मध्यपूर्वेत उष्णता झपाट्याने वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून इराणवर जणू सूर्यदेव कोपला असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रदेशात पसरलेल्या प्रचंड उष्णतेमुळे भविष्यात हा सर्व प्रदेश उजाड होईल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे या हवामान परिस्थितीत अधिक वाढ होईल, असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. इराणमधील उष्णतेने सर्व आकडे मोडीत काढले आहेत. आपल्या देशाच्या अनेक भागात मे-जूनमध्ये तापमान ४५ अंशांच्या वर जाते तेव्हा उष्णतेचा निर्देशांकही ५० च्या पुढे जातो. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवतो. हा उकाडा सहन करता येत नाही. पण विचार करा, एखाद्या ठिकाणचा उष्णता निर्देशांक ८२.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला तर त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल. अशीच परिस्थिती सध्या इराणमध्ये आहे. (Iran Temperature)
दक्षिण इराणमधील एका हवामान केंद्राने ८२.२ अंश सेल्सिअस म्हणजे, १८० अंश फॅरेनहाइट उष्णता निर्देशांक नोंदवला आहे. हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वोच्च उष्णता निर्देशांक ठरला आहे. इराणचे राजधानी शहर असलेल्या तेहरान मधील विमानतळावरील हवामान केंद्रावर ही तापममानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे इराणमधील हवामानाची परिस्थिती कशी असेल, याची फक्त कल्पना केली तरी घाम फुटेल. अलिकडच्या काही वर्षात पश्चिम आशिया, इराण, इराकमधील लोकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र यावर्षी इऱाणमधील तापमान हे सर्वाधिक राहिल याची झलक आत्तापासूनच मिळू लागली आहे. इराण-इराकमधील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या पुढे गेले आहे. या वाढत्या उष्णतेमुळे तज्ञांची चिंता वाढली आहे. (Iran Temperature)
दक्षिण इराणमधील डेरेस्तान विमानतळाजवळील एका हवामान केंद्रावर ८२.२°से (१८०°फॅ) उष्मा निर्देशांक नोंदवला गेला. हे तापमान पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वोच्च तापमानापैकी आहे. यामुळे यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसलाही धक्का बसला आहे. हवामानशास्त्रज्ञ कॉलिन मॅककार्थी यांनी या सर्व नोंदीची वैधता तपासण्यासाठी पुन्हा सर्व पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॉलिन यांच्या मते, उष्णतेच्या लाटेचा पश्चिम आशियातील बहुतांश भागांवर परिणाम होत आहे. त्यामुळे परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. सौदी अरेबियातील धाहरान येथेही असेच हवामन नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्व भाग भविष्यात अतिकोरडा वर्गवारीत येणार असल्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. (Iran Temperature)
जागतिक तापमानवाढीमुळे अशा तीव्र उष्णतेच्या घटना वारंवार घडू शकतात असा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यातच इराणच्या हवामान केंद्राने सप्टेंबर महिन्यात तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराण आणि शेजारील देशांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. उष्मा निर्देशांक हवेचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता एकत्र करून किती उष्ण वाटते याचे मोजमाप करतो. याला स्पष्ट तापमान असेही म्हणतात. वाढत्या तापमानात, इराण आणि आसपासचे देश सतत अभूतपूर्व उष्णतेबरोबर सामना करत आहेत. इराक आणि इराणच्या काही भागांमध्ये तापमान ५०°C जवळ पोहोचले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठाही खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या हालात भर पडली आहे. सध्या इराणच्या बहुतांश भागा उष्णतेची तीव्रता एवढी आहे की लोकांना घराबाहेर पडणेही कठिण झाले आहे. एखाद्या भट्टीत उभे असल्याचा भास होत आहे. (Iran Temperature)
====================
हे देखील वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणे १ एप्रिल पासून महागणार, १८ टक्क्यांनी वाढणार टोल
====================
इराण हा मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका हे हवामान बदलासाठी सर्वात असुरक्षित देश मानले जातात. या देशात सातत्यानं होणा-या हवामानातील बदलामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे आणि तापमानात वाढ झाली आहे. तापमानात वाढ होण्याचे दूरगामी परिणाम या देशावर झाले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, पाणी टंचाई. इराणला मोठ्यावप्रमाणात पाणी टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. या देशातील जवळपास ३५ टक्के नागरिकांना पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. यासोबत या देशातील हवेची गुणवत्ताही खालावत चालल्यामुळे देशावर तिहेरी संकट आले आहे. इराणमधील ही परिस्थिती अशाच राहिली तर भविष्यात या देशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे रहाणार आहे. (Iran Temperature)
सई बने