फेब्रुवारी महिना संपत आला आणि उन्हाचा तडाखा देखील वाढतच चालला आहे. उन्हाचा वाढता पारा आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक आणि त्रासदायक आहे. उन्हामुळे आपल्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे अनेक त्रास उद्भवू शकतात. भर उन्हात बाहेर जाणे शक्यतो टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास योग्य ती काळजी घेऊन मगच घराबाहेर पडावे. मात्र नोकरदार लोकांना काय ऊन आणि काय पाऊस…कामासाठी कधीही त्यांना बाहेर जावेच लागते. (Summer)
कडाक्याच्या उन्हात बाहेर गेल्याने किंवा काम केल्यानं, शरीरात अधिकची उष्णता निर्माण होते. याचा खूप गंभीर त्रास आपल्या शरीराला होतो, यालाच उष्माघात म्हणजेच सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं. यामुळे माणसाचा जीव देखील जाऊ शकतो, म्हणूनच उन्हापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणं खूपच आवश्यक आहे. मग उन्हाळ्यात उष्मघातापासून वाचण्यासाठी आपण काही छोटे उपाय करून स्वतःची काळजी घेऊ शकतो. जाणून घेऊया उष्माघाताबद्दल आणि त्याच्या उपायांबद्दल. (Heatstroke)
उष्माघाताची लक्षणे कोणती?
– उच्च तापमान
– मळमळणं, उलट्या होणं
– भूक मंदावणं
– पाण्याचा अभाव/तहान लागणं
– घाम येणं
– श्वास लागणं, श्वास घेण्यात अडथळा
– गंभीर डोकेदुखी, सततची चिडचिड, त्वचेवर लालसरपणा, तोंडाला कोरड पडणं, अस्वस्थता जाणवणं
– लघवी कमी होणं, लघवीच्या जागी जळजळ (Marathi Top Stories)
– उन्हात बाहेर जाताना नेहमी आपले संपूर्ण शरीर झाकण्याचा प्रयत्न करा. सनकोट घालण्यासोबतच चेहऱ्यावर स्कार्फ आणि डोळ्यांवर सनग्लासेस लावा. शक्य असल्यास कायम सोबत छत्री ठेवा. शरीरात पाण्याची कमी निर्माण होऊ नये म्हणून बाहेर जाण्यापूर्वी पुरेसे पाणी प्या. शिवाय तुमच्यासोबत देखील बाटलीमध्ये पाणी राहू द्या. (Marathi Latest News)
– दररोज लिंबू पाणी, लिंबूपाणी, नारळ पाणी, काकडीचा रस, सफरचंदाचा रस यांचे सेवन करा. याशिवाय, टरबूज, खरबूज, काकडी, उसाचा रस, द्राक्षे आणि कैरी पन्हे आदी भरपूर पाणी असलेले आणि शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी खा. शक्यतो उन्हात दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान बाहेर जाणे टाळा. यावेळी उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो. (Social News)
– उन्हाळयात बडीशेपचे सेवन खूपच फायदेशीर असते. नियमित बडीशेप खाल्ल्याने शरीराचे तापमान थंड राहते. रात्री जर बडीशेप ग्लासभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्यास शरीर नैसर्गिकरित्या थंड राहील. (Care During Summer)
============
हे देखील वाचा : Dhananjay Munde : मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख यांना न्याय मिळणार ?
============
– सामान्य लोकांच्या तुलनेत, मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांनी उन्हाळ्यात खास काळजी घेणं आवश्यक आहे. या लोकांनी फळं, फळांचे रस, नारळ पाणी, लिंबू पाणी, इत्यादी घेऊ नये. अनेकदा काही औषधांमुळे देखील शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांनी उन्हाळ्यात औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– शक्य असल्यास दररोज तीन ते चार लीटर पाणी प्या. उन्हाळ्यात शक्यतो घट्ट कपडे वापरणं टाळावे त्याऐवजी फिकट रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य दयावे. उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडा.