IPL : देशभरात आयपीएलचा 17 वा सीझन सुरू आहे. यामुळे क्रिकेट प्रेमींचे प्रत्येक वेळी लक्ष टीव्ही किंवा फोनवर लागलेले असतेत. पण तुम्हाला माहितेय का, क्रिकेटच्या सामन्यादरम्यान खेळाडूंना एका खास क्रमांकाची टी-शर्ट दिली जाते, ते क्रमांक त्यांना कसे मिळतात? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….
टी-शर्टवरील क्रमांक असतो खेळाडूंची ओखळ
क्रिकेट क्षेत्रात खेळाडूंचा टी-शर्ट क्रमांकच त्यांची ओखळ असतो. जसे की, भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्माच्या टी-शर्टवर 45 लिहिलेले आहे. माजी कर्णधार विराट कोहलीच्य टी-शर्टवर 18 क्रमांक आहे. खरंतर, सर्वच खेळाडूंच्या टी-शर्टवर एक क्रमांक लिहिलेला असतो. हा क्रमांक खेळाडूंना बीसीसीआयकडून दिला जातो. अथवा खेळाडूंना स्वत:हूनही टी-शर्टवरील क्रमांक निवडण्याची मुभा असते. पण माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या टी-शर्टवर असणारा 10 क्रमांक दुसऱ्या खेळाडूला मिळू शकतो का?
असा मिळतो टी-शर्टवरील क्रमांक
टी-शर्टवर क्रमांक मिळण्यामागे काही नियम नाही. खरंतर टी-शर्टवरील क्रमांक ठरवण्याचे काम टीम मॅनेजमेंट करते. यामध्ये बीसीसीआय दखल देत नाही. क्रिकेटपटूंना आपल्या पसंतीचा क्रमांक निवडता येतो. केवळ दुसऱ्या क्रिकेटपटूकडे तो क्रमांक असल्यास तसे करता येत नाही. पण काही क्रमांकाबद्दल बोर्ड किंवा टीम मॅनेजमेंट क्रमांकासाठी नकार देऊ शकते. जसे की, आतापर्यंत सचिन आणि धोनीचा टी-शर्ट क्रमांक कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला देण्यात आलेला नाही. हे दोघेही क्रिकेटर निवृत्त झाले आहेत. पण धोनी ज्यावेळी आयपीएलचे सामने खेळतो त्यावेळी स्वत: 7 क्रमांक असलेली टी-शर्ट परिधान करतो. (IPL)
आयपीएलमध्ये एकाच क्रमांकाची टी-शर्ट परिधान करण्यास परवानगी आहे?
आयपीएलमध्ये कोणत्याही संघातील क्रिकेटपटू कोणत्याही क्रमांकाची टी-शर्ट परिधान करू शकतो. केवळ आपल्याच संघातील क्रिकेटपटूकडे तो क्रमांक नसावा.