Home » Hair Care जाणून घ्या केसांना मेहेंदी लावण्याचे फायदे

Hair Care जाणून घ्या केसांना मेहेंदी लावण्याचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hair Care
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्यकडे, शरीराकडे लक्ष्य द्यायला विसरतो किंवा आपल्याला तेवढा वेळच मिळत नाही. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण खूप कमी वयातच अनेक व्याधींना किंवा समस्यांना बळी पडतो. याला आजची तरुण पिढी देखील अपवाद नाही. (Beauty Tips)

या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त समस्या असतील तर त्या केसांच्या. अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, कोरडे रुक्ष केस, केसांमध्ये कोंडा होणे, त्यांची वाढ खुंटणे आदी अनेक समस्या निर्माण होतात. यावर आपण पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारच्या केमिकल युक्त खर्चिक ट्रीटमेंट घेतो. मात्र याचा काही काळ परिणाम जरी दिसत असला तरी त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. (Hair Care)

केसांच्या मुख्य समस्या ज्यात केस पांढरे होणे, रुक्ष आणि कोरडे केस, केसांमधील कोंडा यावर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे केसांना मेहेंदी लावणे. अनेक स्त्रिया आणि पुरुष देखील केसांना मेहेंदी लावतात. अनेक लोकं मेहेंदी लावण्यापेक्षा केसांना कलर करणे योग्य समजतात. पण तुम्हाला माहित आहे का केसांना मेहेंदी लावण्याचे अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया या फायद्यांबद्दल. (Applying Mehndi To Hair)

Hair Care

– केसांना मेंदी लावल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. मेहंदी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, ज्यामुळे तुमचे केस मऊ बनतातच पण केसांची वाढही होते. (Marathi News)
.
– केसांना मेहेंदी लावतात त्यामध्ये दही, आवळा पावडर, मेथी पावडर मिसळून ही मेहेंदी केसांना लावली तर केस काळे, दाट आणि चमकदार होतात. (Beauty and Hair Care)

– मेहेंदी भिजवताना त्यात लिंबाचा रस मिक्स करा. लिंबाचा रस आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर असतो. मेंहदीमध्ये लिंबाचा रस मिक्स केल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते.

– मेंदीमध्ये बदामाचे तेल घातल्याने मेंदीचे पोषण मूल्य दुप्पट होते. बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई चे गुणधर्म डोक्याच्या त्वचेच्या रक्ताभिसरणात सुधारणा करून केस मजबूत, रेशमी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.

– केस लांब आणि दाट करायचे असतील तर मेंदीमध्ये चहाच्या पानांचे पाणी मिसळा, रात्रभर भिजवा आणि सकाळी लावा. ते आठवड्यातून एकदा वापरले जाऊ शकते.असं केल्याने केस मऊ आणि दाट होतात.

– मेहंदीचा रंग चांगला यायला हवा असेल तर तुम्ही रात्री लोखंडी भांड्यात मेहंदी भिजवा आणि मग सकाळी मेहंदी लावा. लोखंड हे मेहंदीमध्ये उतरते आणि याचा रंग अधिक गडद आणि चांगला दिसतो.

– मेहेंदी भिजवल्यानंतर त्वरीत केसांना लाऊ नका. मेहंदी भिजण्यासाठी किमान ६ ते ७ तासांचा कालावधी लागतो. मेहंदी चांगली मुरावी लागते. त्यामुळे तुम्हाला ज्यादिवशी मेहंदी लावायची आहे, त्याचा आदल्या रात्री मेहंदी भिजत घाला. यामुळे केसांना चांगला रंग दिसून येईल.

– केसांना मेहेंदी लावण्यासाठी भिजवताना त्या मेहेंदीमध्ये दही मिक्स केले पाहिजे. यामुळे आपल्या केसांना कंडीशनिंग मिळते. मेंहदीमध्ये दही मिसळल्यामुळे आपल्या केसांमध्ये गुंता देखील होत नाही.

Hair Care

– साध्या पाण्याने मेहंदी धुवा आणि केस सुकल्यावर त्यावर पहिले तेल लावा आणि रात्रभर तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा केस धुवा आणि यासाठी माईल्ड शँपूचा वापर करावा. केसांना तेल लावा आणि मसाज करा. यामुळे मेहंदीचा रंग अधिक काळ केसांवर टिकून राहील.

– केसांना लावण्यात येणारी मेहेंदी ही नैसर्गिक असल्याने त्याचे कोणतेही अपायकारक परिणाम आपल्याला दिसणार नाही.

===============

हे देखील वाचा : Torres कंपनीचा घोटाळा नेमका कसा झाला ? किती जणांचं नुकसान ?

===============

– केसांना मेहंदीचा चांगला रंग यावा असे वाटत असेल तर साध्या पाण्यात ते कधीही भिजवू नका. तुम्हाला वाटले तर ते कॉफी अथवा चहा पत्ती च्या पाण्यात मिक्स करून त्यामध्ये भिजवू शकता. यामुळे केसांचा रंग चांगला गडद होतो.

– मात्र मेहेंदी लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास आहे, ज्यांना कायम सर्दी, पडसं, ताप हा त्रास होतो त्यांनी मेहेंदी लावू नये. सोबतच लहान मुलांनी याचा वापर करू नये.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.