घरातून निघाल्यानंतर बहुतांश लोक सार्वजनिक ठिकाणी आपला फोन चार्जिंगल लावतात. मात्र असे तुम्ही करत असाल तर सावध व्हा. कारण सार्वजनिक चार्जिंग स्थानकात अशी चुक करणे भारी पडू शकते. खरंतर सध्या स्कॅमर्स जूस स्कॅमर्स स्कॅमच्या माध्यमातून लोकांना आपले शिकार बनवत आहेत.आरबीआयने याच संदर्भात नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.(Juice Jacking Scam)
आर्थिक क्षेत्रात वित्तीय फसवणूक ते आरबीआयच्या एका बुकलेटनुसार जूस जॅकिंग स्कॅम हा एक प्रकारचा घोटाळा आहे. याच्या माध्यमातून सायबर हल्लेखोर मोबाईल मधून महत्त्वाचा डेटा चोरी करतात आणि यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होते.
जूस जॅकिंग स्कॅम मोबाईल आणि लॅपटॉप सारख्या डिवाइसमध्ये महत्त्वाचा डेटा चोरी करण्याची एक पद्धत आहे. अशा प्रकारचे स्कॅम करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी असणारे चार्जिंग स्टेशनवर मॅलवेअर असणारे सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इंस्टॉल केले जाते. सायबर हल्लेखोर सार्वजनिक ठिकाणी, जसे युएसबी पोर्ट किंवा चार्जिंग कियोक्सच्या माध्यमातून लोकांना आपले शिकार बनवतात.
लक्षात ठेवा की, मोबाईलच्या चार्जिग पोर्टचा वापर फाइल किंवा डेट ट्रांन्सफर करण्यासाठी केला जाऊ शको. सायबर हल्लेखोर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग पोर्टचा वापर तेथे जोडले गेलेल्या फोनमध्ये मैलवेअर ट्रांसफर करण्यासाठी करतात. अशातच एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल फोन मधील संवेदनशील डेटा जसे की, ईमेल, एसएमएस, सेव्ह करण्यात आलेले पासवर्ड यावर ही नियंत्रण करु शकतात. अशातच तुमचा डेटा चोरी केला जाऊ शकतो.
जूस जॅकिंग स्कॅम शक्यतो आर्थिक नुकसान पोहचवते, याच्या माध्यमातून कनेक्टेड डिवाइसमधून संवेदनशील माहिती जसे की, पासवर्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा बँकिंग क्रेडिंशियल्स चोरी केले जाऊ शकतात. हल्लेखोर चोरी केलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक खात्यापर्यंत पोहचू शकतात.
सामान्य माणसाला कसे बनवतात शिकार
-हे सायबर हल्लेखोर सार्वजनिक चार्जिंग स्थानकात सॉफ्टवेअर किंवा मैलवेअर इंस्टॉल करतात. यासाठी ते विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल्स किंवा गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या चार्जिंग स्थानकांना निशाणा बनवतात.
-त्याचसोबत फ्री चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली किंवा नागरिकांना याचा वापर करण्यासाठी भुलवण्यासाठी अधिकृत चार्जिंगसारखे पॉइंट तयार करतात.
-जेव्हा एखादा युजर्स आपल्या डिवाइसला युएसबी केबलच्या माध्यमातून या चार्जिंग स्थानकात जोडतात तेव्हा सॉफ्टवेअर किंवा मैलवेयरच्या माध्यमातून हल्लेखोर डिवाइसपर्यंत पोहचतात. त्यानंतर ते लोकांच्या कनेक्टेड डिवाइसमधून संवेदनशील डेटा चोरी करु शकतात. काही प्रकरणात तर नागरिकाच्या डिवाइसवर मैलवेयर इंस्टॉल केला जातो. त्यामुळे हल्लेखोर हा चार्जिंग स्थानकातून फोन काढल्यानंतर ही प्रत्येक ठिकाणाहून तो एक्सेस करु शकतात. (Juice Jacking Scam)
हेही वाचा- क्रेडिट कार्डच्या अधिक वापरामुळे IT return भरतेवेळी होईल समस्या
‘या’ पासून कसा बचाव कराल?
– सार्वजनिक,अज्ञात चार्जिंग पोर्ट आणि केबलचा वापर करण्यापासून दूर रहा. शक्य असेल तर डिवाइस चार्ज करण्यासाठी तुमचे चार्जर किंवा पोर्टेबल पॉवर बँकेचा वापर करा.
-एक्स्ट्रा प्रोटेक्शनच्या रुपात डिवाइसची सिक्युरिटी सेटिंग, जसे की पासकोड, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक इनेबल करा.
-सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वायफायचा वापर करताना सावधान. तेव्हा कोणतेही आर्थिक ट्रांजेक्शन करु नका.
-या व्यतिरिक्त सुनिश्चित करा की, तुमचे डिवाइस लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतेय. त्याचसोबत त्यात अप-टू-डेट अँन्टीवायरस सॉफ्टवेअर असावा.