बॉलिवूडमध्ये काम करता यावे, किंवा बॉलिवूडमध्ये काम मिळावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. प्रादेशिक इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील बॉलिवूड खुणावत असते. जशी संधी मिळेल तसे हे कलाकार बॉलिवूडमध्ये काम करतात. खूप कमी कलाकार असे असतात ज्यांना खूपच सहज बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळते किंवा एखादा मोठा कलाकार त्यांना बॉलिवूडमध्ये लाँच करतो. जेव्हा एखादा बडा सेलिब्रिटी नवीन लोकांना बॉलिवूडमध्ये संधी देतो तेव्हा त्या कलाकाराचे एक वेगळेच वजन मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये पडते आणि त्यात जर लाँच करणारी व्यक्ती बॉलिवूडचा दबंग खान असेल तर मग विचारायलाच नको. (Shehnaaz Gill)
तसे पाहिले तर सलमानबद्दल अनेकदा म्हटले जाते की त्यांच्याकडे चांगल्या कलाकारांना ओळखण्याची चांगली नजर आहे. तो ज्या लोकांना संधी देतो ते नक्कीच त्यांच्या कामात प्रगती करत नाव कमावतात. नक्कीच काही अपवाद देखील असतात. मात्र आजपर्यंत सलमान खानने अनेक नवख्या चेहऱ्यांना किंवा इतर माध्यमात काम करणाऱ्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. सलमान खानकडून चित्रपटाची ऑफर मिळणे ही खरंच खूप मोठी बाब असते. आता लवकरच सलमान खान पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेहनाज गिलला देखील बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. (Shehnaaz Gill)
एका माहितीनुसार सलमान खान त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ सिनेमातून शेहनाजला लाँच करणार आहे. या सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत त्याचा मेहुणा आयुष शर्मा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळत असणाऱ्या माहितीनुसार शेहनाजला आयुषच्या सोबत कास्ट केले गेले आहे. याबाबत अजूनपर्यंत शेहनाजकडून किंवा सलमानकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी या सिनेमात शेहनाजची भूमिका पक्की समजली जात आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’ सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Shehnaaz Gill)
=========
हे देखील वाचा – डॉक्टर सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये……
=========
सलमान खानचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा सिनेमा मागील बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अनेक कलाकारांची एन्ट्री, एक्सिट होत असल्यामुळे सिनेमा सतत मीडियामध्ये प्रकाशझोतात येत आहे. आता शेहनाजची या सिनेमातील एन्ट्री काय जादू करणार हे बघणे महत्वाचे असेल. तत्पूर्वी सलमान आणि शेहनाज यांच्यामध्ये खूपच खास कनेक्शन आहे. अनेकदा शेहनाजने बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली होती. शेहनाजचा मित्र असलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाज बिग बॉसच्या सेटवर सलमानला भेटली तेव्हा दोघेही खूपच भावुक झाले होते. सलमाननेच शेहनाजला पुन्हा जगण्याची हिंमत दिली. (Shehnaaz Gill)
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तो ‘कभी ईद कभी दिवाली’ सिनेमासोबतच यशराजच्या ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे. यासोबतच यावर्षी सलमान त्याचे साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण देखील करणार आहे. तो लवकरच चिरंजीवीसोबत ‘गॉडफादर’ सिनेमात दिसणार आहे. (Shehnaaz Gill)