वैद्यकिय क्षेत्रात खुप प्रगती झाली आहे. मात्र आजही कॅन्सर असा गंभीर आजार आहे त्यात रुग्णाचा मृत्यू होतोच. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. त्यापैकीच एक दुर्मिळ प्रकार म्हणजे जेली बेली. काही देशांमध्ये या कॅन्सरची प्रकरणे वाढत आहेत. वैद्यकीय भाषेत बोलायचे झाल्यास तर जेली बेली कॅन्सरला स्यूडो माइक्सोमा पेरिटोनी असे म्हटले जाते. खरंतर कॅन्सरमध्ये पेल्विक एरियात जेली तयार होती. ती वाढत जाऊन आतड्यांपर्यंत पोहचते. डॉक्टरांच्या मते, या कॅन्सरची प्रकरणे फार कमी आढळतात. मात्र याची लक्षणे ओळखणे अत्यंत गरजेचे असते. (Jelly belly cancer)
जेली बेली अपेंडिक्सच्या आतमधील लेअरवर एक गाठीच्या रुपात सुरु होते. त्यानंतर ती हळूहळू वाढली जाते. या कॅन्सरमुळे शरीरातीलकाही अवयव ही प्रभावित होऊ लागतात आणि पोटासंबंधित काही समस्या होतात. या बद्दल डॉक्टर काय म्हणतात हे पाहूयात.
कॅन्सर सर्जन असे म्हणतात की, जेली बेली कॅन्सर संपूर्ण शरीरात फैलावत नाही. तर केवळ पोटाच्या आतपास असलेल्या अवयवांपर्यंत मर्यादित राहतो. जेबी बेली अपेडिंक्स पासून सुरु होत हळूहळू रुग्णाच्या आताड्यांपर्यंत आणि पेल्विकच्या येथे फैलावतो. याबद्दल कळणे अत्यंत मुश्किल असते. मात्र जेव्हा ट्युमर वाढू लागतो तेव्हा भूकेच्या पॅटर्नमध्ये बदल होण्यासह काही लक्षणं दिसून येतात. त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.
या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
डॉक्टर असे सांगतात की, जेली बेली कॅन्सर रुग्णाच्या पोटात सूज, पोट दुखी, श्वास घेण्यास समस्या, पोट भरलेले राहणे, फुलमे अशा समस्या उद्भवतात. जर अशा प्रकारची लक्षणे सतत दिसून येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.((Jelly belly cancer)
हेही वाचा-Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !
काय आहे उपचार
काय आहे उपचार जेली बेली कॅन्सरवर उपचार म्हणजे मेडिकेशन व्यतिरिक्त काही प्रकारच्या थेरपी अथवा सर्जरी सुद्धा केली जाऊ शकते. त्यासाठी रेडिएशन थेरपी अथवा डारगेटेड शेरपी केली जाते. परंतु याच्यापासून दूर राहण्यासाठी पोटासंबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. त्याचसोबत याचा धोका कमी करण्यासाठी योग्य खाण्यापिण्याकडे आणि डेली रुटीनमध्ये एक्सरसाइज, वॉक सारख्या हेल्दी सवयी फॉलो कराव्यात.