Home » इस्रोकडून २०३५ पर्यंत बनवण्यात येणार स्वत:चे स्पेस स्टेशन

इस्रोकडून २०३५ पर्यंत बनवण्यात येणार स्वत:चे स्पेस स्टेशन

by Team Gajawaja
0 comment
SSLV-D2
Share

इस्रोकडून वर्ष २०३५ पर्यंत आपले स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन-इस्रोने उद्योग जगतासमोर आपला एक नवा प्लॅन सादर केला आहे. त्यानुसार इस्रो अधिक वजनदार पेलोड कक्षेत स्थापन करण्यासह पुन्हा वापरले जाणारे रॉकेट बनवण्याच्या प्रयत्नात आहे. अशा रॉकेटला Next-Generation Launch Vehicle-NGLV असे म्हटले गेले आहे. (ISRO Space Station)

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी असे म्हटले की, स्पेस एजेंसी रॉकेटच्या डिझानवर काम करत आहे. ते जवळजवळ एका वर्षात पूर्ण होईल. आम्हाला असे वाटते की, याच्या विकासासाठी उद्योग क्षेत्राने सुद्धा मिळून काम केले पाहिजे. पुढे त्यांनी असे म्हटले की, खासगी उद्योगांना यासोबत घेण्याचा विचार सुरु आहे. जेणेकरुन सरकारला संपूर्ण पैसा लावावा लागणार नाही. उद्योगांना सुद्धा गुंतवणूक करावी लागेल. रॉकेटचे पहिले प्रक्षेपण २०३० मध्ये होऊ शकते. तर रॉकेट मधून जियोस्टेशनरी ट्रांसफर ऑर्बिटमध्ये १० टन पेलोड घेऊन जाणे किंवा पृथ्वीच्या खालील कक्षेत २० टन पलोड घेऊन जाण्याची योजना आहे.

ISRO Space Station
ISRO Space Station

इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, रॉकेट मदतीला येणार आहे कारण भारत आपले स्पेस स्टेशन २०३५ पर्यंत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. NGLV अधिक प्रमाणात उत्पादनासाठी सामान्य, मजबूत मशीनच्या रुपात डिझान केले आहे. सोमनाथ यांनी असे म्हटले की, रॉकेट पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हिकल १९८० च्या दशकातील तंत्रज्ञानावर आधारित आहे. भविष्यात रॉकेट प्रक्षेपित करण्यास याचा वापर केला जाऊ शकत नाही. त्यांनी असे म्हटले की, स्पेस स्टेशन बनवल्यानंतर या क्षेत्रात भारताची ताकद अधिक वाढणार आहे. (ISRO Space Station)

हे देखील वाचा- ISRO ने खरी साजरी केली दिवाळी, बाहुबली रॉकेट LVM3 ने पुन्हा रचला इतिहास

रॉकेट बनवण्यासाठी हजारो डॉलरचा खर्च
NGLV तीन स्तर असणारे रॉकेट असेल. हे ग्रीन फ्यूल च्या माध्यमातून चालवले जाऊ शकते. ज्यामध्ये मिथेन आणि तरल ऑक्सिजन किंवा केरोसिन किंवा तरल ऑक्सिजनचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी जवळजवळ १९०० डॉलर प्रति किलोग्रॅमचा खर्च येऊ शकतो. तो एक्सपेंडेबल फॉर्मेटमध्ये ३००० डॉलर प्रति किलोग्रॅमच्या दराने पेलोड घेऊन जाऊ शकतो.

दरम्यान, उपग्रहप्रक्षेपणाच्या क्षेत्रात भारताची सर्वाधिक स्पर्धा ही अमेरिका आणि चीन सोबत असणार आहे. कारण इस्रोसह त्यांच्या उपकंपन्या सोडल्यास उपग्रहप्रक्षेपणाच्या क्षेत्रात नऊ-दहा मोठ्या कंपन्या जागतिक पातळीवर कार्यरत आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.