जावेद अख्तर (Javed Akhtar) हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते नुकतेच पाकिस्तानात एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे पाकिस्तानला बरोबर टोमणे मारले. परंतु त्यांनी केलेल्या विधानांवरुन पाकिस्तानच्या काही बड्या हस्तींनी त्यांच्यावर टीका केली. पण भारतात त्यांनी केलेल्या विधानांचे कौतुक केले जात आहे. आता ते भारतात परतले असून त्यांनी त्यावरचे आपले मत व्यक्त केले आहे,
जावेद अख्तर यांनी जेव्हापासून पाकिस्तानात २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर विधान केले तेव्हापासून ते फार चर्चेत आले आहेत. गीतकार जावेद अख्तर यांनी या मुद्द्यावर आपले मत मांडले तेव्हा पाकिस्तानच्या जनतेने त्यांच्या या विधानावर खुप टाळ्या वाजवल्या खऱ्या. पण तिच लोक त्यांना नंतर वाईट बोलू लागली. भारतात आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, एका इवेंट दरम्यान, त्यांनी पाकिस्तानात दिलेल्या आपल्या विधानाबद्दल भाष्य केले. जावेद अख्तर यांनी असे म्हटले की, मी भले विधान केले असेन पण माझे बोलणे स्पष्ट असते आणि त्यापासून मी कधीच मागे हटत नाही. हा मुद्दा आता खुप मोठा झाला आहे. मला लाज वाटू लागली आहे. मला असे वाटते की, आता मी याबद्दल आणखी काही बोलू नये. जेव्हा मी भारतात परतलो तेव्हा मला असे वाटले की मी वर्ल्ड वॉर-३ जिंकलो आहे. या विधानावरुन मीडिया आणि लोकांनी ऐवढ्या प्रतिक्रिया दिल्या की मी फोन घेणेच बंद केले. मला असे वाटतेय की, मी असा कोणता तीर मारला आहे? मला हे बोलायचे होते. आपण शांत राहिले पाहिजे? नाही ना. त्यामुळे मला असे वाटते की, माझ्या विधानामुळे पाकिस्तानात आता खळबळ उडाली असेल.
त्यांनी पुढे असे म्हटले की, लोक मला शिव्या देतायत. असे विचारले जातेय मला विजा का दिला गेला. मला केवळ हेच लक्षात राहिल तो एक देश आहे. मी ज्या देशात जन्मलो, तेथे थोडी मी वादग्रस्त विधान करत आलोय. तोच देश जेथे मी मरणार आहे तेथे मी का घाबरु. मी येथे घाबरुन राहत नाही तर तेथील गोष्टींवरुन मी का घाबरु? (Javed Akhtar)
हे देखील वाचा- सोनू निगम सोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की, शिवसेना आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल
हे केले होते विधान
जावेद अख्तर हे उर्दूतील प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या आठवणीतील आयोजित एका कार्यक्रमात गेले होते. त्याच दरम्यान, एका महिलेच्या प्रश्नाला उत्तर देत त्यांनी पाकिस्तानची पोलखोल केली होती. त्यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. तेव्हा असे म्हटले की, जर भारतीय या बद्दल तक्रार करतात तुम्ही नाराज होऊ नये. ती लोक आज ही तुमच्या देशात फिरत आहेत. जर ही तक्रार भारतीयांच्या हृदयात असेल तर तुम्ही वाईट वाटून घ्यायला नाही पाहिजे.