत. अजून मे महिना बाकी आहे, त्यामुळे या उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी योग्य आहारही महत्त्वाचा ठरतो. अशा हवामानात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात सतत पाणी प्यावेसे वाटते. तसेच तळलेले पदार्थ खाल्ले तरी त्याचा त्रास होतो आणि भूक मंदावल्याचा अनुभव येतो. पण या उन्हाळ्यात काही असे पदार्थ आहेत, ज्यांचा उल्लेख सूपरफूड म्हणून करण्यात येतो. हा आहार घेतल्यास उन्हाळाही सुकर होतो. हा आहार नेमका कुठला हे पाहूया. (Health Tips)
हंगामी फळे ही उन्हाळ्यात एका औषधासारखी उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात येणा-या या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. कलिंगड, द्राक्षे, संत्री, खरबूज यासारखी फळे या ऋतूमध्ये आवर्जून खावीत. यामुळे पोट थंड रहाते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत रहाण्यास मदत होते. कलिंगडामध्ये 90 टक्के पाण्याचे प्रमाण आहे, त्यामुळे कलिंगड या उन्हाळ्यात अधिक फायदेशीर ठरते. याशिवाय उन्हाळ्यात कोथिंबीर ही अतिशय उपयोगी पडते. कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यावर पोटाला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात कोशिंबीर भरपूर खाल्ली तरीही पाण्याचे आणि अन्नाचे प्रमाण भरुन निघते. काकडी, कोथिंबीर आणि दही यांची कोशिंबीर खाल्यास त्याचा फायदा होतो. यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. काकडीमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पोटाला आराम मिळतो. काकडी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. त्यात पाण्याचे प्रमाणही अधिक असते. दुसरीकडे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, तांबे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात. त्यामुळे पोटात होणारी जळजळ थांबते. आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. (Health Tips)
=======
हे देखील वाचा : Mouth Cancer: सिगरेट किंवा गुटखा नव्हे तर ‘या’ कारणांमुळे सुद्धा होऊ शकतो
=======
उन्हाळ्यात नारळाचे पाणी हे मोठे वरदान ठरते. नारळाच्या पाण्यामुळे शरीर थंड रहाते, जळजळ थांबते आणि उष्माघातापासून संरक्षण मिळते. याशिवाय दह्याचाही आहारात समावेश असावा. दह्यामुळे पचनक्रीया सुधारते. दह्याची लस्सी किंवा ताक घेतले तरी त्याचा मोठा फायदा या उष्मामध्ये होतो. विशेषतः ताकामुळे शरीराला जास्त फायदा होतो. ताकामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्टताही कमी होते. जेवणासोबत ताक नियमितपणे प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पोटाचे आरोग्य चांगले राहते. ताक प्यायल्याने अन्न लवकर पचते. ताकामध्ये कार्बोहायड्रेट्स, अनेक जीवनसत्त्वे, प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, चांगले बॅक्टेरिया, लॅक्टिक अॅसिड, कॅल्शियम आदी असतात. त्याचा आरोग्याला फायदा होतो. ताक प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. उन्हाळ्यात जेवणात पुदिन्याची चटणी नक्कीच असावी. त्यामुळे पोट थंड ठेवण्यास मदत होते. मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर ही पुदिन्याची चटणी मदत करते.
सई बने