Home » भारतीय लष्करातील जवान

भारतीय लष्करातील जवान

by Team Gajawaja
0 comment
Kashmir Tigers
Share

भारतीय लष्कराची काही जवान काश्मीर येथे देसाच्या घनदाट जंगलात मुजाहिदीनचा शोध घेत होते. ते मुजाहिदीनच्या जवळ आले. मुजाहिदीने त्यांच्यावर गोळीबार केला, मुजाहिदीनच्या हल्ल्यात अनेक भारतीय लष्कराचे जवान मारले गेले आणि जखमी झाले.अधिक तपशीलांच्या प्रतिक्षेत.. काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत हे युद्ध असच सुरू राहणार”. ही सूचना आहे आतंकवादी संघटना काश्मीर टायगर्स ची.

१५ जुलैच्या रात्री जम्मू काश्मीरच्या डोडा मध्ये आतंकवादी हल्ला झाला. हल्ल्याची जबाबदारी आतंकवादी संघटना काश्मीर टायगर्स ने उचली आहे. या हल्ल्यात भारतीय सेनेचे ४ जवान कॅप्टन बृजेश थापा, सिपाही बिजेंद्र, सिपाही अजय, नायक डी राजेश हे शहिद झाले आहेत. काश्मीर मध्ये गेल्या एका महिन्यात १० पेक्षा अधिक आतंकवादी हल्ले झाले आहेत. (Kashmir Tigers)

काश्मीर टायगर्स ही दहशतवादी संघटना पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचाच एक भाग आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर काश्मीर टायगर्स ही संघटना समोर आली.ऑगस्ट 2019 नंतर काश्मीर टायगर्ससारख्या अनेक नव्या दहशतवादी संघटना तयार झाल्या. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाय होण्या मागे याच संघटनांंनचा हात आहे.

२०२१ ला श्रीनगरमधील पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स संघटनेनेच स्वीकारली होती.. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर सुरक्षा दलांवर झालेला हा पहिला मोठा हल्ला होता. त्यानंतर काश्मीर टायगर्सने अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. 12 जून 2024 ला डोडा येथे लष्कराच्या टीओबी (टेम्पररी ऑपरेटिंग बेस) वर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी याच दहशतवादी संघटनेने घेतली होती. या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाले होते. (Kashmir Tigers)

9 जुलै 2024 ला काश्मीर टायगर्सने जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील दुर्गम माचेडी भागात हल्ला केला होता. भारतीय लष्कर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा गटांची स्थापना २०१९ च्या काश्मीरस्थितीनंतर आली. ज्याचा उद्देश असं दर्शवलं जाणं होतं की हे हल्ले स्थानिक संतापातून होत आहेत.विशिष्ट गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स गटाच्या जवानांनी डोडा शहरापासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर देसा जंगलपट्ट्यात कारवाई सुरू केली, १५ जुलैच्या रात्री झालेल्या चकमकीत आतंकवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, ज्यामुळे तीव्र गोळीबार झाला. आणि ह्याच गोळीबारात भारतीय सेनेचे ४ जवान कॅप्टन बृजेश थापा, सिपाही बिजेंद्र, सिपाही अजय, नायक डी राजेश हे शहिद झाले. (Kashmir Tigers)

शिपाई बिजेंद्र यांनी आपलया बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेवटचा फोन लावला होता वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी मिळाली नाही पण मी लवकरच घरी येईल अशी अशा सुद्धा कुटुंबाला दिली होती.नायक डी राजेश एका मेढंपाळाचा मुलगा होता ते सहा वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. आर्मीत जाण्याचं लहानपणीच स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. शिपाई अजय कुमार सिंग दररोज रात्री आपल्या कुटुंबाला फोन करत, पण त्या रात्री हा फोन लावला गेला नाही.

============================

हे देखील वाचा : ‘या’ दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होणार…

============================

भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी या वीरांनी आपले प्राण गमावेल. कॅप्टन बृजेश थापा यांच्या आईंच्या म्हणण्यानुसार “बृजेश मार्च मध्ये घरी आला होता, जुलैमध्ये परत येणार होता. आता रवीवारीच तर आमचं बोलण झालेल आणि आता ही बातमी आली. २६ वर्षांचाच होता माझा मुलगा. पण एक जवान कधी घाबरत नाहीत, माझा मुलगा होता म्हणून काय झालं, कोणाला तरी सीमेवर जावं लागेलच ना. (Kashmir Tigers)

असे अनेक जवान गेल्या काही वर्षात शहिद झालेत, जम्मू प्रदेश पूर्वी काश्मीरपेक्षा शांत मानला जात होता. पण गेल्या काही महिन्यांपासून जम्मू भागात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. 2021 पासून जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुरक्षा दलाच्या ५२ जवानांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये लष्कराच्या बहुतांश जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता या आतंकवादी हल्ल्यांना पूर्ण पणे थांबण्याची गरज आहे. आता सरकार यावर कठोर पावलं उचलेल का ? हे येणाऱ्या काळात कळेलं.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.