Home » जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडारा खुला होणार

जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडारा खुला होणार

by Team Gajawaja
0 comment
Jagannatha Temple
Share

पुरीमध्ये बांधलेले जगन्नाथ मंदिर (Jagannatha Temple) हे हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.  चारधाम पैकी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.  पुरी, बद्रीनाथ, द्वारका आणि रामेश्वरम यांचा या चारधाममध्ये समावेश होतो.  हे मंदिर १२ व्या शतकात गंगा राजवंशातील राजा अनंतवर्मन चोड गंगा यांनी बांधले होते. त्याच्यानंतर आलेल्या राजा अनंग भीमदेव यानी सध्याचे मंदिर बांधले आहे.  या मंदिरासंदर्भात अनेक गुढ कथा आहेत.  त्यापैकीच या मंदिराच्या खजान्यासंदर्भातीलही कथा आहेत. 

हाच जगन्नाथ पुरी मंदिराचा खजिना लोकसभा आणि ओडिसा विधानसभेच्या निवडणुकीतही गाजला. कारण वर्षातील ठराविक काळातच उघडला जाणारा जगन्नाथपुरी मंदिराचा खजिना गेल्या काही वर्षात उघडला गेला नाही.  त्याचे कारण म्हणजे, मंदिराच्या खजिन्याची चावीच हरवल्याची माहिती आहे.  मात्र आता या खजिन्याची चावी आणि खजिन्यातील मौल्यवान वस्तूंची यादी करण्यासाठी ओडिशा सरकारनं महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.  ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी यासंदर्भात एक नवीन समिती स्थापन केली आहे.  त्यामुळे यावेळेच्या जगन्नाथ यात्रेच्यावेळी भगवान जगन्नाथाचा खजिना खुला करणार का, हा सवाल आता विचारण्यात येत आहे.  

नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ओडिशातील  जगन्नाथ पुरी मंदिरातील (Jagannatha Temple) रत्नांच्या भांडारावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता निवडणूक निकालानंतर ओडिशाच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जगन्नाथ मंदिरातील रत्नांचा खजिना पुन्हा उघडण्यासाठी नवीन समितीच नेमली आहे.  यामुळे जगन्नाथ मंदिराच्या रत्नांच्या भांडारात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी तयार करणे अधिक सुलभ होणार आहे. या समितीमध्ये १६ जाणकारांचा समावेश आहे.  हेच या खजिन्यातील अमुल्य रत्नांवर नजरही ठेवणार आहेत. यासर्वांमळे जगन्नाथ पुरी मंदिरातील तिजोरीच्या चाव्या चर्चेत आल्या आहेत.  

जगन्नाथ पुरी मंदिराच्या (Jagannatha Temple) तिजोरीच्या चाव्या हरवल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शाह आणि इतर नेत्यांनी निवडणूक प्रचारात उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ज्या रत्न भांडारचा उल्लेख केला ते मंदिरातील भगवान जगन्नाथ यांच्या पायाखालचे तळघर आहे. या तळघरात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे मौल्यवान दागिने आणि मौल्यवान खाण्याची भांडी आहेत. हे दागिने आणि भांडी १२ व्या शतकातापासून म्हणजे, जेव्हा मंदिर बांधले आहे, तेव्हापासूनचे आहेत.  त्यामुळेच त्यांचे मुल्य हे आज मोजता येणार नाही, एवढे आहे. 

शतकानुशतके, पुरीचे राजघराणे आणि भाविक मंदिराला मौल्यवान रत्ने, दागिने आणि इतर वस्तू भेट देत आहेत.  त्यासर्वांना याच खजिन्यात ठेवण्यात आले आहेत.  महाराजा रणजितसिंह यांनी मंदिराला मोठ्याप्रमाणात सोने दिल्याची माहिती आहे.  महाराजा रणजित सिंह यांच्या इच्छेनुसार जगप्रसिद्ध कोहिनूर हिराही याच जगन्नाथ मंदिराला द्यायचा होता.  पण हा हिरा ब्रिटीशांनी पळवल्यानं त्यांची निराशा झाली होती. 

