इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करार लागू झाल्यावर पहिली गोष्ट झाली ती हमासने ओलीस ठेवलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. बरोबर 471 दिवसांनी या महिला आपल्या भूमीमध्ये, इस्रायलमध्ये परत आल्या आहेत. हे दिवस त्यांच्यासठी जसे परीक्षेचे होते, तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठीही. या तीन महिलांची नावे रोमी गोनेन, एमिली डॅमरी आणि डोरॉन स्टाइनब्रेचर अशी असून त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कुटुंबियांसह अवघे इस्रायल तयार होते. या तिघी घरी पोहचल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्य म्हणजे, हमासनं त्यांची सुटका करतांना प्रत्येकीला एक पिशवी भरुन भेटवस्तू दिल्या आहेत. यात त्यांनी हमासच्या कैदेत घालवलेल्या आठवणी फोटो रुपात असून एक स्मृतीचिन्हही दिले आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यात अपहरण झालेल्या सुमारे 100 ओलिसांना परत आणण्यासाठी इस्रायलनं युद्धबंदीसंदर्भात पहिले पाऊल टाकले आहे. अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या आठवड्यात इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी कराराची घोषणा करण्यात आली. (Israel VS Hamas)
42 दिवसांच्या युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यात गाझामधून एकूण 33 ओलिसांना परत आणले जाईल. त्याबदल्यात पॅलेस्टिनी कैदी आणि बंदीवानांना सोडले जाणार आहे. यातील पहिला टप्पा म्हणून हमासने 471 दिवसांनंतर तीन महिलांना सोडले. रोमी गोनेन, एमिली दमारी आणि डोरॉन स्टाइनब्रेचर या तिघी परत आल्यावर त्यांच्या कुटुंबियानी आनंद अश्रूंनी त्यांचे स्वागत केले. यात 24 वर्षीय रोमी गोगेन ही नृत्यंगना आहे. नृत्यात पारंगत असलेली रोमी कोरिओग्राफर म्हणून काम करत होती. 7 ऑक्टोबरच्या नोवा महोत्सवात तिला हमासच्या हल्लेखोरांनी पकडले. तेव्हापासूनचा प्रत्येक दिवस भयानक असल्याचे वर्णन रोमी करते. हल्ला झाला तेव्हा तिनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या हाताला गोळी लागली. तेव्हाच तिनं घरीही फोन करत मी आज मरणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा तिच्या कुटुंबा बरोबर संपर्क तुटला. त्याचवेळी तिच्या आईला फोनवरुन गोळीबार आणि ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आता रोमीच्या परतण्याने संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा उत्साही झाले आहे. (International News)
ब्रिटीश-इस्रायली दुहेरी नागरिकत्व असलेल्या 28 वर्षीय एमिली दमारी आणि 31 वर्षीय पशुवैद्यकीय परिचारिका डोरॉन स्टाइनब्रेक्ट यांनाही इस्रायल-हमास करारानंतर सोडण्यात आले. एमिली दमारीला किबुत्झ कफर अझा येथे हमासने ओलीस ठेवले होते. एमिलीच्या मते अटकेत असलेले 471 दिवस खूप वेदनादायक होते. पण सुटका होणार हे कळल्यानंतरचा प्रत्येक क्षण वेदनादायी होता. घरी पोहोचताच, एमिलीची आई मॅंडी तिला मिठी मारून रडली. त्यांची मुलगी घरी आली आहे यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. मँडोरॉन स्टाइनब्रेचर यांचे किबुट्झ कफर अझा येथील त्यांच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. हमासनं केलेल्या हल्याच्यावेळी तिनं आपल्या कुटुंबाला फोन केला होता. तेव्हा काही बंदुकधारी इमारतीमध्ये आल्याचे तिनं सांगितले होते. नंतर तिचा कुटुंबाबरोबरचा संपर्क तुटला. त्यानंतर काही तासातच मँडोरॉनचे अपहरण झाल्याचे समजले. आता ओलीसांना सोडणार असल्याचे समजल्यावर मँडोरॉनचे कुटुंबिय आनंदात होते. त्यांची मुलगी घरी आली, हा आयुष्यातील सर्वात चांगला दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. (Israel VS Hamas)
=============
हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !
America : बराक आणि मिशेल ओबामांच्या नात्यात आलाय दुरावा !
=============
यापूर्वी, नोव्हेंबर 2023 मध्ये आठवडाभर चाललेल्या युद्धबंदी दरम्यान, 100 हून अधिक ओलिसांनाही सोडण्यात आले होते. आता कराराअंतर्गत सोडण्यात येणाऱ्या पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यासाठी रेड क्रॉसचे शिष्टमंडळ कडक सुरक्षेत ओफर तुरुंगात दाखल झाले होते. गाझामध्ये बंदिस्त असलेल्या तीन कैद्यांच्या बदल्यात एकूण 90 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. हमासने सोडलेल्या तीन महिला ओलिसांना रेड क्रॉसने इस्रायली सैन्याकडे सोपवले. इस्रायली ओलिसांना सुटका झाल्यावर हमासने भेटवस्तू दिल्या आहेत. 15 महिन्यांनी घरी परतलेल्या महिलांना हमासनं त्यांचे बंदिवासातील काळातील फोटो दिले आहेत. तसेच स्मृतिचिन्हही दिले आहे. या तिघींप्रमाणेच हमास पुढील सहा आठवड्यात टप्प्याटप्प्याने 33 इस्रायली बंधकांची सुटका करणार आहे. त्या बदल्यात, इस्रायल त्यांच्या तुरुंगातून 2000 पॅलेस्टिनी कैदी आणि बंदीवानांना सोडणार आहे. (International News)
सई बने