Home » Shami Tree: श्रीरामांनी पुजलेल्या शमी वृक्षाला धार्मिकसोबतच आहे आयुर्वेदिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व

Shami Tree: श्रीरामांनी पुजलेल्या शमी वृक्षाला धार्मिकसोबतच आहे आयुर्वेदिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shami Tree
Share

झाडं आपल्या मनुष्यांसाठी देवाने दिलेले मोठे वरदान आहे. या झाडाचे माणसाच्या आयुष्यात मोठे महत्त्व आहे. झाडांशिवाय माणसाचे अस्तित्व शून्य आहे. म्हणूनच आपण झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. झाडे लावून त्यांना जगवणे आपले कर्तव्य आहे. मात्र झाडांचे महत्त्व फक्त आपल्या अन्नाची सोय करणे एवढेच आहे का? नाही झाडांचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप आहे आणि धार्मिक दृष्ट्या देखील खूप आहे. अनेक अशी झाडं आहेत ज्यांचा वापर करून आपण आपले आजार बरे करू शकतो. तर अनेक अशी देखील झाडं आहेत ज्यांची पूजा केली जाते. (Shami Tree)

एवढेच नाही तर काही झाडं घरात लावल्याने त्याचे काही दुष्परिणाम देखील आपल्या जीवनावर होतात. वास्तुशास्त्राप्रमाणे अनेक झाडं आपल्याला शुभ फळ देतात तर काही अशुभ फळ देतात. सर्वच बाजूनी तुळशीचे रोप हे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. या झाडाचा वापर आरोग्यासाठी, पूजेसाठी आणि वास्तुशास्त्रानुसार अतिशय चांगला मानला गेला आहे. यानंतर शमीचे झाड महत्वाचे मानले गेले आहे. शमीच्या झाडाला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. शिवाय वास्तुशास्त्रानुसार देखील हे झाड चांगले मानले गेले आहे. काय आहे या झाडाचे महत्त्व चला जाणून घेऊया. (Astrology)

शमीचे झाड हे पूजेसाठी खास मानले जाते. याचा संबंध शनिदेवाशी येतो. या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकट दूर होते असे म्हटले जाते. शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशी येतो. याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख-समृद्धी वाढते. शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते. या वनस्पतीची रोज पूजा करणे खूप शुभ मानले जाते. शिवाय वास्तुशास्त्रानुसार शमीचे झाडं हे शनि देव आणि भगवान हनुमान यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. ज्या घरात शमीचं झाडं असेल तिथे कधीही शनिदोष निर्माण होत नाही, शनि देव आणि भगवान हनुमान यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो. (Marathi)

शमी वनस्पतीचे धार्मिक महत्त्व
पुराणांनुसार, भगवान श्री राम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती. एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र-शस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती. म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते. घरात शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे, परंतु विजयादशमीला ते लावणे चांगले. मात्र तुम्ही शनिवारी जरी हे विशेष रोप लावले तरी ते चांगले असते. ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावणे शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकू नये म्हणून प्रयत्न करा. (Latest Marathi News)

Shami Tree

घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावा. भगवान शंकराला दररोज शमीचे पान अर्पण करणे खूप शुभ आहे. दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे. पूजापाठमध्येही या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडताना या झाडाचे दर्शन घेऊन निघावे. या वनस्पतीची रोज पूजा केल्यास सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात. या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धन-संपत्ती वाढते. शनीमुळे आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते घालावे. (Todays Marathi Headline)

असे मानले जाते की दक्षिण किंवा पश्चिम दिशेला शमीचे झाड असल्यास घराभोवती सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. हे एक सुसंवादी वातावरण तयार करण्यात मदत करू शकते, जे घराच्या सर्वांगीण कल्याणासाठी अनुकूल आहे. विजय आणि शुभाचे प्रतीक म्हणून, शमीचे झाड त्याच्या सभोवतालची जागा शक्ती, लवचिकता आणि यशाच्या भावनांनी भरू शकते. (Social Updates)

जर तुमच्यावर सतत कर्जाचा डोंगर चढत असेल किंवा कर्जाची समस्या सतावत असेल तर शनिवारी विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा करा. तसेच काळे उडीद, तीळ अर्पण करा. असे केल्याने कर्जापासून सुटका होईल तसेच आर्थिक चणचण कमी होईल. तुम्ही सतत आजारी पडत असाल तर पाण्यात दूध मिसळून शमीच्या झाडाला अर्पण करावे. या वेळी अवधूतेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने सर्व रोग दूर होतात. (Top Marathi News)

शनिवारी सकाळी आंघोळ करुन शमीच्या रोपाची पूजा करावी. तसेच त्याचे पान पर्समध्ये ठेवा. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते. सोमवार किंवा शनिवारी शमीच्या झाडाच्या फांदीला कलव बांधा. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याचा आशीर्वाद मिळतो. राहू दोषापासूनही तुम्हाला आराम मिळेल. (Latest Marathi Headline)

शमीच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने देखील मोठे महत्त्व आहे. शमीच्या झाडाच्या पानांचे सेवन केल्याने पोटातील जंत मरतात आणि पचनक्रिया सुधारते. सांधेदुखी आणि संधिवात यांसारख्या समस्यांमध्येही ते फायदेशीर आहे. नियमित सेवनाने सूज कमी होते आणि हाडं मजबूत होतात. शमीचे झाड दमा आणि खोकला यांसारख्या श्वसनासंबंधी आजारांमध्येही आराम देते. त्याचे औषधी गुणधर्म फुफ्फुसांचे कार्य सुधारतात आणि श्वसन प्रणाली मजबूत करतात. (Top Stories)

=========

Devghar : वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर नेमके कुठे असावे? काय आहेत देव्हाऱ्याचे नियम?

=========

शमीचं झाड मध्यम आकाराचं, सुमारे ५ ते १० मीटर उंचीचे झाड आहे. त्याची लहान पानं आणि उन्हाळ्यात फुलणारी पिवळी फुलं त्याला खास ओळख देतात. हे झाड दुष्काळ सहन करू शकतं आणि वाळलेल्या प्रदेशातही सहज वाढते. शमीचं झाड एक नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी वनस्पती आहे. त्याच्या पानांचा आणि सालीचा काढा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ते शरीरातील विषारी तत्वं बाहेर टाकण्यास आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करते. (Top Trending Headline)

शमीच्या झाडाची पानं आणि सालं पुरळ, खाज आणि ॲलर्जी यांसारख्या त्वचेच्या आजारांमध्ये आराम देतात. त्याच्या नियमित वापराने त्वचा स्वच्छ आणि संक्रमणमुक्त राहण्यास मदत होते. शमीच्या झाडाचे महत्त्व केवळ औषधी नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः राजस्थानमध्ये याला जीवन देणारे झाड मानले जाते. तिथे त्याची पूजा केली जाते आणि त्याचं संरक्षण केलं जाते. ही वनस्पती पूजनीय मानली जाते आणि ज्या घरामध्ये ती असते त्या घराभोवती ऊर्जा सकारात्मक बनते. ही वनस्पती घराभोवतीच्या उर्जेच्या प्रवाहावर परिणाम करते. शुभ मानले जाणारे विविध वृक्षांपैकी एक शमी वृक्ष पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.