Home » इद्रीस एल्बा (Idris Elba): गुप्तहेरांचा राजा ‘जेम्स बॉन्ड’ आता कृष्णवर्णीय?

इद्रीस एल्बा (Idris Elba): गुप्तहेरांचा राजा ‘जेम्स बॉन्ड’ आता कृष्णवर्णीय?

by Team Gajawaja
0 comment
James Bond: Will Idris Elba play the next 007?
Share

गुप्तहेरांचा राजा…भन्नाट गाड्या चालवणारा…दे मार हाणामारी करणारा…नव्या टेक्नॉलॉजीचा चाहता ब्रिटीश गुप्तहेर ‘007’ म्हणजेच जेम्स बॉण्ड (James Bond).  १९५३ मध्ये ब्रिटीश लेखक इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉण्ड नावाच्या गुप्तहेराला जन्म दिला.  

हा जेम्स बॉण्ड (James Bond) नंतर चित्रपट, कॉमिक्स, व्हिडीओ गेममधून प्रचंड लोकप्रिय ठरला. जेम्स बॉण्डच्या चित्रपटांनी इतिहास घडवला. ब्रिटीश गुप्तहेर संस्थेच्या या 007 कोड असलेल्या गुप्तहेराचे लाखो चाहते झाले.  त्यामुळे जेम्स बॉण्डचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर कायमच सुपरहिट झालेत.  

जेम्स बॉण्डची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते. शॉन कॉनरी या अभिनेत्यानं पहिला जेम्स बॉण्ड पडद्यावर साकारला. रॉजर मूर, पियर्स ब्रॉसनन, डॅनियल क्रैग या अभिनेत्यांनी रॉजर मूरची परंपरा पुढे चालवली. आता डॅनियल क्रैग या अभिनेत्यानंतर जेम्स बॉण्ड (James Bond) कोण याबद्दल उत्सुकता आहे. त्यात इद्रीस एल्बा (Idris Elba) या अभिनेत्याचं नाव आल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

Is Idris Elba the next James Bond?

  

जेम्स बॉण्डच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड करणे, ही काही महिन्यांची एक दीर्घ निवड प्रक्रीया असते. यासाठी अनेकांच्या ऑडीशन्स घेतल्या जातात. त्यांची छाननी होते. आता डॅनियल क्रैगनंतर ‘द सुसाइड स्क्वाड’ फेम अभिनेता इद्रीस एल्बा  (Idris Elba) यांचे नाव अग्रेसर आहे. 

गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी चार वेळा नामांकन मिळालेले ४९ वर्षीय इद्रीस एल्बा (Idris Elba) हे कृष्णवर्णीय अभिनेते आहेत. त्यामुळे जेम्स बॉण्ड चित्रपटांच्या मालिकेतला सातवा बॉण्ड हा कृष्णवर्णीय असेल का, याची उत्सुकता आहे.

=====

हे देखील वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया'(Shark Tank India)

=====  

जेम्स बॉण्ड (James Bond) चित्रपटांचे निर्माते बारबरा ब्रोकोली आणि माइकल जी विल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार इद्रीय यांच्यासोबत MI6 एजेंटच्या भूमिकेसाठी टॉम हार्डी, रिचर्ड मॅडेन, सिलियन मर्फी, लशाना लिंच, हेनरी कॅविल, टॉम हिडलस्टन, आणि सॅम ह्यूघन या अभिनेत्यांचीही ऑडिशन झाली आहे.  मात्र या सर्वात इद्रीसच्या नावाला अधिक पसंती मिळत आहे.  

जेम्स बॉण्ड सिरीजमधील शेवटचा चित्रपट ‘जेम्स बॉण्ड नो टाईम टू डाय’ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झाला. या सिरीजच्या पंचवीसव्या चित्रपटत डॅनियल क्रॅग प्रमुख भूमिकेत दिसला. डॅनियल २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेम्स बॉन्ड: कसिनो रॉयाल’ चित्रपटापासून जेम्स बॉण्डच्या भूमिकेत आहे. जेम्स बॉण्डची भूमिका करणाऱ्या सर्व श्वेतवर्णिय अभिनेत्यांनंतर कृष्णवर्णिय इद्रीस जेम्स बॉण्डच्या भूमिकेत आपल्या अभिनयाचा कस लावणार का, याची उत्सुकता आहे.  

=====

हे देखील वाचा: कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारी हस्तक्षेप आणि पेंग ताखॉन (Paing Takhon)

=====

इद्रीस एल्बा हे अभिनेता, निर्माता आणि संगीतकार म्हणून ओळखले जातात. ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ या चित्रपटात त्यांनी नेल्सन मंडेला यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेच्या तयारीचा एक भाग म्हणून इद्रीस यांनी नेल्सन मंडेला ज्या तुरुंगात होते तिथे मुक्काम केला. गोल्डन ग्लोबसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. 

हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 20 कलाकारांमध्ये इद्रीस यांचे नाव आहे. जर जेम्स बॉण्डची भूमिका त्यांच्याकडे आली, तर इद्रीस हे  जेम्स बॉण्डची साकारणारे पहिले कृष्णवर्णीय अभिनेता ठरतील. 

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.