Home » Shital Devi : हात नसूनही तिरंदाजीत ‘अर्जुन’ असणाऱ्या शितलची विलक्षण प्रेरणादायी कहाणी

Shital Devi : हात नसूनही तिरंदाजीत ‘अर्जुन’ असणाऱ्या शितलची विलक्षण प्रेरणादायी कहाणी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shital Devi
Share

सगळ्याच लोकांना सगळेच जन्मापासूनच मिळते असे नाही. प्रत्येक मूल जन्माला येताना चांदीचा चमचा तोंडात ठेऊनच येतो असे नाही. जन्माला आल्यानंतर मोठे होताना आपल्याला आपल्याकडे असलेल्या चांगल्या वाईट गोष्टी ओळखून, आपली ताकद, कमजोरी ओळखून त्यानुसार स्वतःला घडवावे लागते. यात इतर लोकांचा नक्कीच पाठिंबा आणि मदत मिळते मात्र, शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास नक्कीच असावा लागतो. याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही काहीही अगदी अशक्य गोष्टी देखील सहज शक्य करू शकतात. (Marathi Top Stories)

आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने तिच्या कमतरता ओळखल्या, मात्र त्यावर तिने रडत न बसता मात केली आणि संपूर्ण जगामध्ये ती तिच्या कर्तृत्वामुळे प्रसिद्ध झाली. यासोबतच ती अनेकांसाठी प्रेरणा देखील बनली. असे म्हणतात की, “स्वतःवर असलेला विश्वासच आपली ताकद बनतो.” या मुलीकडे पाहून आपल्याला हे अगदी खरेच वाटेल. (Shital Devi)

Shital Devi

आपल्या देशामध्ये अनेक लोकप्रिय खेळ आहेत. अगदी क्रिकेटपासून ते भाला फेकीपर्यंत अनेक लहानमोठे खेळ आपण पाहतो. यातलाच एक महत्वाचा आणि ऑलम्पिक पातळीवरचा खेळ म्हणजे तिरंदाजी. आता जर आम्ही तुम्हाला विचारले की, तिरंदाजी या खेळासाठी कोणत्या गोष्टी सर्वात जास्त आवश्यक असतात? तर लगेच उत्तर येईल की, तीक्ष्ण नजर आणि हातांवरची मजबूत पकड. अगदी बरोबर. (Marathi Latest News)

मात्र जर हातच नसले तर? हसू नका… उत्तर द्या… गोंधळात पडलात ना? तिरंदाजीसाठी हात तर खूपच आवश्यक आहे. आणि हातच नसतील तर ती व्यक्ती तिरंदाज होऊच शकत नाही. खरे आहे. मात्र आपली देशात अशी एक मुलगी आहे जिला जन्मतः हात नाही, मात्र तरी ती तिरंदाजीमध्ये निपुण आहे. अहो आश्चर्य वाटते ना…? वाटायलाच पाहिजे, आणि आश्चर्यासोबतच अभिमान देखील वाटायला पाहिजे. (Shital Devi News)

आम्ही बोलत आहोत शितल देवी (Shital Devi) हिच्याबद्दल. शितलने तिरंदाजीमध्ये हाताचा नाही तर पायाचा वापर करून असामान्य असे मोठे यश संपादन केले आहे. शितल देवी ही एक भारतीय पॅरा-तिरंदाज आहे. तिने २०२४ च्या पॅरालिंपिकमध्ये मिश्र संघ कंपाऊंड स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि ती सर्वात तरुण भारतीय पॅरालिंपिक पदक विजेती ठरली.

