उन्हाळ्यात आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते ती पाण्याची. उन्हाळामुळे आणि वाढणाऱ्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी होत असते. त्यामुळे आपले शरीर आपल्याला हायड्रेटेड ठेवणे खूपच आवश्यक आहे. यासाठी अनेक लोकं उन्हाळ्यामध्ये भरपूर फळं खातात. काही जणं तर जेवणातच फळं खातात आणि अन्न खूपच कमी घेतात. असे केल्याने शरीर निरोगी राहण्यासोबतच हायड्रेटेड देखील राहते. उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी असलेली फळं खाणे खूपच फायदेशीर असते. यात खासकरून टरबूज आणि खरबूज या फळांचा विशेष समावेश करावा. (Muskmelon)
आता टरबूज, कलिंगड उर्फ वॉटरमेलनबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. मात्र याच विभागले एक फळ म्हणजे खरबूज अर्थात मस्कमेलन. बाहेर पांढरे, जरा हिरवे पिवळसर असलेले खरबूज आतून देखील केशरी, पिवळसरच असते. उन्हाळ्यामध्ये टरबूज सोबतच खरबूजची देखील मोठ्या प्रमाणावर अवाक वाढते. अनेकांना खरबूज आवडत नसेल कारण ते अनेकदा कमी गोडच निघते. मात्र खरबूज हे उन्हाळ्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आणि लाभदायक फळ आहे. यात ९० टक्के पाणी असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. भरपूर जीवनसत्त्व आणि खनिज असलेले हे फळ हे फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक लाभ होतात. मग नक्की खरबूज खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे कोणते जाणून घेऊया. (Marathi Top News)
> खरबूजमध्ये बीटा कॅरोटीन असते. बीटा कॅरोटीन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हे शरीर मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करते. त्याचप्रमाणे खरबूजमध्ये व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असते, यामुळे आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
> खरबूजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आणि पाचक फायबर असल्याने अन्न लवकर पचते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांनी तर आपल्या आहारात या फळाचा आवर्जून समावेश करावा. (Marathi Health News)
> खरबूज खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. खरबूज फोलेटचा चांगला स्रोत आहे. त्याला व्हिटॅमिन बी-9 असेही म्हणतात. यामुळे काही कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
> खरबूज खाल्ल्याने व्यक्तीची भूक वाढते. त्यामुळे ज्यांना नीट भूक लागत नसेल त्यांनी हे फळ खायला हवे.
> अतिसारचा त्रास होत असल्यास खरबुजाच्या फोडीवर काळी मिरी, आलं पावडर, सैंधव मीठ, जिरा पावडर घालून खाल्ल्यास लगेच आराम पडतो.
> खरबूजमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदयाचे आरोग्य राखते. हे धमन्यांना आराम देते आणि स्ट्रोकचा धोका कमी करते. (Marathi Latest News)
> खरबूजचे नियमित सेवन केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन, फॉलिक अॅसिड, सी, ई, के आणि ए अशा जीवनसत्त्वांचा भरणा असल्याने त्वचा मऊ आणि चमकदार व्हायला मदत होते. खरबूज हे व्हिटॅमिन ए आणि सी चा समृद्ध स्रोत आहे. व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते. (Social NEws)
> यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्याने मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना होणाऱ्या अतिरक्तस्रावापासून आराम मिळतो.
> लो कॅलरी आणि उच्च डाएटरी फायबर, पाणी, खनिज आणि जीवनसत्त्वांचा भरणा असल्याने मधल्या न्याहारीच्या वेळी या फळाचा आवर्जून समावेश करावा.
=======
हे देखील वाचा : वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?
Palitana City : हे आहे जगातील एकमेव शाकाहारी शहर !
========
> उन्हाळ्यात दररोज एकदा खरबूज खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. खरबूज हे केवळ थंडावा देणारे फळ नाही तर ते उष्माघात टाळण्यास देखील मदत करते. याच्या सेवनाने उष्माघाताची शक्यता कमी होते. (Top Stories)
> खरबूज शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. त्याचे नियमित सेवन यकृत आणि मूत्रपिंडांना विषमुक्त करते, ज्यामुळे एकूण आरोग्य चांगले राहते.