बनारसी आणि कांजीवरम साड्या महिलांना घालणे फार आवडतात. कारण अशा साड्यांमुळे रिच लूक मिळतो. अभिनेत्री सुद्धा कांजीवरम आणि बनारसी साड्या नेसताना दिसून येतात. या साड्या अत्यंत मेहनतीने बनवल्या जातात आणि महाग सुद्धा असतात. दरम्यान, काही महिलांना कांजीवरम आणि बनारस साड्यांमध्ये फरक कळत नाही. अशातच या दोन्ही साड्यांमधील नक्की काय फरक आहे हे पाहूयात. (Kanjivaram vs Banarasi Saree)
कांजीवरम आणि बनारसी साड्या जवळजवळ दिसण्यास एकसमान दिसतात. त्याचसोबत दोघांच्या फॅब्रिकची चमक ही समान असते. यामुळे काही फरक कळणे मुश्लिक होते. मात्र त्या पूर्णपणे वेगळ्या असतात.
कांजीवरम आणि बनारस साडीचा इतिहास
कांजीवरम साडी मूळची दक्षिण भारतातील तमिळनाडू मधील आहे. या साड्या खऱ्या रेशम गोल्डन धाग्यांपासून तयार केली जाते. बनारसी साडीबद्दल बोलायचे झाल्यास तर ती नावावरुनच कळते. ही बनारसची ओळख आहे. बनारसच्या साड्या जरीच्या धाग्यापासून तयार केली जाते आणि विविध पॅटर्न पासून तयार केली जाते.
साड्यांचे प्रिंट असते वेगळे
बनारसी साड्यांचा इतिहास २००० वर्ष जुना आहे. यामध्ये मुगल प्रेरित डिझाइन केले जातात. यावर तुम्हाला बेल, झाडं, दोमक सारखे पॅटर्न तयार केलेले असतात. याचे डिझाइन खुप सुटसुटीत असतात. (Kanjivaram vs Banarasi Saree)
लाइट पडल्यानंतर बदलतो रंग
कांजीवरम साड्यांना तुतीच्या रेशम पासून तयार केल्या जातात. त्यांना हात लावल्यानंतर हलक्या आणि मऊ होतात. तर बनारसी साडी आपल्या जरीच्या वर्कच्या कारणास्तव थोडी भारी होऊ शकते. जर त्यावर लाइट पाडल्यास तर त्याचे फॅब्रिक वेगवेगळ्या प्रकारे चमकतात. याचा धागा खेचल्यानंतर त्यामधून लाल सिल्क निघते.
हेही वाचा- कांजीवरम साडी अशी ओळखा