सध्या क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या आशिया कपची कमालीची चर्चा सुरु आहे. हा आशिया कप सध्या खूपच गाजत आहे. खासकरून भारत आणि पाकिस्तानचे सामने. यातच पाकिस्तानने बांग्लादेशला हरवून आशिया कपच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. भारत आधीपासूनच आशिया कपच्या फायनलमध्ये पोहचला असल्याने आता येत्या २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया कपचा अंतिम सामना दुबईमध्ये रंगणार आहे. यंदाचा आशिया कप भारत आणि पाकिस्तान या दोन टीममुळे खूपच गाजला. (Cricket)
पहलगाम हल्ल्यानंतर भारतने या कपमध्ये पाकिस्तान सोबत खेळण्याला सगळ्यांनीच कडाडून विरोध केला. मात्र भारताने पाकिस्तानसोबत या आशिया कपमध्ये दोन सामने खेळले आणि दोन्ही जिंकले देखील. या सामन्यांदरम्यान भारताने पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवला नाही. एवढेच नाही तर हात मिळवणे देखील भारताच्या टीमने टाळले. पाकिस्तानच्या खेळाडूंनी देखील सामन्यांमध्ये बरेच चुकीचे इशारे करून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न देखील केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न व्यर्थ गेला. आता भारत पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही देश आणि दोन्ही देशातील लोकं कमालीचे उत्सुक आहे. आज आपण याच पार्श्वभूमीवर या आशिया कपच्या इतिहास जाणून घेणार आहोत. (Asia Cup News)
आशिया कप ही दर दोन वर्षांनी आयोजित होणारी स्पर्धा आहे. या आशिया कपची सुरुवात १९८४ साली झाली. हा काप सुरु होण्यामागे देखील एक रंजक गोष्ट आहे. भारताचे तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री सिद्धार्थ शंकर रे यांनी त्याकाळचे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. के.पी. साळवे यांच्याकडे विश्वचषकाच्या फायनलच्या दोन तिकिटांची मागणी केली होती. सिद्धार्थ शंकर रे हे त्याकाळी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही होते. त्यानंतर साळवे यांनी सिद्धार्थ शंकर रे यांच्या विनंतीचा मान राखत इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना फायनलची दोन तिकिटं मागितली. (Marathi News)
त्या अधिकाऱ्यांनी त्यांना ही तिकिटं दिलीच नाहीत. यामुळे साळवे कमालीचे चिडले. त्यांना आशियाई देशांमध्ये क्रिकेटवरून होणाऱ्या भेदभावाचा चांगलाच राग आला त्यामुळे त्यांनी पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आदी आशियाई देशांच्या क्रिकेट अध्यक्षांशी चर्चा केली आणि याच देशांसाठी एक वेगळा आणि खास कप असावा अशी इच्छा व्यक्त केली. सर्व देशांनी संमती दिल्यानंतर १९८४ सालापासून आशिया चषक सुरु झाला. १९८४ ते २०१४ पर्यंत, पहिले १२ आशिया कप एकदिवसीय स्वरूपात अर्थात ५० ओव्हरचे आयोजित करण्यात आले होते. पण २०१६ साली असा निर्णय घेतला गेला की जवळच्या आयसीसी स्पर्धांचा विचार करून आशिया कपचा फॉरमॅट बदलला जाईल. त्यानंतर हा टी20 फॉरमॅटमध्येही होऊ लागला. (Top Marathi News)

२०१६ आणि २०२२ मध्ये, टी२० विश्वचषकापूर्वी आशिया कप टी२० स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, २०१८ आणि २०२३ मध्ये, एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आशिया कप एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. आशिया कपची सुरुवात १९८४ साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण १६ वेळा आशिया कप आयोजित केला गेला आहे. आतापर्यंत २०१६ आणि २०२२ मध्ये एशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये आयोजित केला गेला आहे. भारतीय संघाकडे सर्वाधिक आशिया कप जिंकण्याचा विक्रम आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या १६ आशिया कपपैकी १५ मध्ये भाग घेतला आहे आणि ८ वेळा विजेतेपद जिंकले आहे. भारताने ही स्पर्धा ७ वेळा एकदिवसीय स्वरूपात आणि १ वेळा टी-२० स्वरूपात जिंकली आहे. श्रीलंका ६ जेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे (५ एकदिवसीय + १ टी-२०). पाकिस्तान दोनदा या चषकाचा विजेता बनला आहे. (Todays Marathi Headline)
