Kitchen Hacks : कुरमुऱ्यांचा बहुतांशजणांच्या घरी वापर केला जातो. यापासून चिवडा ते भेळ तयार केली जाते. पण कुरमुरे घरी आणल्यानंतर काही काळाने नरम होतात. अशातच दीर्घकाळ कुरमुरे कुरकुरीत राहण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.
हवेपासून दूर ठेवा
कुरमुरे नरम होऊ नयेत म्हणून हवा आणि ओलसर ठिकाणापासून दूर ठेवा. यासाठी घट्ट झाकण असलेला डबा, पॉलिथिन बॅग अथवा जीप लॉक पॅकेटमध्ये स्टोअर करू शकता.
थंड ठिकाणी ठेवा
कुरमुरे थंड ठिकाणी ठेवल्याने लवकर नरम होत नाही. अन्यथा ओलसर ठिकाणी ठेवल्यास तेथील दमटपणामुळे नरम होण्याची शक्यता वाढली जाते.
कापडात बांधून ठेवा
कुरमुरे कुरकुरीत राहण्यासाठी एका सुती कापडात बांधून ठेवू शकता. पावसाळ्याच्या दिवसात वातारवणातील दमटणामुळे कुरमुरे लवकर नरम होऊ शकतात. अशातच ते बंद डब्यात ठेवा.
सिलिका जेलचा वापर
कंटेनरमध्ये काही सिलिका जेलचा वापर करू शकता. यामुळे ओलरसपणा जेल शोषून घेत कुरमुरे कुरकुरीत राहण्यास मदत होईल.
तापमान नियंत्रण
कुरमुरे अत्याधिक गरम ठिकाण अथवा उन्हाच्या संपर्कात ठेवू नका. यामुळे ते लवकर खराब होतात. (Kitchen Hacks)
कुरमुरे नरम झाल्यास काय करावे?
कुरमुरे नरम झाल्यास ओव्हनमध्ये गरम अथवा पेपर टॉवेलचा वापर करू शकता. जेणेकरुन कुरमुरे नरम होणार नाहीत आणि दीर्घकाळ कुरकुरीत राहतील.