Shital Devi

एवढेच नाही तर शितलने २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकले. शितलने जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक तसेच आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले आहे. तिला तिच्या तिरंदाजी खेळातील असामान्य योगदानाबद्दल मोठ्या अशा अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले आहे. २०२३ मध्ये शीतल ही पॅरा जागतिक तिरंदाजी क्रमवारीत ती प्रथम क्रमांकावर होती. (Paralympic athlete)

जगात असे असामान्य लोकं आहेत, ज्यांचे कर्तृत्व पाहून आपण स्वतःलाच लहान समजायला लागतो. मग भलेही ते वयाने लहान असो, मात्र त्यांच्या कर्तृत्वाने ते आभाळाएवढेच मोठे असतात. शितलबद्दल सांगायचे झाले तर मूळची जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) राज्यातील किश्तवाड जिल्ह्यातील लोई धार या दुर्गम गावात शितल देवीचा जन्म झाला तिला जन्मापासूनच हात नव्हते. शितलला जन्मापासूनच फोकोमेलिया (Phocomelia) हा आजार झाला होता. हा एक दुर्मिळ जन्मजात विकार आहे ज्यात अवयवांचा विकास होत नाही. असे असूनही या मुलीने हार मानली नाही.

शितल देवीची या खेळाची ओळख कटरा येथील श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाच्या क्रीडा संकुलातून झाली. जिथे ती तिचे प्रशिक्षक अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वेदवान यांना भेटली. इथूनच शितलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. येथे तिची या तिरंदाजी या खेळाशी ओळख झाली. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत शितलला धनुष्यबाण माहित देखील नव्हते. मात्र पुढच्याच दोन वर्षात ती या खेळामुळेच संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली.

शितलसाठी हा खेळ पायांनी खेळणे अजिबातच सोपे नव्हते. लिहण्यासाठी, झाडावर चढण्यासाठी शितल पायाचा वापर करायची. याचा तिला या खेळासाठी फायदा झाला. मात्र तरीही तिला तिच्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा होता. यासाठी तिला अथक परिश्रम आणि सराव आवश्यक होता. यासाठी तिला तिच्या प्रशिक्षकांनी खूप मदत केली. तिच्यात पायात असलेली ताकद त्यांनी ओळखली आणि त्याचा योग्य वापर करत त्यांनी तिला या खेळासाठी तयार केले.(Shital Devi Journey)

Shital Devi

मात्र इथे देखील अडचण होतीच. कारण शितलच्या कुटुंबाला या खेळासाठी लागणाऱ्या गोष्टींचा खर्च पेलवणे शक्य नव्हते. त्यामुळे शितलच्या प्रशिक्षकांनी शितलसाठी धनुष्य बनवण्याचे ठरवले. त्यांनी त्यांच्या आजूबाजूला मिळणाऱ्या साधनांचा उपयोग करून आणि स्थानिक दुकानांमध्ये मिळणाऱ्या वस्तूचा वापर करून एक धनुष्य तयार केले. शितलच्या किटमध्ये बॅग बेल्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तुंनी बनवलेला शरीराच्या वरच्या भागाचा पट्टा आणि एक छोटं उपकरण यांचा समावेश केला हेल. हे उपकरण शितल तोंडात धरते आणि बाण सोडण्यासाठी त्याची मदत घेते.

=================

हे देखील वाचा :  Shivjayanti : शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिमांची संख्या ऐकून हैराण व्हाल

=================

शितलसाठी तिच्या प्रशिक्षकांनी एक विशिष्ट वेळापत्रक तयार केलं. त्यानुसार शितलला आधी धनुष्याऐवजी रबर बँड किंवा थेराबँडचा वापर करून केवळ पाच मीटर अंतरावर ठेवण्यात आलेल्या लक्ष्यावर नेम धरण्याचा सराव करायचा होता. शितलने या खेळाचा सराव सुरु केला आणि हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढत गेला. सुरुवातीच्या अवघ्या चारच महिन्यांत तिने ५० मीटर अंतरावरील लक्ष्यभेद करताना धनुष्याचा योग्य पद्धतीने वापर करू लागली.

पुढे दोन वर्षांच्या आतच २०२३ मध्ये आशियाई पॅरा खेळांमध्ये शितलने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये लागोपाठ सहा आणि दहा हिट करण्यासाठी छोट्या अंतरावर बाण सोडण्याचा सराव केला आणि सुवर्णपदक देखील जिंकले. शितलच्या तिच्या असामान्य अशा कार्यासाठी मागच्यावर्षी राष्ट्र्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार (Arjun Award) देखील प्रदान करण्यात आला आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.