जगन्नाथ पुरी मंदिराच्या तळघरात दोन खोल्यांमध्ये हा मौल्यवान खजिना आहेदरवर्षी भगवान जगन्नाथाच्या प्रसिद्ध रथयात्रेत आणि प्रमुख सणांच्यावेळी देवाला सोन्याचे पोशाख आणि रत्नांचे दागिने घालण्यासाठी ही तिजोरी खोलण्यात येते.  मात्र त्याचीच चावी हरवल्यानं काही वर्षात ही खोली बंदच आहे.  याबाबतही अनेक गुढ चर्चा आहेत.  खजिना जिथे आहे, ते तळघर १९७८ मध्ये शेवटचे उघडण्यात आले होते. १९७८ मध्ये तयार करण्यात आलेल्या यादीनुसार जगन्नाथपुरी मंदिराच्या तिजोरीत सुमारे लाख ४९ हजार ६१० ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याची नोंद आहे.  (Jagannatha Temple) 

सुमारे ४५ वर्षांपूर्वी जगन्नाथ मंदिराच्या तिजोरीत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत १०० कोटींहून अधिक आहे. या सोन्याच्या दागिन्यांमध्ये मौल्यवान रत्नेही जडलेली होती.  मंदिराच्या तिजोरीत सुमारे लाख ५८ हजार ग्रॅम चांदीची भांडीही होती. याशिवाय अन्य बरेच दागिने या खजिन्यात होते, पण त्यांचे वजन करता येणेही शक्य नव्हते, इतके ते अवजड होते.  १९८५ मध्ये जगन्नाथ पुरी मंदिराच्या तिजोरीचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले.  मात्र यावेळी तिजोरीत असलेल्या दागिन्यांची कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आली नाही, येथूनच मंदिरातील खजिन्याचा विवाद सुरु झाला.

================

हे देखील वाचा : कल्की अवतरणार की कली विध्वंस करणार ?

===============

जगन्नाथ पुरी मंदिराच्या तिजोरीची चावी पुरीच्या कलेक्टरकडे आहे. तिजोरी उघडण्यासाठी ओडिशा सरकारची परवानगी घ्यावी लागते. २०१८ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार उच्च न्यायालयाने खजिना उघडण्याचे निर्देश दिले. यानंतर तत्कालीन राज्य सरकारने एप्रिल २०१८ रोजी मंदिराचा खजिना उघडण्याचे आदेश दिले.  पण यावेळी तिजोरीच्या चाव्या हरवल्याचे सांगण्यात आले.  त्या चाव्या अद्यापही मिळालेल्या नाहीत.  चाव्या हरवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. (Jagannatha Temple)

तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला चावी असलेला लिफाफा सापडला  या लिफाफ्यावर आतील रत्नांच्या दुकानाच्या डुप्लिकेट चाव्याअसे लिहिले होते. हे कोणी लिहिले, त्याचा उलगडा अद्यापही झाला नाही.  पण मुळ चावी कुठे गेली हा प्रश्न कायम होता.  ४५  वर्षांपासून बंद असलेल्या मंदिराच्या तिजोरीत दोन भागात रत्न भंडारच आहे.  हा खजिना गायब झाल्याची चर्चाही या भागात दब्या आवाजात करण्यात येते.  या खजिन्याची संपूर्ण नोंदणी १९७८ मध्ये करण्यात आली होती.  त्यानुसार त्यात १२८३१ एवढे सोने,  १११५३ चांदी आहे.  शिवाय कितीतरी अमुल्य हिरे, माणिक, मोती यांचे दागिने यात आहेत.  या गुढ खजिन्याचे रहस्य आतातरी खुले होईल अशी ओडिसातील जनतेची अपेक्षा आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.