Home » Republic Day : प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

Republic Day : प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Republic Day
Share

जानेवारी महिना सुरु झाला की, सगळ्यांना वेध लागतात ते २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचे. देशाचा राष्ट्रीय उत्सव म्हणून प्रजासत्ताक दिन ओळखला जातो. या दिवशी संपूर्ण देशामध्ये एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच सकारात्मकता आणि फक्त देशप्रेम जाणवत असते. या दिवशी देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ऑफिसेस, शाळा-कॉलेज, विविध ठिकाणी ध्वजवंदन करून नानाविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जागात. शिवाय देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत परेडचे आयोजन केले जाते. तसेच तिथे विविध राज्यांचे देखावेही सादर केले जातात. हा दिवस देशभरात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. मात्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचे नक्की कारण कोणते?, प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय? जाणून घेऊया. (Republic Day)

प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाहीच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झाले. २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत भारताचे संविधान तयार झाले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले. त्यानंतर पुढच्याच वर्षी २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली. (Marathi)

२६ नोव्हेंबरला स्वीकारलेली भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी २६ जानेवारी हीच तारीख का निवडली यामागे देखील एक खास गोष्ट आहे. २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केला होता. संपूर्ण स्वराज प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या या तारखेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारीची निवड करण्यात आली. १९५० मध्ये या दिवशी संविधान लागू झाल्यानंतर, देशाला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यासाठीच तेव्हापासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. (Top Marathi News)

Republic Day

स्वातंत्र्यानंतर देशासाठी राज्यघटनेची गरज निर्माण झाली. राज्यघटना निर्माण करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. या सभेने ९ डिसेंबर १९४६ पासून संविधान बनवण्याचे काम सुरू केले. भारताच्या या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. तर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.भीमराव रामजी आंबेडकर होते. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात डॉ. आंबेडकरांनी महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे निर्माते म्हटले जाते. (Latest Marathi Headline)

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. यानंतर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. (Top Stories)

========

Delhi : ४५ लाख विटांपासून बनवलेले राष्ट्रपती भवन तुम्हालाही पाहायचे? मग करा ‘ही’ प्रोसेस

========

देशातील लोकशाहीचा विजयाचा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांचे चालविलेले राज्य. २६ जानेवारी या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश अशी भारताची ओळख आहे. विविध भाषा, विविध धर्म, वेगवेगळ्या संस्कृती तसेच वेगवेगळ्या प्रथा भारतात आहेत. तरीही भारतातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. राष्ट्रीय एकता देशात टिकून आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.