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात 8 संघ सहभागी होण्याची ही यंदाची पहिलीच वेळ आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 5 संघांनी थेट प्रवेश मिळवला. तर यूएई, ओमान आणि हाँगकाँग या 3 संघांनी पात्रता फेरीतून आशिया कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं. (Latest Marathi Headline)
यंदा आशिया कपच्या विजेत्या संघाला भरघोस बक्षिसं देखील मिळणार आहेत. आशिया कप २०२५ चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला तब्बल २.६ कोटी रुपये (सुमारे ३ लाख अमेरिकन डॉलर) मिळणार आहेत. ही रक्कम 2022 च्या मागील आवृत्तीपेक्षा तब्बल ५०% जास्त आहे. तर उपविजेत्यांना १.३ कोटी रुपये (सुमारे १.५ लाख अमेरिकन डॉलर) दिले जातील. संघ पुरस्कारांबरोबरच वैयक्तिक कामगिरीसाठी मोठी रक्कम दिली जाणार आहे. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्कार देण्यात येईल. त्यासाठी १२.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. (Top Marathi Headline)
आशिया कपचा इतिहास
– १९८४ मध्ये युएईमध्ये खेळलेला पहिला आशिया कप श्रीलंकेला पराभूत करत भारताने जिंकला.
– १९८६ मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत विजेतेपद पटकावले होते. (Latest Marathi News)
– १९८८ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या तिसऱ्या आशिया कपमध्ये भारताने पुन्हा श्रीलंकेला हरवून या स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते.
– १९९० मधील चौथ्या आशिया कप स्पर्धेत भारताने पुन्हा श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले.
– १९९५ मध्ये युएईमध्ये झालेल्या पाचव्या आवृत्तीत भारताने श्रीलंकेलाही हरवले.
– १९९७ मध्ये श्रीलंकेने पुनरागमन करत भारताला हरवून त्यांचा सहावा आशिया कप जिंकला होता.
– २००० मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या सातव्या आशिया कपमध्ये, पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करून पहिले विजेतेपद जिंकले.
– २००४ मध्ये श्रीलंकेने भारताला हरवून विजेतेपद जिंकले.
– २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये खेळण्यात आलेल्या स्पर्धेत, श्रीलंकेने भारताला हरवून विजय मिळवला होता.
– २०१० मध्ये भारत श्रीलंकेला हरवून विजेतेपद जिंकले. (Top Trending News)
=======
Hinglaj Mata Temple : या मंदिरात आहे, पाकिस्तानमधून आलेली अखंड ज्योत !
=======
– २०१२ मध्ये बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानने बांगलादेशला हरवून विजेतेपद पटकावले.
– २०१४ मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करून आशिया कप जिंकला होता.
– २०१६ मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदाच टी२० स्वरूपात खेळली गेली, या वेळी भारताने बांगलादेशला हरवून विजेतेपद पटकावले.
– २०१८ मध्ये युएईमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत भारताने बांगलादेशला हरवून विजेतेपद जिंकले होते.
– २०२२ मध्ये, आशिया कप दुसऱ्यांदा टी२० स्वरूपात खेळला गेला. ज्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत केले होते.
– २०२३ मध्ये आशिया कप स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेने संयुक्तपणे आयोजित केला होता. ज्यामध्ये भारताने श्रीलंकेला हरवून विजेतेपद जिंकले होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
