रोमन कॅथोलिक चर्चचे 266 वे पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीबद्दल गेली अनेक दिवस येत असलेल्या बातम्यांमुळे त्यांचे चाहते काळजीत पडले होते. 13 मार्च 2013 रोजी पोप म्हणून निवडून आलेल्या जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ म्हणजेच, पोप फ्रान्सिस यांची तब्येत गेल्या काही दिवसात बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या काळात एक दिवस पोप फ्रान्सिस यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होणार नाही, अशी खात्री खुद्द त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांना झाली. डॉक्टरांनी पोप फ्रान्सिस यांच्यावर उपचार थांबवण्याचा निर्णयही घेतला. पण ऐनवेळी चमत्कार झाला, तिथे उपस्थित असलेल्या एका नर्सनं पोप फ्रान्सिस यांच्यावर होणा-या उपचारात एक निर्णय घेतला, आणि काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या पोप फ्रान्सिस यांची तब्बेत लगेच सुधारली. आता त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली असून त्यांची तब्बेत झपाट्यानं सुधारत असून त्यांच्या तब्येतीबाबत निर्णय घेतलेल्या नर्सचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Jorge Mario Bergoglio)
रोमन कॅथोलिक चर्चचे 266 वे पोप फ्रान्सिस हे पहिले दक्षिण अमेरिकन पोप आणि एक सहस्राब्दीपेक्षा जास्त काळातील युरोपबाहेरील पहिले पोप आहेत. सध्या पोप फ्रान्सिस चर्चेत आले आहेत, ते त्यांच्याबद्दल झालेल्या एका चमत्कारामुळे. 88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांना फेब्रुवारीमध्ये श्वसनाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर सर्वोत्तम डॉक्टर उपचार करत होते. मात्र पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा होत नव्हती. पोप फ्रान्सिस यांची तब्बेत दिवसेंदिवस अधिक खालावत चालली होती. पाच आठवडे पोप फ्रान्सिस यांच्यावर उपचार करण्यात येत होते. (International News)
मात्र त्यांच्या छातीमधील संसर्ग अधिक पसरल्यानं डॉक्टरांनी हार मानली होती. अखेर डॉक्टरांनी पोप फ्रान्सिस यांच्यावर उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला. पोप फ्रान्सिस मृत्यूच्या इतक्या जवळ आले की वैद्यकीय पथकाने त्यांच्यावरील उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला. पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू वेदनामयी होणार नाही, असे डॉक्टरांचे मत होते. पण त्याचवेळी तेथील अनुभवी नर्स मॅसिमिलियानो स्ट्रॅपेटी यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्यावर सुरु असलेले उपचार शेवटच्या सेकंदापर्यंत सुरु ठेवावे, अशी विनंती डॉक्टरांना केली. रोमच्या जेमेली रुग्णालयात पोप फ्रान्सिस यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या तब्येतीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. पोप फ्रान्सिस यांच्या तब्बेतीला आराम पडावा म्हणून त्यांचे चाहते प्रार्थना करत होते, अशा परिस्थितीत पोप फ्रान्सिस यांची तब्बेत सुधारावी म्हणून डॉक्टरही सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. (Jorge Mario Bergoglio)
पण पोप फ्रान्सिस या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते, त्यामुळेच डॉक्टरांनी निराश होत, त्यांच्यावर उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र नर्स मॅसिमिलियानो स्ट्रॅपेटी यांनी सल्ला दिल्यावर डॉक्टरांनी नव्यानं उपचार सुरु केले. यावेळी चमत्कार झाला. पोप फ्रान्सीस हे उपचाराला साथ देऊ लागले. त्यांच्या तब्बेतीमध्ये झपाट्यानं सुधारणा होऊ लागली. त्यांच्या छातीमधील संसर्ग कमी झाला आणि पाच आठवड्याच्या उपचारानंतर त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. पोप फ्रान्सिस यांच्यावर झालेल्या उपचाराची सर्व माहिती जेमेली रुग्णालयाचे सर्जन सर्जिओ अल्फिएरी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली. पोप फ्रान्सिस यांनी उलट्या होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. ते पाच आठवडे रुग्णालयात होते. या काळात त्यांची तब्बेत किमान चारवेळा अती गंभीर झाली होती. 28 फेब्रुवारी रोजी तर पोप फ्रान्सिस यांना अधिक त्रास झाला होता. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांवर दबाव वाढला आणि काही काळ त्यांचा श्वास थांबला होता. अशावेळी पोप फ्रान्सिस यांच्यावर उपचार करणारी वैद्यकीय टिमही तणावाखाली आली होती. (International News)
==============
हे देखील वाचा : Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
या टिमची पूर्ण खात्री झाली की पोप फ्रान्सिस यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पोप यांच्यावरील उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला. पण पोपच्या वैयक्तिक परिचारिका, मॅसिमिलियानो स्ट्रॅपेटी यांना उपचार थांबवण्याबाबत स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी वैद्यकीय पथकाला उपचार सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. या काही मिनिटातच चमत्कार झाला आणि पोप फ्रान्सिस यांची तब्बेत सुधारु लागली. 10 मार्च रोजी पोप एवढे ठणठणीत झाले की ते व्हीलचेअरवरून वॉर्डमध्ये फिरू लागले. एका संध्याकाळी त्यांनी त्यांच्यावर उपचार करणा-या सर्व टिमला पिझा पार्टीही दिली. त्यानंतर पोप यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली असून ते व्हॅटिकन सिटीमधील त्यांच्या घरी, कासा सांता मार्टा येथे सध्या आहेत. त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी पुढचे दोन महिने आराम करावा लागणार आहे. या सर्वात पोप यांच्यासोबत परिचारिका मॅसिमिलियानो स्ट्रॅपेटी असून पोप फ्रान्सिस यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. (Jorge Mario Bergoglio)
सई बने