बऱ्याच वेळा अशी प्रकरणे समोर आली आहेत की, धावत्या ट्रेनमध्ये एखाद्या प्रवाशाची प्रकृती बिघडली आहे. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू ही झाला आहे. परंतु प्रवासादरम्यान तुमची प्रकृती बिघडली तर काय करावे? डॉक्टरांशी संपर्क कसा करावा किंवा उपचार कसे मिळवावे? अशी भीती मनात निर्माण होते. त्यामुळेच अशी स्थिती निर्माण झाल्यास योग्य वेळी उपचार कसे मिळवाल याच बद्दल आम्ही तुम्हाला अधिक सांगणार आहोत.(IRCTC Sick Rules)
खरंतर प्रत्येक ट्रेनमध्ये डॉक्टरची सुविधा असते. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींसंदर्भात सावध रहायला पाहिजे. जेणेकरुन डॉक्टरांशी संपर्क साधत तु्मच्या मित्राला, नातेवाईकाला वेळीच उपचार देऊ शकता. यासाठी तु्म्हाला खालील काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
-सर्वात प्रथम या स्थितीत तुम्ही घाबरुन जाऊ नका. रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांक १३८ वर लगेच कॉल करा. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती द्या
-त्यानंतर टीटीई किंवा ट्रेनमध्ये असलेल्या सुरक्षाबलांच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती द्या
-ट्रेनमधील टीटीईची ही जबाबदारी असते की, अशा प्रकारच्या आपत्कालीन स्थिती रुग्णाल प्राथमिक उपचार द्यावेत. त्यासंदर्भातील त्यांना ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. अशा वेळी जर टीटीईकडून आजारी व्यक्तीला मदत न मिळाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते
-सोशल मीडियाच्या मदतीने सुद्धा तुम्ही रुग्णाची मदत करु शकता. त्यासाठी तुम्ही ट्विटरवर आयआरसीटीला टॅग करु शकता. येथे तुम्ही तुमचा पीएनआर आणि सर्व प्रकारची माहिती द्या, रेल्वेकडे तत्काळ उपाचारासाठी जरुर मदत मागा
-प्रवाशांच्या मदतीसाठी १६२ ट्रेनमध्ये मेडिकल बॉक्सची व्यवस्था करण्यात आलेली असते. यामध्ये ५८ प्रकारची औषधं, फर्स्ट एड संबंदित गोष्टी सुद्धा असतात (IRCTC Sick Rules)
हे देखील वाचा- रेल्वेच्या अखेरच्या डब्ब्यावर X असे का लिहिले जाते?
-जर तुम्ही ही सर्व प्रक्रिया फॉलो केली तर तुम्हाला पुढील स्थानकात उपलब्ध असलेल्या डॉक्टरांकडे पोहचता येईल. या दरम्यान ट्रेनमध्ये डॉक्टर्सला बोलावल्यास तुमचा खर्च अधिक वाढू शकतो. सध्या याच्या किंमती पाच पटींनी वाढल्या आहेत.
दरम्यान गेल्या दोन वर्षांपूर्वीच आजारी रुग्णांसंदर्भातील एक मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार रेल्वेत आजारी व्यक्तीच्या देखरेखीसाठी असलेल्या व्यक्तीला निशुल्क प्रवास करण्याची सुविधा मिळते. त्याचसोबत रुग्णाच्या आजारानुसार त्याला तिकिटाच्या किंमतीत ही सुट मिळते.परंतु त्याआधी रेल्वेचे या संदर्भातील काय नियम आहेत हे नक्की जाणून घ्या.