2023 हे वर्ष सुरु झाले आणि भविष्यवाणी करणा-यांचा जणू पूरच आला. जो तो हे वर्ष किती वाईट आहे, याची भविष्यवाणी करीत सुटले. काहींनी हे वर्ष भयंकर असल्याचे सांगितले तर काही भविष्यकर्त्यांनी या वर्षात विज्ञानाचे नवे अविष्कार होतील असे सांगितले. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनं तर सर्वत्र थरकाप उडवला. अशीच काळजीत टाकणारी एक नवी भविष्यवाणी आता केली आहे ती, न्यू नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी. त्यांनी तिसरे महायुद्ध (World War III) सुरु होऊ शकते, अशी भविष्यवाणी केली आहे. क्रेग यांचा उल्लेख नव्या काळातील नॉस्टोडेमस असा करण्यात येतो, त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

याच क्रेग महाशयांनी आता तिसरे महायुद्ध (World War III) होण्याची भविष्यवाणी केली आहे. क्रेग यांच्या म्हणण्यानुसार चीन आणि तैवानमध्ये युद्ध सरु होईल, आणि हिच तिस-या महायुद्धाची (World War III) ठिणगी असेल. त्यानंतर सर्वत्र युद्धाचे वारे सुरु होतील असे त्यांनी सांगितले आहे. क्रेग यांनी ही भविष्यवाणी केल्यावर चीन आणि तैवान या देशांमध्ये वाढलेल्या तणावाबाबत चर्चा सुरु झाली आहे. हे दोन्हीही देश कधीही युद्ध सुरु होईल, अशा परिस्थितीत असून या युद्धात कोण कोणाची बाजु घेणार? याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धला एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. हे युद्ध थांबण्याऐवजी आता त्याचा धोका अधिक वाढला आहे. कारण या युद्धात आता अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, अशी भीती आहे. दोन देशांमधील या युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. जग तीन भागात विभागले गेले आहे. रशियाकडून सतत अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. त्यातच नवीन काळातले नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन पार्करने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. क्रेग यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये, जगात तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते. तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात विमान अपघातामुळे होईल, असा दावा क्रेगने केला आहे. याआधी क्रेग हॅमिल्टन यांनी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीनंतर, क्रेग नवीन नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखला जाऊ लागले.
तिस-या महायुद्धाची (World War III) भविष्यवाणी सांगताना क्रेग यांनी तैवानमध्ये एक भयानक विमान दुर्घटना घडेल, ज्यामुळे तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते, असे सांगितले आहे. तैवान आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. अलीकडच्या काळात तणाव वाढलेला आहे. तैवानवर चीननं आपला दावा सांगितला आहे. तर तैवाननं स्वतःला स्वतंत्र देश असल्याचे सांगून चीनची दावेदारी फेटाळून लावली आहे. हाच या दोन देशांमधील प्रमुख वादाचा मुद्दा आहे. या दोन देशात युद्ध कसे सुरु होईल याबाबत क्रेग यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितले आहे की, या दोन देशात एकतर दोन पाणबुड्या किंवा दोन विमानांची टक्कर होणार आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणहानी होईल. चीन आणि तैवान यांच्यातील लढाईत अमेरिका तैवानच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास क्रेगला आहे. दुसरीकडे रशिया चीनची बाजू घेईल, असेही त्यांनी सांगितले आहे. चीन आणि तैवानमधील संघर्ष हा युक्रेन-रशियाच्या लढ्यापेक्षा मोठा असेल, असा दावाही क्रेग यांनी केला आहे. या महायुद्धाचा (World War III) परिणाम भीषण असेल असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच चीनला या युद्धाची मोठी किंमत मोजावी लागेल. चीनचे या युद्धामुळे तुकडे होणार, असेही क्रेग यांनी सांगितले आहे.
======
हे देखील वाचा : जापानच्या या बेटावर जाण्यास महिलांना बंदी तर पुरुषांच्या वस्राबद्दलही आहेत नियम
======
यापूर्वीही अनेकांनी 2023 हे धोकादायक असल्याची भविष्यवाणी केली आहे. फ्रान्स मधील नॉस्ट्राडेमस यांनीही अनेक वर्षापूर्वी केलेल्या त्यांच्या भविष्यवाणीत 2023 मध्ये मोठे युद्ध होणार असल्याचे म्हटले आहे. बाबा वेंगा यांचीही भविष्यवाणी खूप गाजली आहे. आता त्यात या क्रेग यांच्या भविष्यवाणीनं भर घातली आहे.
सई बने