साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. आपल्या हिंदू सणांपैकी एक महत्वाचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेला ओळखले जाते. या दिवसाला आपल्या पुराणांमध्ये अतिशय महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाची तृतीया तिथी अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते. यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करताना मुहूर्त बघण्याची गरज नसते. शास्त्रांनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या पुण्यकर्मांचे फळ कधीही कमी होत नाही, ते सदैव अक्षय राहते. म्हणूनच या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. (Akshaya Tritiya)
अक्षय तृतीयाची तारीख आणि तिथी
पंचांगानुसार, अक्षय तृतीया यंदा ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा अक्षय तृतीयाची तिथी २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५:३२ वाजता सुरू होणार असून, ३० एप्रिल रोजी दुपारी २:१३ वाजता संपणार आहे. परंतु हिंदू धर्मात नेहमीच उदय तिथीला महत्व दिले जाते. याच नियमानुसार यंदा ३० एप्रिल रोजी दिवसभर अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी लोकं अनेक शुभ काम करण्याचा प्रयत्न करतात. जसे की घर घेणे, वाहन घेणे, सोने खरेदी करणे, लग्न ठरवणे, नवीन व्यवसाय सुरू करणे आदी अनेक शुभ कामं या दिवशी केले जातात. (Marathi Top News)
अक्षय तृतीयेचे महत्व
अक्षय तृतीयेचे महत्व अनेक बाजूनी आहे. या दिवसाचे सर्वात मोठे महत्व म्हणजे, धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. या दिवसाबद्दल असेही सांगितले जाते की, या दिवशी भगवान विष्णूंनी याच दिवशी परशुरामच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. गंगा नदी देखील याच दिवशी पृथ्वीवर अवतरली असल्याचे सांगितले जाते. या दिवसाचे अजून एक मोठे महत्व म्हणजे अक्षय्य तृतीयेच्याच दिवशी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि मोठ्या चार धाम यात्रेला सुरुवात होते. (Marathi Latest News)
अक्षय्य तृतीयेचे अजून खूपच महत्व आहे. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार ह्याच दिवशी अन्नपूर्णादेवी जयंती, नर-नारायण या देवांची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. शिवाय आजच्याच दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून श्री गणपतीने लेखन केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. (Marathi Trending News)
===========
हेही वाचा :
दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ह्या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य
आंब्यांच्या पानांचे सेवन केल्यास मिळतील हे 5 फायदे
===========
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे?
अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. अंघोळ करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकल्यास शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा करायला विशेष महत्त्व असल्याने, या दिवशी धान्य, वस्त्र, पैसे आदी अनेक गोष्टी क्षमतेनुसार गरीब व्यक्तीला दान केल्या जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम कायम अक्षय्य राहते. या दिवशी केलेल्या पुण्याचे फळ व्यक्तीला वर्षभर मिळते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम केले जात नाही. किंवा कोणाचेही नुकसान न करण्याचा सल्ला दिला जातो. (Marathi News)
अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत असली, तरी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील लाभदायक असते. असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात. हिंदू धर्मात श्री यंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी जमल्यास शंख खरेदी करून घरी आणावा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. (Social News)