पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान फुटीरतावादी बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसवर हल्ला करत ही अख्खी ट्रेनच ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे, या ट्रेनमध्ये पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेतील अधिकारी असल्याची माहिती आहे. या ट्रेनमधील बलुची नागरिक, महिला आणि मुलांची बलुची बंडखोरांनी सुटका करत बंदिस्त सैनिकांच्या बदल्यात पाकिस्तान सरकारबरोबर वाटाघाटी करायला सुरुवात केली आहे. जाफर एक्सप्रेस बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात होती. क्वेट्टापासून 160 किमी अंतरावर असलेल्या सिबी शहराजवळील डोंगराळ भागात, बलुच बंडखोरांचे वर्चस्व आहे. बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या या बलुच आर्मीनं काही पाकिस्तानी सैनिकांना मारलेही आहे. पाकिस्तानमधील या घटनेवर अवघ्या जगाचे लक्ष आहे. पाकिस्तान सरकारला सुरुवातीला बलुच बंडोखोरांनी 48 तासांची मुदत दिली. (Khan Abdul Ghaffar Khan)
त्यानंतर ही मुदत वाढवली आहे. मात्र आपल्यावर सैनिकी कारवाई केल्यास एकापाठोपाठ एका ओलीसाची हत्या करु, अशी थेट धमकीच दिल्यानं पाकिस्तानी सैन्याचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच की काय, आता पाकिस्तानी सरकारनं या अपहरण नाट्याला भारताची मदत असल्याची ओरड करायला सुरुवात केली आहे. या सर्वात एका बलुच नेत्याचे नावही चर्चेच आले आहे. या बलुच नेत्याचा भारतानं, भारत रत्न देऊन सत्कारही केला आहे. या बलुच नेत्याचे नाव आहे, खान अब्दुल गफार खान. बलुच नेते खान अब्दुल गफार खान हे स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही भारताचे समर्थक राहिले आहेत. बलुचिस्तानला पाकिस्तानचा भाग बनवण्याच्याही त्यांनी कायम विरोध केला. 1987 मध्ये भारत सरकारने खान अब्दुल गफार खान यांचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला आहे. त्यावेळी केंद्रात राजीव गांधींचे सरकार होते. आता बुलच आर्मीनं केलेल्या या ट्रेन अपहण प्रकरणानंतर याच खान अब्दुल गफार खान यांची आठवण काढली जात आहे. (International News)
खान अब्दुल गफार खान यांची सीमावर्ती गांधी अशीही ओळख होती. त्यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. त्यांचे सर्व कुटुंबच हे लढाऊ वृत्तीचे होते. पणजोबा अब्दुल्ला खान यांनी पठाणी जमातींसाठी आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल त्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली. गफार खान यांचे आजोबा सैफुल्ला खान यांनीही इंग्रजांविरुद्ध लढा दिला. आजोबांकडूनच गफार खान यांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे शिक्षण मिशनरी स्कूलमध्ये झाले. 1919 मध्ये पेशावरमध्ये मार्शल लॉ लागू झाला तेव्हा त्यांनी शांतता प्रस्ताव मांडला, त्यात त्यांना अटक झाली. सहा महिन्यानंतर गफार खान यांची सुटका झाला, मात्र यापुढे इंग्रजांविरोधात लढा देण्याचा निश्चय त्यांनी केला. खुदाई खिदमतगार नावाची चळवळ उभारत समाजात जागृती केली. यासाठी त्यांना इंग्रजांनी 1930 मध्ये अटक केली. तुरुंगात त्यांनी गीता, ग्रंथसाहिब आणि कुराणाचाही अभ्यास केला. (Khan Abdul Ghaffar Khan)
=============
हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार नाहीत ?
Syria : महिलांची नग्न मिरवणूक सिरियात परिस्थिती बिकट !
=============
तुरुंगातून सुटका झाल्यावरही त्यांनी आपल्या सामाजिक सलोख्याच्या चळवळीला चालू ठेवले. भारताच्या फाळणीला त्यांनी कायम विरोध केला. फाळणीनंतर आयुष्यभर पाकिस्तानविरुद्ध स्वतंत्र पख्तूनिस्तान चळवळ सुरू ठेवली. त्यामुळेच पाकिस्तान सरकार आणि खान अब्दुल गफार खान यांच्या विरोधात राहिले. स्वतंत्र बलुचिस्तान स्थापण्यासाठी जीवनभर संघर्ष करणा-या गफार खान यांनी “माझे जीवन आणि संघर्ष” हे आत्मचरित्र 1969 मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर त्यांनी जगभर प्रवास केला. 1986 मध्ये त्यांचा भारत सरकारनं भारत रत्न पुरस्कारानं सन्मान केला. पण पाकिस्तान यावर नाराज झाला. 1988 मध्ये पाकिस्तान सरकारनं त्यांना पेशावरमध्ये नजरकैद केले. 20 जानेवारी 1988 मध्ये या बलुचीस्तानचा पाठपुरावा करणा-या नेत्याचा मृत्यू झाला. आपली दफनविधीही पाकिस्तानमध्ये होऊ नये, अशी खान अब्दुल गफार खान यांची इच्छा होती. त्यामुळे अफगाणिस्तानातील जलालाबाद येथे त्यांना दफन करण्यात आले. याच खान अब्दुल गफार खान यांना बुलचिस्तान आर्मी आपला नेता मानते. त्यामुळेच भारताबरोबर कायम सलोख्याचे संबंध राहिलेल्या या आर्मीनं केलेल्या अपहरणामध्ये भारताचे नाव ओढण्याचे काम पाकिस्तानी सरकार करीत आहेत. (International News)
सई बने