Japan Restaurant : आपण रेस्टॉरंट किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जातो. सर्वसामान्यपणे हॉटेल किंवा रेस्टॉरंमध्ये जाण्याबद्दल काही अटी नसतात. पण जगभरात असे काही रेस्टॉरंट्स आणि कॅफे आहेत ज्यासाठी काही खास नियम तयार करण्यात आले आहेत. खरंतर जपानामधील टोकियो येथे एक रेस्टॉरंट आहे जेथे पुरुष मंडळींना एकटे जाण्यास मनाई आहे. यामुळे त्यांना आपल्यासोबत एखाद्या महिलेसोबतच जावे लागते. हे अनोखे रेस्टॉरंट सध्या अधिक चर्चेत आहे.
या रेस्टॉरंटचे नाव ‘निगेटिव्ह कॅफे अॅन्ड बार’ असे आहे. हे रेस्टॉरंट टोकियोमधील शिमोकिताजावा नावाच्या ठिकाणी आहे. फोर्ब्सच्या रिपोर्ट्सनुसार, वर्ष 2020 मध्ये आलेल्या कोरोना माहामारीनंतर हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. हैराण करणारी गोष्ट अशी की, या रेस्टॉरंटचे मालक डिप्रेशनने पीडित आहेत. याच कारणास्तव हॉटेल मालकांनी निगेटिव्ह रेस्टॉरंटची सुरूवात केली होती. जेणेकरून या रेस्टॉरंटमध्ये नकारात्मक विचार करणारी लोक देखील येतील. अशा लोकांसाठी एक खास ठिकाण असावे असे ही हॉटेल मालकांना वाटत होते.
नकारात्मक विचार करणाऱ्यांसाठी खास रेस्टॉरंट
रिपोर्ट्सनुसार, रेस्टॉरंटचे मालक म्हणतात नकारात्मक विचार करणारी लोक दयाळू असतात. यामुळे त्यांच्या कंम्फर्ट झोनची स्थापना केली आहे. खास गोष्ट अशी की, रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बाहेरून आलेले अन्नपदार्थ खाऊ शकता. यासाठी लोकांची कोणताही अडवणूक केली जात नाही. पण एक अट आहे. तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये एखादे ड्रिंक ऑर्डर करावे लागते. तरच तुम्हाला या रेस्टॉरंटमध्ये बसण्यास दिले जाते. याशिवाय ऑर्डर केलेल्या ड्रिंकची किंमत 300 येन म्हणजेच 172 रूपयांपर्यंत असावी. (Japan Restaurant)
जपानमधील आणखी एक विचित्र रेस्टॉरंट
जपानमध्ये आणखी एक विचित्र रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटचे नाव ‘शचीहोको-या’ असे आहे. येथे फूड खाण्याआधी रेस्टॉरंटमधील वेटरला कानशिलात लागावून द्यावी लागते. खास गोष्ट अशी की, या रेस्टॉरंटमध्ये नागरिकांची फार मोठी गर्दीही होते.