Home » Yesubai : स्वराज्यातील रणरागिणी : महाराणी येसूबाई

Yesubai : स्वराज्यातील रणरागिणी : महाराणी येसूबाई

by Jyotsna Kulkarni
0 comment
Yesubai
Share

विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास २ महिने झाले आहे. मात्र अजूनही ‘छावा’चीच हवा सगळीकडे आहे. तब्बल ८०० कोटींचा बिजनेस केलेल्या या सिनेमामुळे संपूर्ण जगाला छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व समजले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या विश्वासाने संभाजी महाराजांकडे सुपूर्द केलेला स्वराज्याचा वारसा त्यांनी मोठ्या विश्वासाने जपला. महराजांचा त्यांच्यावरील विश्वास देखील संभाजी महाराजांनी सार्थ ठरवला.

मात्र संभाजी महाराजांना हे सर्व करणे शक्य झाले याचे कारण म्हणजे, त्यांना खंबीर साथ मिळाली ती त्यांची पत्नी असलेल्या येसूबाई यांची. संभाजी महाराज हे जेवढे हुशार, चाणाक्ष होते तेवढ्याच महाराणी येसूबाई देखील हुशार होत्या. लहान असतानाच दोघांचा विवाह झाल्याने दोघांवर छत्रपती शिवाजी महाराजांचेच संस्कार झाले होते. त्यामुळे संभाजी महाराजांच्या प्रत्येक सुख दुःखात येसूबाई भक्कम त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या. जेव्हा औरंगजेबाने कपटाने आणि फितुरांच्या मदतीने संभाजी महाराजांना पकडले तेव्हा देखील त्यांनी त्यांचा तोल ढळू दिला नाही. सर्वप्रथम स्वराज्य हे बाळकडू त्यांनी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच घेतले होते. (Yesubai)

Yesubai

 

संभाजी महाराज मोहिमेवर गेल्यानंतर येसूबाई स्वतः स्वराज्याचे कामकाज पाहायच्या. अगदी न्यायनिवाडा करण्यापासून, राजकीय खेळी खेळण्यापर्यंत त्या स्वराज्याचा सर्वच गोष्टी अतिशय शिताफीने सांभाळायच्या. स्वराज्यातील अनेक लोकं अशी होती, ज्यांना संभाजी महाराजांवर खूप राग होता. ते सतत महाराजच्या विरोधात कट कारस्थान देखील करायचे. मात्र केवळ येसूबाईंमुळेच त्यांच्या कोणत्याच काटकारस्थानांना यश मिळाले नाही. (Marathi News)

==========

हे देखील वाचा : Maharashtra : महाराष्ट्र दिनाचे महत्व आणि इतिहास

==========

संभाजी महाराज गडावर नसताना सुद्धा येसूबाई यांनी गडावर कोणतेही राजकारण शिजू दिले नाही. त्या केवळ राज्य करण्यातच कुशल होत्या असे अजिबातच नाही. त्या त्यांचे घर आणि आई म्हणून जबाबदारी देखील तितक्याच उत्तमपणे पूर्ण करत होत्या. एवढेच नाही तर सोयराबाई यांच्या निधनानंतर राजाराम महाराज यांचा सांभाळ येसूबाईंनी अगदी आईप्रमाणे केला. स्वराज्याची तालीम धडे त्या राजाराम राजांना उत्तमपणे शिकवत होत्या. (Marathi Top News)

संभाजी महाराजांना पकडल्यानंतर देखील येसूबाई या आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे गेल्या. दररोज महाराजांना होणाऱ्या त्रासाच्या बातम्या त्यांना मिळत होत्या. अशा जटिल काळात देखील त्यांनी स्वतःला सांभाळले आणि स्वराज्यावर लक्ष दिले. ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे हाल हाल करून ठार मारल्यानंतर केवळ स्वराज्यासाठी त्यांनी त्यांचे आभाळाएवढे दुःख बाजूला ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्य वाचवण्यासाठी येसूबाई स्वतः त्यांच्या मुलासोबत तब्बल तीस वर्षे औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या. (Marathi Trending News)

