Home » वडिलांचे सिनेमे फ्लॉप ठरल्याने करण जौहरच्या आईला करावे लागले होते हे काम

वडिलांचे सिनेमे फ्लॉप ठरल्याने करण जौहरच्या आईला करावे लागले होते हे काम

करण जौहरने आयुष्यात पैसे कमावण्यासाठी फार कष्ट केल्याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. करण जौहर म्हणतो की, प्रतिदिन 16 ते 20 तास मी काम करतो.

by Team Gajawaja
0 comment
Share

Karan Johar Life Journey : करण जौहरचे नाव बॉलिवूडमधील टॉप सिनेनिर्मात्यांमध्ये केले जाते. करणचे वडील यश जौहर एक प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसर होते. नेपोटिज्ममुळे करणला वेळोवेळी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याशिवाय करण जौहरवर सर्वकाही विरासतमध्ये मिळाले आहे असा आरोपही लावला जातो. अशातच करणने एका मुलाखतीत आपल्या परिवाराबद्दलच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे. करण जौहरने म्हटले की, आयुष्य एक काळ असा आला होता जेव्हा परिवाराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता.

करण जौहरच्या वडिलांनी दोस्ताना, अग्निपथ, कुछ कुछ होता है असे एकापेक्षा एक उत्तम सिनेमे तयार केले. आशातच एका मुलाखतीत करण जौहरने आपल्या वडिलांबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या. करणने म्हटले की, दोस्तानानंतर यश जौहर यांचे सातत्याने पाच सिनेमे फ्लॉप ठरले होते,

करण जौहरच्या आईला करावे लागले होते हे काम
करणने सांगितले की, वडिलांचा पहिला सिनेमा फ्लॉप झाला तेव्हा आईला परंपरांगत मिळालेले दागिने विकावे लागले होते. दागिने विकून मिळालेल्या पैशातून त्यांनी फायनान्सर्स यांचे पैसे चुकते केले होते. जेव्हा दुसरा सिनेमा फ्लॉप झाले तेव्हा पुन्हा एकदा आईला दागिने विकावे लागले. याशिवाय वडिलांना काही संपत्तीही विक्री करावी लागली होती.

करणच्या मते भले वडिल प्रोड्यूस होते. पण ते मध्यम अथवा अप्पर मध्यम वर्गातील होते. याचा अर्थ असा होतो की, त्यांच्या टेबलवर नेहमीच जेवण असायचे. त्यांच्याकडे मुलांना उत्तम शाळेत पाठवण्यासाठी पैसे आणि कारही होती. पण वडिलांकडे एवढे पैसे नव्हते की, ते दुसऱ्या देशात फिरू शकतील. (Karan Johar Life Journey)

करण पुढे म्हणतो की, “आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहे. मी खूप मेहनत केली आहे. कधीकधी 18 तास काम करतो. मी विकेंड अथवा राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीही काम करतो. जवळजवळ 16-20 दिवस काम करतो. मी केवळ 5 तासच झोपतो. मी फार मेहनतीने पैसे कमावले असून त्याबद्दल मला कोणतीही लाज वाटत नाही.”


आणखी वाचा :
शत्रुघ्न सिन्हांना या अभिनेत्रीवर होते पहिले प्रेम, स्वत:च केला खुलासा
‘औरों में कहा दम था’ सिनेमाची या कारणास्तव निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.