मालिका म्हणजे टीव्ही विश्वाची जान आहे. आजच्या मालिका बऱ्याचदा एकसारख्याच वाटतात. मालिका सुरु होताना जरी ती वेगळी वाटत असली, तरी काही काळानंतर सर्व मालिका एकसारख्याच होऊन जातात. त्यामुळे या मालिका बघताना अनेक लोकांना वाटत असते की, जुन्या मालिकाच सर्वात चांगल्या असायच्या. त्याच मालिका बघताना मजा यायची. जुन्या मालिकांची आज इतक्या वर्षांनी देखील असणारी लोकप्रियता चकित करणारी आहे. ही लोकप्रियता लक्षात घेऊन अनेक चॅनेल्स त्यांच्या जुन्या इतिहास रचणाऱ्या मालिका पुन्हा सुरु करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ता ट्रेंड फक्त हिंदी नाही तर मराठीमध्ये देखील चालू झाला आहे. अशातच आता २००० चे दशक गाजवणारी आणि संपूर्ण महिला वर्गाची सर्वात आवडती मालिका म्हणून आजही प्रसिद्ध असलेली ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका पुन्हा परत येत आहे. (Marathi News)
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ या मालिकेची सध्या कमालीची चर्चा होत आहे. जवळपास २०/२२ वर्षांनी पुन्हा एकदा ही मालिका येणार यामुळे सगळेच प्रेक्षक कमालीचे उत्साहित आहे. आता येणारी ही नवी मालिका कशी असेल?, यात कोणकोणते कलाकार असतील?, मालिका पूर्णपणे नवीन असेल की जुन्या मालिकेशी संबंधित असेल? आदी अनेक प्रश्न सध्या सर्वानाच पडताना दिसत आहे. अशातच या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मालिका पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात स्मृती इराणी आपल्याला दिसतात. त्यामुळे मालिकेत स्मृती दिसणार हे तर आता पक्के झाले आहे. (Top HEadline)
राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या स्मृती पुन्हा एकदा अनेक वर्षांनी या मालिकेच्या निमित्ताने टीव्हीवर परतणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो व्हायरल होत असून, मालिकेबद्दलच्याच चर्चा होत आहे. अशातच आता आता स्मृती इराणी यांच्या या मालिकेसाठी घेतलेल्या मानधनाबद्दल अनेक बातम्या मीडियामध्ये गाजत आहे. एकीकडे स्मृती इराणींच्या या पुनरागमनाची चर्चा होत असताना दुसरीकडे आता त्यांच्या मानधनाचीही चर्चा रंगली आहे. मूळ शोमध्ये स्मृती इराणींना एका एपिसोडसाठी केवळ १८०० रुपये मानधन मिळत होते. मात्र, आता येणाऱ्या या नव्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ साठी त्यांच्या मानधनाच आकडा ऐकून नक्कीच सगळ्याचे डोळे मोठे होतील आणि तुम्हाला शॉक बसेल. (Todays Marathi Headline)
मीडियामध्ये सध्या येणाऱ्या अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या सीझन 2 च्या एका एपिसोडसाठी स्मृती इराणी यांना तब्बल १४ लाख रुपये दिले जात आहेत. मात्र याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. जरी हा आकडा खरा असला तरी यात नवल वाटण्याजोगे जास्त काही नाही. कारण स्मृती इराणी याची लोकप्रियता आणि या मालिकेच्या जुन्या भागाला मिळालेली प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊनच कदाचित हे मानधन त्यांना देण्यात येत असावे. आज २५ वर्षांनंतरही या शोची क्रेझ कायम आहे. निर्मात्यांनी सीझन 2 चा पहिला लूकही रिलीज केला आहे, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार स्मृती इराणी Z+ सुरक्षेत शूटिंग करत आहे. सेटवर कठोर प्रोटोकॉल पाळले जात आहेत, ज्यात फोन टॅपिंग आणि प्रवेशावर निर्बंध यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ दुसऱ्या सीझनविषयी चाहते खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी त्यांच्या टीव्हीवरील कमबॅकबद्दल आणि मालिकेबाबत भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “मी आता पूर्णवेळ राजकारणी आहे आणि पार्ट टाइम अभिनेत्री आहे. पण तुलसी हे पात्र माझ्या हृदयाच्या खूप जवळचे आहे. हा शो फक्त एक मालिका नव्हती, तर ती लाखो घरांमधील भावना आणि मूल्यांचा एक भाग होती. या शो साठी एकता प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. तिला नक्की काय पाहिजे, ते तिला माहित असते. ती यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे जेणेकरून हा शो आधीपेक्षा जास्त यशस्वी व्हावा.” (Top Marathi Stories)
=============
हे ही वाचा : Elon Musk : द अमेरिका पार्टी !
=============
दरम्यान ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेबद्दल सांगायचे झाले तर त्याकाळात सलग सात वर्षे ही मालिका नंबर वन होती. आता त्याच मालिकेचा रिबूट ‘क्योंकी सास भी कभी बहू थी रिबूट’ या नावाने २९ जुलै २०२५ पासून रात्री १०:३० वाजता स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे सर्वच प्रेक्षक आतुरतेने या मालिकेची आणि २९ जुलैची वाट बघत आहे. आता या शो ला देखील पहिल्या सारखाच प्रतिसाद मिळतो की नाही हे पाहणे महत्वाचे असेल. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics