हिंदू धर्मात काही मान्यता आणि परंपरा आहेत. त्यानुसार हिंदू धर्मातील लोक देवाची मोठ्या भक्तिभावाने पुजा करतात. मात्र पूजा करताना काही गोष्टींची सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते. जेणेकरुन देवाचा आशीर्वाद-कृपा आपल्यावर नेहमीच राहते. अशाच विविध मान्यतांपैकी मान्यतांपैकी एक म्हणजे पुजेतील दिवा विझणे. सनातन धर्मात अशी कोणतेही पूजा-पाठ नाही ज्यामध्ये दिवा लावला जात नाही. अशी मान्यता आहे की, पूजा करतेवेळी देवी-देवतांची आरती केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळेच प्रत्येक पूजेवेळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा लावून आरती केल्याने आयुष्यातील अंध:कार दूर होतो आणि व्यक्तीच्या आयुष्यात उजेड आणि ज्ञानाचे आगमन होते. जर आरती करतेवेळी दिवा विझला तर काय होते? तर जाणून घेऊयात ज्योतिष याबद्दल नक्की काय सांगतात. (Jytoishshatra)
अशी मान्यता आहे की, जर पुजेवेळी दिवा विझला तर पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होण्यास काही अडथळे येऊ शकतात. पूजेत दिवा विझणे म्हणजे देवी-देवता नाराज असल्याचे सुद्धा संकेत देतात. आणखी एका मान्यतेनुसार, दिवा विझण्याचे संकेत व्यक्ती खऱ्या मनाने देवाची पूजा करत नाही असे सुद्धा होतात. दरम्यान, दिवा विझण्याची काही कारणे असू शकतात.
विद्वानांचे असे मानणे आहे की, जर पुजेदरम्यान दिवा विझल्यास तुम्ही देवापुढे हात जोडून माफी मागू शकता आणि नंतर दिवा पुन्हा प्रज्वलित करु शकता. पूजा करतेवेळी दिवा लावताना काही सावधगिरी सुद्धा बाळगली पाहिजे. कोणताही व्यक्ती पूजा करत असेल तर त्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावे की, आरतीवेळी दिवा विझू देऊ नये. त्यासाठी दिवा तयार करताना त्याची जरुर काळजी घ्यावी. दिव्यात योग्य प्रमाणत तेल किंवा तूप आहे की नाही हे सुद्धा पहावे.
दिव्यात वापरण्यात येणाऱ्या वातीसाठी कापूस ही उत्तम प्रकारचा असावा. या व्यतिरिक्त ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की, ज्या ठिकाणी आरती करत आहात तेथे अधिक वारा येत असेल तर दिवा विझणार नाही अशा पद्धतीने तो ठेवावा. तसेच आसपास एखादा पंखा, कूलर सुरु असेल तर तो ही बंद करणे योग्य ऑप्शन असेल.(Jytoishshatra)
हे देखील वाचा- दिवाळीच्या १५ दिवसानंतर लागणार अखेरचे चंद्र ग्रहण, सूतक काळापूर्वी साजरी होणार देव दिवाळी
तसेच संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवा लावण्याची वेळ असते तेव्हा सुद्धा काही गोष्टी करणे टाळाव्यात. जसे की, झोपणे, केर काढणे. अशाने घरात येणारी देवी दरवाजातूनच निघून जाते असे म्हटले जाते. त्यामुळे दिवा लावताना या गोष्टी करणे टाळाव्यातच पण घरात अशुभ आणि वाईट गोष्टींबद्दल ही बोलणे टाळावे असे सांगितले जाते.