Jai Singh : दक्षिण भारतात मुघलांचे मनं जिंकण्यामागे राजा जय सिंह यांची महत्वाची भूमिका होती. त्यांचा हुशारकी आणि चालाख स्वभावामुळे शाहजहां ते औरंजेब त्यांना जबाबदारी देण्यास कधीच विचार करायचे नाही. पण एक काळ असा आला ज्यावेळी औरंजेब जय सिंह यांचा द्वेष करू लागले. खरंतर, राजा जयसिंह हे एक अत्यंत बुद्धिमान, मुत्सद्दी आणि धूर्त राजकारणी होते. त्यांचा जन्म जयपूर घराण्यात झाला होता आणि त्यांनी मुघल साम्राज्याच्या काळात एक विश्वासू सेनानी आणि कारभारकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली. अकबर, जहाँगीर, शाहजहान यांच्या काळात मुघल दरबारात राजपुत सरदारांचा मोठा सन्मान होता. त्या परंपरेनुसार जयसिंह यांनाही मुघल सत्तेच्या राजकीय आणि लष्करी घडामोडींमध्ये महत्त्वाचं स्थान मिळालं.
जयसिंहला मुघल सम्राट औरंगजेबाकडून ‘मीरझुमार’ म्हणजेच विश्वासू सरदार असा दर्जा प्राप्त झाला होता. शिवाजी महाराजांशी झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये देखील जयसिंह यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्य यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे औरंगजेबाला वाटायचं की जयसिंह हे त्याचे खरे समर्थक आहेत.

Jai Singh
पण हाच जयसिंह शिवाजी महाराजांप्रती असलेल्या सन्मानाने आणि त्यांच्या शौर्याने प्रभावित झाला होता. पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांनी मुघल दरबारात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जयसिंहने त्यांना सल्ला दिला होता की “जाण्याआधी स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री करूनच जा”. शिवाजी महाराजांनीही जयसिंहवर विश्वास ठेवून हा धोका पत्करला. मात्र आग्र्याच्या दरबारात झालेला अपमान आणि नंतरचा पलायन, यामुळे औरंगजेबाचा जयसिंहवरचा विश्वास डळमळीत झाला.
औरंगजेबाला वाटू लागलं की जयसिंह हा राजपुतांच्या हितासाठी आणि मराठ्यांच्या बाजूने झुकतो आहे. त्याचा मुघल धोरणांवर परिणाम होतो आहे, त्यामुळे त्याने हळूहळू जयसिंहकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. जयसिंहच्या कार्यक्षेत्रात अडथळे आणले गेले, अधिकार कमी केले गेले. त्याच्या सन्मानात घट झाली. हाच तिरस्कार आणि अविश्वास पुढे जयसिंहच्या दरबारातून मुघल हस्तक्षेपाच्या विरोधात उठाव होण्यास कारणीभूत ठरला.(Jai Singh)
===========
हे देखील वाचा :
Wajid Ali Shah : ‘एक कलाप्रेमी राजा : वाजिद अली शाह’, पण या कारणास्तव राहिला चर्चेत
Ahilyabai Holkar : काशी, सोमनाथ, मथुरा अहिल्याबाईंचं अफाट धर्मकार्य
============
जयसिंह हे मुघल साम्राज्याचे खरे रत्न होते, पण त्यांची न्यायनिष्ठा, दूरदृष्टी आणि हिंदू राजांच्या बाजूने असलेली सहानुभूती औरंगजेबाला सहन झाली नाही. आपल्या धोरणांच्या विरोधात उभा राहणारा कोणीही नको असं औरंगजेबाचं धोरण होतं. त्यामुळे जयसिंह यांच्यावरचा रोष आणि तिरस्कार वाढत गेला. जयसिंहचा अंत हा मुघल साम्राज्याच्या अंताची सुरुवातच ठरली, कारण मुघल दरबारातून सुज्ञ, गुणी आणि लोकोपयोगी सरदार नष्ट होऊ लागले, आणि त्याच्या जागी कट, शंकेचा खेळ सुरू झाला.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics