तामिळनाडूमध्ये ‘महादीपम’ नावानं प्रकाशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा होतो. तामिळनाडू, भारत आणि इतर तमिळ-बहुल प्रदेशांमध्ये साजरा केला जाणारा एक प्राचीन आणि महत्त्वाचा प्रकाशोत्सव आहे. भगवान मुरुगन यांना हा उत्सव समर्पित आहे. यावेळी घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये मातीचे दिवे लावले जातात. त्यावरुन अंधारावर प्रकाशाचा विजय, समृद्धी आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे सांगण्यात येते. कार्तिगाई या तमिळ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साज-या होणा-या या प्रकाशोत्सवामुळे देशभरातील राजकारण तापले आहे. शिवाय या प्रकाशोत्सवाला परवानगी देणा-या न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांच्यावर थेट महाभियोग आणण्याची तयारी सुरु झाल्यानं खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांचा मुद्दा उपस्थित केला. शिवाय तामिळनाडू सरकारच्या या निर्णयला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे निषेध नोंदवला आहे. त्यामुळे तामिळनाडूमधील कार्तिगाई दीपम उत्सव म्हणजे काय आणि तो वादात का सापडला याची चर्चा सुरु झाली आहे. (Tamil Nadu)

तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील तिरुपरकुंड्रम टेकडीवर कार्तिगाई दीपम उत्सवादरम्यान सुब्रमण्यम स्वामी मंदिराभोवती मोठा गोंधळ निर्माण झाला. या पवित्र दिव्यासंदर्भात वाद मद्रास उच्च न्यायालयात गेला होता. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने टेकडीवरील मंदिराच्या आत दिवे लावण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयाचे आदेशही नाकारण्यात आल्यानं हिंदू संघटना आक्रमक झाल्या. वास्तविक शतकानुशतके, तिरुपरकुंड्रम टेकडी ही धार्मिक एकता आणि सौहार्दाचे प्रतीक मानली जात आहे. या टेकडीवर सुब्रमण्यम स्वामी मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर आणि सिकंदर बदुशा दर्गा आहे. यापैकी सुब्रमण्यम स्वामी मंदिर मूळतः सहाव्या शतकात पांड्या शासकांनी बांधले आहे. दगडी स्थापत्यकलेचे देशभरातील सर्वात उत्तम मंदिर म्हणून या मंदिराचा उल्लेख होतो. (Social News)
८ व्या शतकाच्या सुमारास या सुब्रमण्यम मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. तर काशी विश्वनाथ मंदिर हे १३ व्या शतकात पांड्य शासक पराक्रम पांड्यन यांनी बांधल्याची माहिती आहे. तर सिकंदर बहुशा दर्गा हा १७ व्या शतकात बांधल्याची माहिती आहे. या टेकडीवर पवित्र दिप लावण्याची परंपराही हजारो वर्षापासून आहे. त्यातून अंधार, अज्ञान आणि वाईटावर प्रकाश, ज्ञान आणि एकतेच्या विजयाचे प्रतीक मानण्यात येते. पण हा दिप लावल्यानं मुस्लिम समाजाच्या भावना दुखावत असल्याचे सांगून ही परंपरा बंद कऱण्याचा प्रयत्न झाला. यावर मद्रास न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांनी राज्य अधिकाऱ्यांना टेकडीवरील पवित्र दिवा लावला जाईल याची खात्री करण्याचे आदेश दिले. (Tamil Nadu)
न्यायालयाने याचिकाकर्त्यासह अन्य दहा लोक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना टेकडीवर चढून दिवे लावण्याची परवानगी दिली होती. मात्र यावेळी झालेली मोठी गर्दी पाहता पोलिसांनी याचिकाकर्त्याला आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना टेकडीच्या शिखरावर पोहोचण्यापासून रोखले. त्यामुळेच आता येथे मोठा वाद सुरु झाला आहे. या दिप प्रज्वलनाबाबत असलेल्या आख्यायिकेनुसार, भगवान शंकर हे ज्योतीच्या स्वरूपात पृथ्वीवर अवतरले. त्यातूनच कार्तिगाई दीपम म्हणून साजरे केले जाते. मात्र १९२० पासून, मंदिर आणि दर्गा व्यवस्थापनामध्ये टेकडीच्या मालकी आणि हक्कांवरून वाद सुरू आहे. हा वाद धार्मिक परंपरा, ऐतिहासिक जमीन विवाद आणि प्रशासन यांच्यामध्ये होता. त्यात न्यायालयाच्या आदेशाची भर पडली. यातून हिंदूसंघटना आक्रमक होण्यासाठी तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम यांचा निर्णय कारणीभूत ठरला. (Social News)

डीएमकेने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु केली आहे. कारण मंदिर-दर्गा वादात, त्यांनी हिंदू पक्षाच्या बाजुने निर्णय घेतल्याचा आरोप आहे. न्यायालयाचा निर्णय तामिळनाडू सरकारने अंमलात आणण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाकडे पोहोचले. तिथे एकल खंडपीठाचा आदेश कायम ठेवण्यात आला. न्यायालयाने राज्य यंत्रणेने जाणूनबुजून आदेशाचे उल्लंघन केल्याची टिपण्णीही केली. असे असूनही, तामिळनाडू सरकारने माघार घेतली नसून आता विशेष रजा याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या सर्वात विश्व हिंदू परिषदेने द्रमुक सरकारवर हिंदूविरोधी भूमिका स्वीकारल्याचा आरोप केला आहे आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. (Tamil Nadu)
========
हे देखील वाचा : Saudi Arabia : सौदीचे वाळवंट जलमय !
========
हे सर्व होत असतांना सोशल मिडियावर जी. आर. स्वामीनाथन यांच्या समर्थनार्थ मोठी मोहीम सुरु झाली आहे. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या निर्णयांचे सर्वोच्च न्यायालय आणि संयुक्त राष्ट्रांनीही कौतुक केले आहे. त्यांच्याविरुद्धच्या महाभियोगाच्या कारवाईमुळे न्यायपालिका आणि राजकारण यांच्यातील संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
