Home » International Space Station: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे जणू विज्ञानाचा आविष्कार!

International Space Station: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे जणू विज्ञानाचा आविष्कार!

by Team Gajawaja
0 comment
International Space Station
Share

माणूस प्राण्याने आज वेगवेगळे शोध लावून अनेक क्षेत्रात मग ते कुठलंही क्षेत्र असो बरीच प्रगती केली आहे. यामध्ये अंतर्भाव होतो तो विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र आणि अशा असंख्य क्षेत्रांचा… वेगवेगळ्या ऐतिहासिक टप्प्यांवर अनेक शोध लागल्यानंतर माणूस प्राण्याने जीवनमान सुधारले. मग तो प्राचीन काळातला आगीचा शोध असो, चाकाचा शोध किंवा अगदी आतापर्यंतचा एकविसाव्या शतकातला इंटरनेटचा शोध असो, अन्यथा डि एन ए हा शोध असो किंवा मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध असो. 

सध्याचा काळ आहे हा अंतराळ युगाचा आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अमेरिकेसारख्या महासत्तेने स्वतःची अशी ‘स्पेस फोर्स’ उभी केली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या काळात एक स्पेस कमांड असावी आणि त्यावर काम व्हावं अशी संकल्पना पुढे आली. 

अमेरिकेला अंतराळ क्षेत्रातला भरपूर अनुभव पाठीशी आहे. आपण अंतराळ युगाकडे आता वाटचाल करत आहोत, असंसुद्धा म्हणायची वेळ आली आहे. आज अमेरिकेची ‘नासा’ (अंतराळ संस्था) जगात एक शक्तिशाली संस्था म्हणून नावारूपाला आली. शिवाय रशियाची अंतराळ संस्था ‘रोसकोसमोस’ सुद्धा ‘६० च्या दशकापासून कार्यरत आहे. (International Space Station)

अमेरिका, रशिया आणि युरोपीय अवकाश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची कल्पना पुढे आली. इथे हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे नुकतच रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने हे अंतराळ स्थानक अमेरिकेच्या हटवादी भूमिकेमुळे पृथ्वीवर पडू शकतं, असं विधान केलं आहे. म्हणून हे अंतराळ स्थानक (International Space Station) आहे तरी काय? हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे. 

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक १९९८ साली अमेरिका, रशिया आणि इतर युरोपीय देशांच्या मदतीने एक अंतराळातला संयुक्त प्रकल्प म्हणून प्रक्षेपित केलं गेलं. अमेरिकन फुटबॉल स्टेडियमच्या आकाराएवढं हे स्थानक मोठं आहे. त्याची लांबी आहे ३५७ फुट. या स्थानकाचं वजन आहे ४१९,७२५ किलोग्राम. 

या स्थानकावर आत्तापर्यंत जगातल्या जवळपास १९ देशांच्या २४० व्यक्तींनी या स्थानकला भेट दिली आहे. तसंच, या स्थानकावर जगातल्या कुठल्याही भागातून ६ तासात पोहोचता येतं. जे वैज्ञानिक प्रयोग पृथ्वीवर करता येत नाहीत, असे प्रयोग या अंतराळ स्थानकावर करण शक्य झालं आहे. (International Space Station)

या स्थानकात एकावेळेस ६ क्रू मेंबर्स राहू शकतात. सगळ्यात गमतीशीर भाग म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंतराळ स्थानक अवकाशात ३५० किलोमीटर उंचीवर आहे. हे स्थानक पृथ्वीभोवती २८,००० किलोमीटर प्रती तासाने परिभ्रमण करत आहे. 

साधारण २४ तासांमध्ये १६ वेळा हे स्थानक पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे. म्हणजे या स्थानकात जो अंतराळवीर असेल त्याला १६ वेळा सूर्योदय दिसेल आणि १६ वेळा सूर्यास्त दिसेल. याचबरोबर या स्थानकाचं वैशिष्ट्य म्हणजे अंदाजे ३००० संशोधनं या स्थानकावर केली गेली आहेत. मग त्यात जीवशास्त्र, खगोलशास्त्र, मानवी संशोधन, तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्र यांचा समावेश आहे. 

====

हे देखील वाचा: जगातलं सगळ्यात अजस्त्र विमान रशिया – यूक्रेन युद्धात नष्ट!

====

अजून एक गमतीशीर भाग म्हणजे अंतराळ स्थानकात पृथ्वीसारखं गुरुत्वाकर्षण नाही, तिथे मायक्रोग्रॅव्हिटी आहे. अंतराळवीरांची तब्येत चांगली राहावी यासाठी त्यांना एका दिवसातून २ तास व्यायाम करावाच लागतो. 

खरं म्हणजे इतकी सगळी माहिती वाचून आपण दमलो असू, तर जी व्यक्ती प्रत्यक्ष अंतराळवीर म्हणून अंतराळ स्थानकात काम करत असेल, त्यांना काय वाटत असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. 

अमेरिकेने रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान निर्बंध लादले आहेत आणि म्हणून त्याचा फटका रशियन कंपन्याना बसतो आहे. या दरम्यान रशियाकडून हे अंतराळ स्थानक पाडण्याच्या पर्यायामुळे जगामध्ये एकच खळबळ माजली आहे. (International Space Station)

====

हे देखील वाचा: प्रचारासाठी डोनाल्ड ट्रंप यांनी घेतला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार

====

नासाकडून हे स्थानक २०३१ मध्ये बंद करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. आता तर परिस्थिती अशी आहे की अमेरिका, रशिया आणि चीन हे आपापले इंटरेस्ट जपण्यासाठी स्वतःचं असं एक अंतराळ स्थानक बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. (चीनला यात यश मिळालं नाही.) 

आपण अंतराळ युगात प्रवेश केला आहे. भारताची (इस्रो) अंतराळ संस्थासुद्धा अंतराळ क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत आहे… कमी खर्चात उत्तम दर्जाचे उपग्रह सोडण्यासाठी म्हणून इस्रोचं नाव आज जगात घेतलं जात आहे. भविष्यात इस्रो अमेरिकेप्रमाणे अंतराळ स्थानक तयार करणार का, हा प्रश्न यानिमित्ताने विचारला  जाऊ शकतो. (International Space Station)

एक मात्र नक्की, एकविसाव्या शतकात अशी अंतराळ स्थानकं म्हणजे मानव जातीसाठी वरदान ठरू शकतात, म्हणूनच हा विज्ञानाचा अविष्कारच आहे, असं आपण म्हणू शकतो. 

-निखिल कासखेडीकर 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.