उत्तर कोरियामध्ये हुकूमशहा किम जोंग उन याच्या उपस्थितीत एका युद्धनौकेचे अनावरण सुरु होते. किम आणि त्याची मोठी मुलगी जू ए यांनी या जहाजाला हिरवा सिग्नल दिला. अपेक्षेप्रमाणे ही युद्धनौका समुद्रात डौलदारपणे जाणार होती. मात्र ऐनवेळी काहीतरी गडबड झाली. युद्धनौका तिच्या रॅकवरुन घसरली आणि एकाबाजुला झुकली. यामध्ये या युद्धनौकेचे जबर नुकसान झाले आहे. किमनं रशियाच्या मदतीनं ही युद्धनौका तयार केली होती. या युद्धनौकेवर त्याची आधुनिक क्षेपणास्त्र तैनात होणार होती. (International News)
मात्र त्या युद्धनौकेलाच अपघात झाल्यानं किम प्रचंड संतापला आहे. हा देशाच्या स्वाभिमानाला लागलेला धक्का आहे, अशा शब्दात त्यानं संबंधित अधिका-यांना दम दिला. शिवाय या सर्व प्रकरणात दोषी असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याची घोषणाही त्यानं केली आहे. किम जोंग उन याला उत्तर कोरियाचा हुकूमशहा बोलण्यात येतं. त्याच्या सणकीपणासाठी तो ओळखला जातो. आता या युद्धनौकेच्या अनावरणामध्ये असलेल्या अधिका-यांची मात्र पाचावर धारण बसली आहे. कारण किमच्या मते हा अपघात म्हणजे, उत्तर कोरियाचा अपमान आहे, आणि उत्तर कोरियाचा अपमान करणा-यांना किम जिवंत ठेवत नाही. त्यामुळेच युद्धनौका तयार करणा-या अधिका-यांना आता आपला जीव कसा वाचवायचा, हा प्रश्न पडला आहे. (Kim Jong Un)
उत्तर कोरियामध्ये एका युद्धनौकेच्या अनावरण समारंभात मोठा अपघात झाला. युद्धनौकेच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान यात झाले. कोणालाही ही साधी बातमी वाटेल. पण उत्तर कोरियासाठी ही बातमी छोटी नाही. कारण उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन याने या घटनेला देशाचा अपमान, असे सांगून दोषी अधिका-यांना भेटायला बोलावले आहे. तेव्हापासून या सर्व अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. कारण किम हा त्याच्या सणकीपणासाठी ओळखला जातो. (International News)
आपल्या हातून ज्या युद्धनौकेचे उद्घाटन झाले, ती काही क्षणातच अपघातग्रस्त झाली, हे बघताच किम प्रचंड संतापला होता. शिवाय त्याच्यासोबत त्याची मोठी मुलगी जु ए ही सुद्धा उपस्थित होती. जु ए हिच्याकडे किमची भावी वारसदार म्हणून बघितले जात आहे. युद्धनौकेचा हा अपघात म्हणजे, फक्त आपला आणि आपल्या देशाचा अपमान नसून आपल्या मुलीचाही अपमान असल्याचे मत किमनं व्यक्त केले आहे. अर्थात किमचा अपमान म्हणजे, उत्तर कोरियामध्ये यासाठी मृत्यूदंड ही एकमेव शिक्षा आहे. त्यामुळे या युद्धनौकेच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अधिका-यांनी आपले शेवटचे दिवस मोजायला सुरुवात केली आहे. किम ही मृत्यूदंडाची शिक्षा कशापद्धतीनं देणार याचीही त्यांना काळजी आहे. गेल्यावर्षी उत्तर कोरियामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी ज्या भागात पूर आला होता, तेथील अधिका-यांना किमनं सरळ गोळ्या मारल्या. (Kim Jong Un)
यात 21 हून अधिक अधिकारी मारले गेले. पूरजन्य परिस्थिती रोखू न शकल्याबद्दल ही शिक्षा संबंधितांना देण्यात आली होती. आता या युद्धनौका प्रकरणात झालेला अपघात तर किमच्या दृष्टीनं अक्षम्य आहे. किमनं या युद्धनौकेची दुरुस्ती करण्याची आज्ञा केली आहेच, पण आता जून महिन्यात पुन्हा या युधनौकेचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच संबंधित अधिकारी रात्रंदिवस या युद्धनौकेच्या दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. उत्तर कोरियाच्या नौदलाकडे अनेक प्रकारच्या जहाजांचा मोठा ताफा आहे. यात विध्वंसक, कॉर्वेट, पाणबुड्या अशा अनेक जहाजांचा समावेश आहे. याशिवाय ज्या युद्धनौकेचा अपघात झाला, ती युद्धनौकाही उत्तर कोरियासाठी महत्त्वाची आहे. मुख्य म्हणजे, रशियानं ही युद्धनौका उत्तर कोरियाला दिल्याचेही सांगितले जाते. (International News)
===============================
हेही वाचा : Ryo Tatsuki : एका कॉमिक्समधील भविष्यवाणीनं जपानमध्ये हडकंप !
Tea : चहा प्यायल्यामुळे आरोग्याला होतात ‘हे’ लाभ
=============================
युक्रेनच्या विरोधात लढण्यासाठी उत्तर कोरियाची एक सैन्य तुकडी रशियाला गेली होती. त्या बदल्यात ही युद्धनौका रशियाकडून मिळाली असून याचा उपयोग अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. चो ह्योन ही 5000 टन वजनाची विध्वंसक युद्धनौका आहे. तिचे अनावरण किमनं केल्यावर काही क्षणातच युद्धनौका रॅम्पवरून घसरली आणि अडकली. यामुळे युद्धनौकेचा तोल बिघडला आणि त्याच्या खालच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. किमचे अधिकारी आता या युद्धनौकेच्या दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या युद्धनौकेचे पुन्हा अनावरण होणार आहे. अर्थात त्यानंतर या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या अधिका-यांना किम त्याच्या पद्धतीनं शिक्षा देणार आहे. (Kim Jong Un)
सई बने