Yesubai

जीवुबाई उर्फ येसूबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा सरदार पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या होत्या. येसूबाई भोसले यांचा जन्म शृंगारपूर येथे झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर राणी येसूबाईंची कूटनीती ही कौतुकास्पद होती. महाराणी येसूबाई साहेब एक कर्तव्यदक्ष आणि राजकीयदृष्ट्या कुशल महिला होत्या. लहानवयातच १६६४ मध्ये, त्यांचा विवाह शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांच्याशी झाला आणि त्या येसूबाई भोसले म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. तथापि, त्या केवळ संभाजी महाराजांची पत्नी असण्यासोबतच एक उत्तम राजकीय नेत्या होत्या. (Yesubai bhosle)

येसूबाईंनी त्यांच्या आयुष्यात खूपच कमी वेळा आनंद उपभोगला. त्यांच्यावर सतत कोणते ना कोणते संकट यायचे. मात्र याचा सामना त्या मोठ्या धीराने करायच्या. एकदा आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला लपवून ठेऊन अशी अफवा पसरवली की युवराजांचे निधन झाले आहे. त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत येसूबाई या विधवा म्हणून काही काळ जगल्या. येसूबाई या तेजतर्रार होत्या. मात्र त्यांनी कधीही स्वराज्यापुढे आपल्या भावना किंवा स्वार्थ जपला नाही. त्यांनी कायम मोठे पण दाखवत आपले कर्तव्य पार पाडले. याचे एक उत्तम उदाहरण आहे. (Marathi Top Stories)

संभाजी महाराज गेल्यानंतर नियमाप्रमाणे महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू गादीवर बसायला पाहिजे होता. परंतु शाहू महाराज लहान होते. पण जर महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहू राजांना गादीवर बसवता आले असते, त्यांचा राज्याभिषेकही झाला असता. पण तेव्हा त्यांनी पुत्रप्रेमापेक्षा स्वराज्याचा विचार केला आणि प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले. त्यांनी आपल्या पुत्रसमान दीर असलेल्या राजाराम महाराज यांना गादीवर बसवले आणि स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. (Social News)

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य मिळवण्याच्या औरंगजेबाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र तेव्हा येसूबाई त्यांच्यासमोर होत्या, याचा त्याला अंदाज नव्हता. औरंगजेबाने रायगडाला वेढा दिला तेव्हा येसूबाईंनी राजाराम राजांना तिथून सहीसलामत बाहेर काढून जिंजीला पाठवले आणि आठ महिने रायगड लढवला. मात्र अखेर त्यांना औरंग्याने पकडले. तेव्हा त्यांच्यासोबत छोटे शाहू राजे देखील होते. तब्बल तीन वर्ष त्या परकीय धर्माच्या, परकीय लोकांमध्ये आपला धर्म, अब्रू आणि मुलाला घेऊन राहिल्या. (Marathi Top Trending News)

Yesubai

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा सत्तापालट झाली तेव्हा फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. त्याने १७१९ साली अनेक मराठे सरदार आणि येसूबाई शाहू राजे यांना सोडून दिले. तेव्हा येसूबाई ६० वर्षांच्या होत्या. तब्बल तीस वर्षांनी त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. पुढे त्या स्वराज्यात आल्या. महाराणी येसूबाई यांच्या सुटकेनंतरचा काळ सुखाचा गेला. पुढे येसूबाईंनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती परंतु शाहू महाराजांना त्या सल्ला देत, काही न्यायनिवाडा सुद्धा करत. येसूबाईंनी त्यांचे उरलेले आयुष्य दानधर्म, चिंतन यात घालवले. (Marathi)

==========

हे देखील वाचा : Labour Day : आंतरराष्ट्रीय कामगार दिन १ मे ला का साजरा करतात?

==========

पुढे इ.स. १७३० मध्ये महाराणी येसूबाई यांचा मृत्यू झाला. शाहू महाराजांनी महाराणी येसूबाई यांचा अंत्यविधी संगम माहुली येथे केला. छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची समाधी कृष्णा नदीच्या काठी संगम माहुली येथे बांधली. येसूबाईंनी त्यांच्या धडाडीने, कूटनीतीने, कुशल नेतृत्वाने छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्याचे कायम परकीय लोकांपासून रक्षण केले. मात्र या रणरागिणीला इतिहासात पाहिजे तसे स्थान मिळाले नाही, याची खंत कायमच राहील.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.