Home » Odisha : जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पुन्हा काय दिसले !

Odisha : जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पुन्हा काय दिसले !

by Team Gajawaja
0 comment
Odisha
Share

ओडिशामधील जगन्नाथ मंदिर हे समस्त हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. जगन्नाथ मंदिर हे भगवान विष्णूचे एक रूप असलेल्या जगन्नाथाला समर्पित मंदिर आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओडिशातील पुरी येथील हे मंदिर अवंतीचा राजा इंद्रद्युम्न याने बांधले. जगन्नाथ मंदिर श्री वैष्णव परंपरेतील १०८ अभिमन क्षेत्रांपैकी एक असे आहे. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. या मंदिराच्या ध्वजाबाबत एक गुढ आहे. सोबतच मंदिरात प्रवेश केल्यावर येणा-या ध्वनीबाबतही अनेक गुढ कथा सांगितल्या जातात. जगन्नाथ मंदिरासंदर्भात अनेक हिंदू धर्मग्रंथामध्ये काही संकेत सांगितले आहेत. (Odisha)

त्यामध्ये मंदिराच्या पहिल्या पायरीला लागणारे समुद्राचे पाणी आणि मंदिराच्या ध्वजाभोवती फिरणारे पक्षी यासंदर्भात उल्लेख आहे. कारण या जगन्नाथ मंदिराच्या ध्वजपताकेभोवती शक्यतो कुठलाही पक्षी आढळत नाही. मात्र गेल्या वर्षभरात मंदिराच्या ध्वजाभोवती गरुड पक्षी घिरट्या घालतांना दिसला, आणि भगवान जगन्नाथांच्या भक्तांमध्ये त्याची चर्चा होऊ लागली. आता पुन्हा असेच पक्षी या मंदिराभोवती दिसून आले आहेत. यावेळी जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर चक्क अनेक गरुड पक्षी घिरट्या घालतांना दिसल्यामुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. गरुड हा भगवान विष्णुला सर्वात प्रिय असणारा पक्षी मानला जातो. हा गरुड पक्षी शक्यतो समुहात रहात नाही. मात्र भगवान जगन्नाथांच्या मंदिराभोवती असे अनेक गरुड पक्षी घिरट्या घालतांना दिसल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. (Social News)

श्रद्धा आणि तर्क यातील वादविवाद सुरु झाले. हे वादविवाद वाढल्यावर मंदिर प्रशासनाने ही एक सामान्य नैसर्गिक घटना असल्याचे सांगितले आहे. याचा कुठल्याही भविष्यवाणीशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, गूढता आणि परंपरेचे केंद्र मानले जाते. या मंदिराशी संबंधित अनेक प्रथा परंपरा शतकानुशतके पाळल्या जात आहेत. भगवान जगन्नाथांची रथयात्रा हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे. सोबतच या मंदिरावरील हवेच्या विरुद्ध दिशेला उडणारा ध्वजही चमत्कार मानला जातो. या मंदिराच्या भोवती कुठलिही वस्तू दिसली तरी त्याची दखल घेतली जाते, आणि त्याचा देशावर काय परिणाम होणार याची चर्चा सुरु होते. आता याच भगवान जगन्नाथाच्या मंदिराभोवती अनेक गरुड पक्षी दिसल्यामुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. जगन्नाथ मंदिराच्या वरच्या आणि निळ्या वर्तुळाभोवती मोठ्या संख्येनं गरुड पक्षी दिसले. हे गरुड पक्षी एका दिशेनं मंदिराच्या कळसाभोवती प्रदक्षिणा घालत असल्याचे दिसले. (Odisha)

हे दृश्य अनेक भाविकांनी कॅमे-यात बंद केले आणि हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर ही घटना म्हणजे, कुठल्या आगामी संकटाचे चिन्ह आहे का, याची चर्चा सुरु झाली. काही भाविकांनी हा दैवी चमत्कार असल्याचे सांगितले. तर काहींनी एकादी मोठी आपत्ती येणार असल्याचे सांगितले. भगवान जगन्नाथांच्या भोवती गरुड पक्षी प्रदक्षिणा घालत असल्यामुळे हा एक शुभ संदेश असल्याचे काही भक्तांनी सांगितले. तर काहींच्या मते ही घटना एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे लक्षण असू शकते. याबाबत वादविवाद वाढल्यावर जगन्नाथ मंदिर प्रशासनानं आपली बाजू मांडली आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे अलिकडच्या काही वर्षात या मदिंराच्या आसपास अनेक पक्षी येऊ लागले आहेत, हा त्यापैकीच एक प्रकार असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केले आहे. (Social News)

=======

हे देखील वाचा :  Saudi Arabia : सौदीचे वाळवंट जलमय !

=======

या संपूर्ण प्रकरणात भगवान जगन्नाथांच्या काही भक्तांनी भविष्य मालिका या ग्रंथाचा उल्लेख केला आहे. असे मानले जाते की, हा ग्रंथ १४०० च्या सुमारास ओडिशाच्या पंचसखा संतांनी भगवान जगन्नाथाच्या मार्गदर्शनाखाली लिहिला होता. ताडपत्रांवर लिहिलेल्या या ग्रंथात कलियुगाशी संबंधित अनेक चिन्हे आणि घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. या भविष्य मालिका ग्रंथामध्ये लिहिल्यानुसार जर गरुडासारखे पक्षी मंदिराच्या ध्वजस्तंभ किंवा शिखरावर वारंवार दिसले तर ते मोठ्या नैसर्गिक आपत्ती किंवा अशांतता यांचे प्रतिक मानण्यात यावेत, असे लिहिले आहे. त्यामुळेच आता भगवान जगन्नाथांच्या कळसावर असंख्य असे गरुड पक्षी एकाचवेळी दिसल्यामुळे भाविकांनी चिंता व्यक्त केली आहे. अर्थात जगन्नाथ मंदिर प्रशासनाने या शंकांना स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही एक सामान्य नैसर्गिक घटना आहे आणि त्याचा कोणत्याही भविष्यवाणीसोबत याचा संबंध नाही. (Odisha)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.