दिवाळीची खऱ्या अर्थाने समाप्ती होते ती देव दिवाळीच्या दिवशी. अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला. दिवाळीनंतर साधारण पंधरा दिवसांनी देव दिवाळी साजरी केली जाते. यालाच कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा करण्याला मोठे महत्त्व आहे. असे सांगितले जाते की, या दिवशी भगवान विष्णू आपली निद्रा संपवून शंकराकडून पुन्हा सृष्टीचे पालकत्व स्वीकारतात आणि भगवान शिव तपश्चर्येला बसतात. कार्तिक पौर्णमेला भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेण्याला देखील महत्त्व असून, याच दिवशी तुलसी विवाहाची देखील समाप्ती होते. (Dev Diwali)
यंदा त्रिपुरारी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून २६ मिनिटांनी होणार असून, त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती ५ नोव्हेंबर रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी होईल. म्हणूनच उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही ५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास,पूजाविधी आणि दान ५ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. या दिवशी फक्त मंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची सुंदर आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. (Tripurari purnima )
त्रिपुरारी पौर्णिमा पूजाविधी
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे. जवळपास नदी नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करावे. त्यांनतर घरातील देवांची पूजा करावी. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्व आहे. त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा. बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. यादिवशी रुद्राभिषेक कण्याचे सर्वाधिक महत्व आहे. त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा. (Marathi News)
व्रत करून भगवान विष्णूची देखील पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू मंत्राचा जप करावा. पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी. सोबतच या दिवशी शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे पूजन करावे. ‘नमो हंस अनंत साहित्य सहंग्य, सहस्त्रक्षक्ष शिरो बहाव, सहस्त्र नाम पुरुष सशतेता, सहस्त्रकोटी युग धरत नमह.’ हा मंत्र म्हणावा. (Todays Marathi HEadline)

त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. त्रिपुर वात बाजारात मिळते. ती वात जाळून दिवा लावणे हे एकार्थी त्रिपुरासुर दैत्याच्या दुष्टवृत्तीला जाळण्याचे प्रतीक आहे. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो. तसेच या दिवशी दीपदानही केले जाते. कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्त्व आहे, म्हणूनच या दिवशी संध्याकाळी पवित्र नदीमध्ये दीपदान करावे. (Marathi Trending Headline)
कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. कार्तिकेयांना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जाते. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. (Top Marathi News)
त्रिपुरारी पौर्णिमा आख्ययिका १
त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन ‘वर माग’ असे सांगितले, त्रिपुराने देवता, मनुष्य, निशाचर, स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊदे आणि त्यांच्यापासून अभय मिळावे, असा वर मागितला. ब्रह्मदेवाने त्यावर ‘तथास्तु’ म्हटले. ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुरासुर भलताच माजला. त्याची तीन पुरे होती. ती आकाशसंचारी होती. त्रिपुर त्या पुरात बसून त्रैलोक्याला त्रास देऊ लागला. (Latest Marathi Headline)
त्याच्या त्रासामुळे सर्व देव वैतागले आणि भगवान शंकराला शरण गेले. भगवान शंकरानी त्याची तीन आकाशसंचारी पुरे जाळून टाकली आणि त्रिपुरासुराला ठार मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली घडली. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाली असेल त्या पौर्णिमेला ‘त्रिपुरारी’ किंवा ‘त्रिपुरी’ पौर्णिमा असे नाव मिळाले. लोक त्या दिवसापासून दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाली दीपोत्सव करून त्रिपुरसंहाराचा आनंद व्यक्त करू लागले. (Top Trending News)
========
Vaikuntha Chaturdashi : वैकुंठ चतुर्दशीचे महात्म्य आणि पूजा मुहूर्त
Kartik Purnima : जाणून घ्या त्रिपुरारी पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या दीपदानाचे महत्त्व
========
त्रिपुरारी पौर्णिमा आख्ययिका २
तारकासुर नावाच्या राक्षसाला ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे तीन पुत्र होते. मयासुराने या तीन पुत्रांसाठी तीन पुरे बनवून या तिघांना ती दिली. मयासुराने ही पुरे देतांना त्याना बजाविले की ‘ तुम्ही कधीही देवांच्या वाटेला जाऊ नका. तसेच देवांचा कधीही अनादर करू नका. परंतु, कालांतराने या तिन्ही पुराधिपतींची बुद्धी चळली. त्याना दुर्बुद्धी सुचली. ते देवांना त्रास देऊ लागले. सर्व देव भगवान शंकराला शरण गेले. शंकराने या तिन्ही राक्षसांशी युद्ध करून त्यांच्या त्रिपुरांचे दहन केले. त्यामध्येच ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या तिन्ही राक्षसांचा अंत झाला. त्यानंतर लोक आनंदाप्रीत्यर्थ दीपोत्सव करू लागले. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
