आजच्या आधुनिक जगात वावरतांना जेवढे महत्व तुमच्या शिक्षणाला, ज्ञानाला आहे तेवढेच महत्व तुमच्या लुक्सला आणि तुम्ही कसे राहता याला देखील आहे. त्यामुळे प्रत्येक जणं कायम आपल्या लुक्सबद्दल खूपच जागरूक असतो. महिला देखील कायम आपली काळजी घेताना दिसतात. यासाठी त्या नियमित पार्लर जातात. पार्लरमध्ये गेल्यावर महिला विविध प्रकारच्या ट्रीटमेंट घेतात. यातलीच एक अतिशय सामान्य आणि लोकप्रिय ट्रीटमेंट म्हणजे फेशियल वॅक्स. (Waxing)
प्रत्येक महिला पार्लरमध्ये जाऊन फेशियल वॅक्स करतात. फेशियल वॅक्स म्हणजे चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकणे. फेशियल वॅक्समुळे आपला चेहरा अधिक गोरा आणि उजळ दिसतो. त्यामुळे अनेक महिला एब्रो आणि फेशियलसोबतच फेशियल वॅक्स देखील नियमित करतात. मात्र फेशियल वॅक्स वाटते तितके सोपे नाही. अनेक महिलांना हे वॅक्स सतत करून सवय होते. मात्र काही महिलांना हे वॅक्स करण्याची इच्छा तर खूप असते, पण भीती वाटत असते. मात्र हे फेशियल वॅक्स करताना जर तुम्ही काळजी घेतली नाही तर नक्कीच तुम्हाला या वॅक्सचा त्रास होऊ शकतो. यासाठी फेशियल वॅक्स नक्की करा मात्र त्याआधी थोडी काळजी नक्कीच घ्या. (Facial Waxing)
> वॅक्सिंग करण्याआधी गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे त्वचा मऊ होते. तसेच हाता आणि पायावरील केस देखील सैल होतात आणि छिद्र मोकळे झाल्यामुळे वॅक्सिंग करतांना होणार त्रास कमी होतो. (Marathi)
=======
हे देखील वाचा : Singapore : कशा असतात सिंगापूरच्या शाळा !
=======
> वॅक्सिंग करून आल्यावर हाता आणि पायावर बर्फ फिरवावा त्यामुळे त्वचेची होणारी जळजळ कमी होते.
> वॅक्सिंग झाल्यानंतर चुकूनही चहा किंवा कॉफीचा सेवन करू नये.
> फेशियल वॅक्ससाठी नेहमी मऊ वॅक्स वापरा. यासाठी तुम्ही कोरफड किंवा फळांचे वॅक्स वापरणे खूपच फायदेशीर ठरू शकते. चेहऱ्यावर कडक वॅक्स किंवा बॉडी वॅक्स लावू नये. चेहऱ्यासाठी खास वॅक्सच्या पट्ट्या देखील बाजारात उपलब्ध आहेत ज्या चेहऱ्याच्या वॅक्ससाठी हलक्या आणि नाजूक असतात. (Marathi Top News)
> जर तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या चेहऱ्यावर वॅक्स लावणार असाल तर त्यानुसार वॅक्स निवडा किंवा डॉक्टरांचा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. सोबतच जर तुम्हाला कसली ऍलर्जी असेल, त्वचेशी संबंधित कोणती समस्या असेल, त्वचा संवेदनशील असेल तर तुमच्या पार्लरमध्ये आधीच त्याबद्दल सांगा.
> वॅक्सच्या एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी चेहरा स्क्रब करा किंवा ब्लीच लावा. असे केले नाही तर फेशिअल वॅक्सिंग करताना त्वचेचे नुकसान होऊ शकते. असे केल्याने त्वचेतील मृत पेशी कमी होण्यास आणि चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. (Marathi Trending news)
> तुम्ही जर फेशियल वॅक्सिंगसाठी हॉट वॅक्स वापरत असाल तर ते चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्याचे तापमान तपासा. खूप गरम वॅक्स लावल्यास त्वचेला भाजू शकते.
> वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्याला सतत हात लावू नका. यामुळे संसर्ग किंवा पुरळ येऊ शकते. कारण वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा अधिक संवेदनशील होते आणि तिला वारंवार स्पर्श केल्याने संसर्गाचा धोका वाढतो. (Top Stories)
=======
हे देखील वाचा : Pahalgam Attack : आधी धर्म विचारला मग गोळ्या झाडल्या…
=======
> इटॅलियन व्हॅक्सचा उपयोग केल्यास त्वचेला भरपूर फायदे मिळतात. कारण हे व्हॅक्स पूर्णतः नैसर्गिक असते. मात्र अन्य वॅक्सच्या तुलनेत हे व्हॅक्स थोडेसे महाग असते.
> वॅक्ससिंग घरीही करता येते मात्र पहिल्यांदा वॅक्सिंग करत असाल तर चांगल्या पार्लरमध्ये करावे हे स्किनसाठी उत्तम असेल.