पालकत्वाची जबाबदारी फार आव्हानात्मक असते. मात्र मुलाच्या व्यक्तिमत्वासह त्याचे वागणे-बोलणे सुद्धा पालकांनी दिलेल्या शिकवणीवर अवलंबून असते. पालकत्वाचे काही प्रकार असतात. जे काळासह बदलत चालले आहेत. प्रत्येक पालकाचा आपल्या मुलाकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा असतो. पालकाच्या रुपात आपल्याला सध्याच्या काळानुसार चालणे आणि मुलाला दृष्टीकोनातून काही गोष्टी पाहणे हे फार गरजेचे झाले आहे. अशातच तुम्हाला जेलीफिश पॅरेंटिंग (Jellyfish Parenting) म्हणजे नक्की काय हे माहितेय का?
जेलीफिश पॅरेंटिंग म्हणजे काय?
ट्रेडिशनल ऑथेरिटेटिव आणि हेलिकॉप्टर पॅरेंटिंग टेक्नीकपेक्षा वेगळी अशी जेलीफिश पॅरेंटिंग आहे. यामध्ये पालक फार शांत आणि समजूतदार अतात. ते मुलांना स्वत:चा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतात. त्याचसोबत मुलांना जुन्या विचारांबद्दल ही सांगत राहतात. जेणेकरुन मुलांनी आपल्या मर्यादेत राहून आयुष्याचा आनंद घेतील. याचे नाव जेली माशावरुन ठेवले आहे. त्याची विशेषता अशी की, तो मासा अडॅप्टिबिलिटी आणि फ्लेक्सीबिलिटीचे उत्तम उदाहरण आहे.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, जेलीफिस एक मासा असून तो स्वतंत्र आणि मुक्त असतो. त्याचप्रकारे जेलीफिश पॅरेंटेंस सुद्धा मुलांना आपले अनुभव आणि चुकांबद्दल सांगत त्यांच्या आयुष्यात त्यांना गाइड करण्यास मदत करतात. ते मुलांसाठी कोणतेही नियम तयार करत नाही. तर मुलांना स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेत पालक भावनात्मक रुपात आपल्या मुलांचे समर्थन करतात. जेणेकरुन त्यांच्यामध्ये ईमानदारीची भावना टिकून राहिल.
भारतात काय आहे याचा स्कोप
भारतातील मुलांना परंपरावादी सिद्धांतांनुसार वाढवले जाते. ज्यामध्ये परिवार आणि नियम यावर अधिक भर दिला जातो. आज सुद्धा बहुतांश मुलं आपल्या पालकांनी घेतलेल्या निर्णयानुसारच चालतात. संयुक्त परिवारात संस्कृती आणि परंपरेनसुसार एका मुलाच्या भावी आयुष्यासाठी काही पिढ्यांचे योगदान लाभते. अशातच जेलीफिश पॅरेंटिंगसाठी अशा परिवारात सेट होण्यास वेळ लागू शकतो. भारतात मुलांची काळजी पालकांच्या देखरेखीखालीच केली जाते.(Jellyfish Parenting)
हेही वाचा- नातेवाईकांना दिलेले ‘हे’ सल्ले कधीच ऐकू नका, बिघडू शकते नाते
जेलीफिश पॅरेंटिंगचा मुलांवर होणारा प्रभाव
जेलीफिशची विशेषता अशी की यामध्ये पालक मुलांकडून अधिक डिमांड करत नाहीत. त्याचसोबत त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याचे नाते असते. विविध पॅरेटिंगचा मुलांच्या आयुष्यावर प्रभाव होत असतो. अशातच जेलीफिश पॅरेटिंगचा प्रभाव नक्की काय होते हे पहा
-जेलीफिश पॅरेटिंगमध्ये मुलांवर कोणत्याही प्रकारचे कंट्रोल नसते. त्यामुळे मुलांमध्ये आत्मनियंत्रणाची कमतरता असते.
-त्यांचा आत्मसन्मान कमी होतो आणि त्यांनी घेतलेले निर्णय योग्यच असतील असे नव्हे.
-मुलांना नियमात न ठेवल्याने त्यांचे वागणे ही बिघडले जाते.
-मुलं वाईट मार्गाला जाऊ शकतात.
-मुलं आपल्या मनानुसार वागतात.
-पालकांच्या प्रति ते आदर करत नाहीत.