भारताच्या राजकारणात सध्या जात हा विषय महत्त्वाचा झाला आहे. जातीय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे. इकडे भारतात जातीय राजकारण तापले असतांनाच अमेरिकेच्या निवडणुकीतही आता वांशिक राजकारणानं प्रवेश केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या कोण आहेत, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कमला या भारतीय असल्याचा अभिमान बाळगत होत्या, मात्र त्या अचानक कृष्णवर्णीय कशा झाल्या असा थेट सवाल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होत आहेत. यात डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस यांचे नाव पुढे कऱण्यात आले आहे. सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती असलेल्या कमला हॅरिस यांची लढत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर होणार आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमला हॅरिस यांच्या वांशिक ओळखीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. (Kamala Harris)
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या प्रचारत वांशिक मुद्दा पुढे आला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या वर्णाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय असल्याचे सांगणा-या हॅरिस या अचानक कृष्णवर्णीय का झाल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक अमेरिका हा देश स्वतःला कितीही आधुनिक म्हणवून घेत असला तरी अमेरिकेच्या राजकारणात गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. कमला हॅरिस यांची आई ही भारतीय तर वडील हे जमैकन आहेत. कायद्याचे शिक्षण घेलेल्या कमला हॅरिस यांनी वर्णद्वेषी पोलिसांवर कारवाई करण्यासाठी जस्टिस इन पोलिसिंग या कायद्याला पाठिंबा दिला होता. हा कायदा पास झाला नसला तरी कमला हॅरिस यांचे प्रारंभिक मत कृष्णवर्णियांना असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. (Kamala Harris)
हाच मुद्दा हाताशी धरुन डोनाल्ड ट्रम्प हॅरिस यांच्याविरोधात प्रचार करीत आहेत. पुढारलेल्या अमेरिकेत अद्यापही काहीवेळा कृष्णवर्णींयांना अपमानजनक वागणूक दिली जाते. कृष्णवर्णीयांची अमेरिकेतील संख्या अगदी मोजकीच होती. मात्र युरोपातून अमेरिकेत स्थाईक होण्याचे प्रमाण वाढले, आणि सोबतच कृष्णवर्णीयांचे प्रमाणही वाढले. युरोपियान गौरवर्णीय आफ्रिकेतील हजारो कृष्णवर्णीयांना गुलाम बनवून सोबत आणत होते. या गुलामांना कुठल्याही सुविधा नव्हत्या. त्यांची जनावरांसारखी खरेदी-विक्री केली जात असे.
या कृष्णवर्णींयाना मतदानाचा हक्क नव्हता. मतदानाचाही नव्हता. कोर्टातही न्याय मागायचा हक्क नव्हता. एखादी छोटी चूक झाली तरी या कृष्णवर्णीयांना जिवंत जाळल्याच्या घटना अमेरिकेत झाल्या आहेत. आता या देशातील परिस्थिती सुधारली आहे. बराक ओबामांसारखे कृष्णवर्णीय अध्यक्ष या देशाला लाभले आहेत. तरीही काही प्रमाणात हा भेदभाव पाळला जातो. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलेल्या कमला हॅरिस यांची उमेदवारी नक्की झाली आणि त्या नेमक्या कोण याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी याच वांशिक मुद्यावर बोट ठेवलं आहे. (Kamala Harris)
=================
हे देखील वाचा : ट्रम्प यांच्या हल्यामागच्या चर्चा
================
कमला हॅरिस यांच्या आईचे नाव श्यामला गोपालन आहे. त्यांचा जन्म चेन्नई येथे झाला. श्यामला लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीतील जैववैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या. डोनाल्ड जे. हॅरिस हे कमला हॅरिसचे वडील आहेत. ते जमैकन असून अर्थशास्त्रज्ञ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रोफेसर आहेत. १९६३ मध्ये ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून पीएचडी मिळविण्यासाठी अमेरिकेत आले. नागरी हक्क चळवळीच्या माध्यमातून त्यांची श्यामला गोपालन यांची भेट झाली. तेथेच या दोघांचे प्रेम झाले आणि लग्नही.
त्यानंतर दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले. कमला हॅरिस यांचा जन्म ऑकलंड, कॅलिफोर्निया येथे झाला आणि वॉशिंग्टनमधील हॉवर्ड विद्यापीठ, कृष्णवर्णीय विद्यापीठात शिक्षण घेतले. डग्लस एमहॉफ हे कमला हॅरिस यांचे पती आहेत. हॅरिस यांच्या कमला या दुस-या पत्नी आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उपराष्ट्रपती तसेच पहिल्या आशियाई अमेरिकन उपराष्ट्रपती आहेत. ५ नोव्हेंबर रोजीच्या निवडणुकीत त्या जिंकल्या तर अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. कमला हॅरिस यांचे मातृवंश भारतातील चेन्नई येथील आहे. तर पितृवंशज सेंट ॲन, जमैका येथून आहे. आता त्यांचा हाच वांशिक मुद्दा अमेरिकेच्या राजकारणात गाजणार आहे. (Kamala Harris)
सई बने