आजच्या आधुनिक काळात प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष आपल्या सौंदर्याकडे आणि लुक्सकडे प्रकर्षाने लक्ष देते. नेहमीच चांगले प्रेसेंटेबल दिसण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. अशातच आपण विविध ब्युटी प्रॉडकट्स वापरत स्वतःला चांगले थवेतो. मात्र चांगले दिसणे हे केवळ चेहऱ्यापुरतेच मर्यादित नसते. आपण इतरही शरीराची चांगली काळजी घेत ते स्वच्छ ठेवणे आवश्यक असते.
अनेकदा आपण चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देण्यात इतके व्यस्त होतो की, आपल्याला इतर अवयांच्या स्वच्छतेकडे आणि सौंदर्याकडे लक्ष देण्याचे लक्षातच नसते. असाच एक महत्वाचा आणि सौंदर्यात भर घालणारा भाग म्हणजे आपली मान. मानेचे सौंदर्य देखील खूपच महत्वाचे समजले जाते. पण कधीच मानेच्या त्वचेकडे लक्ष देत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी उन्हामुळे आणि वातावरणातील आद्र्रतेमुळे शरीराला घाम येतो.
सतत घाम येत राहिल्यामुळे शरीराच्या काही अवयवांवर घाम तसाच साचून राहतो. यामुळे हळूहळू मान आणि हातांच्या कोपऱ्यांची त्वचा काळी होऊ लागते. काळी झालेल्या त्वचेकडे लक्ष न दिल्यामुळे त्वचेवर मृत पेशी तशाच जमा होऊन राहतात. मान काळी झाल्यानंतर ती पुन्हा एकदा उजळण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.
काही माणसांमध्ये गेल्यानंतर काळी मान असल्यावर अवघडल्यारखे वाटते, आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय जाणून घेऊया.
– मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी बेसन आणि चुन्याची पेस्ट वापरता येते. हे लावल्याने बऱ्यापैकी मानेचा काळेपणा दूर होऊ शकतो.
– काळ्या मानेवर हळद आणि दुध लावल्याने लवकर परिणाम दिसतील. हा उपाय अगदीच सोपा आणि स्वस्त आहे. अंघोळीच्या आधी तुम्ही सहज हा वापरू शकता.
– बटाटा हा स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. याचा उपयोग पिगमेंटेशन कमी करण्यासाठी केला जातो. बटाटा किसून त्याचा रस काढून घ्यावा. यानंतर लिंबाचा रस त्यात मिसळून तो मानेला लावावा. १० – २० मिनीट हे मिश्रण मानेला लावून ठेवावे आणि गार पाण्याने धुवून टाकावे.
– वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात २ चमचे दही आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. या मिश्रणाची जाडसर पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण मानेवर लावून लिंबाच्या सालीने हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटं ठेवून चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा.
– अॅपल सायडर व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित करते. यामध्ये असलेले मॅलिक अॅसिड त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणते. मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी मानेवर अॅपल सायडर व्हिनेगर वापरा.
– काळी त्वचा दूर करण्यासाठी एक कप कोमट पाण्यात एक चमचा एलोवेरा जेल मिसळा.
पाणी आणि जेल नीट मिसळले की कापसाच्या साहाय्याने मानेवर लावा. आता २० मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
– लिंबू आणि मध मानेतील घाण लवकर काढून टाकतात. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते आणि मधातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला स्वच्छ आणि चमकदार बनवतात. लिंबाचा रस आणि मध समप्रमाणात एकत्र करून मानेवर लावा. 30 मिनिटांनंतर त्वचा धुवा.
– मानेचा काळेपणा लवकर घालवण्यासाठी हळद आणि दह्याची पेस्ट वापरा. ही लावल्यानेही मानेवर साचलेली घाण निघून जाते.
– संत्र्याच्या सालीच्या मदतीने मानेचा काळेपणा सहज दूर होतो. संत्र्याची साल दुधात मिसळून पेस्ट बनवा. आता ते काळ्या झालेल्या मानेवर चांगले लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. त्वचा साफ होण्यास सुरवात होईल.
– बेकिंग सोडा शरीरावरील कितीही जुन्या काळेपणाला काढून टाकायला मदत करते. याकरीता तुम्हाला पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टला काळ्या पडलेल्या भागात लावावे. काही वेळ तसेच ठेवून ते धुवून टाकावे.
– पपई मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. पाण्यात ते मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. १० – २० मिनीट मानेवर ही पेस्ट लावून ठेवावी. गार पाण्याने ते धुवून घ्यावे.
– टोमॅटोमध्ये असलेले ऍसिड त्वचा स्वच्छ करते. टोमॅटोची पेस्ट बनवून मानेवर लावा. ३० मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने त्वचा धुवा.
– मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी रॉक मीठाचा वापर केला जाऊ शकतो. आंघोळ करण्यापूर्वी मानेवर रॉक मीठ वापरा. मीठ वापरण्यासाठी मीठ घ्या आणि हलक्या हातांनी मानेला मसाज करा. मसाज केल्यानंतर मान पाण्याने धुवा. आंघोळीनंतर मानेवर मॉइश्चरायझर वापरा.
(टीप : कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका आणि डॉक्टरांचा सल्ला देखील नक्की घ्या)