रुद्र बेव सीरिजच्या दमदार यशानंतर अजय देवगण पुन्हा त्याच्या अगामी नवीन चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. ‘रनवे 34’ असे या चित्रपटाचे नाव असुन चाहत्यानं मध्ये या चित्रपटासाठी कमालीची उत्सुता लागली आहे. आपल्या चाहत्यानां अजुन उत्साहित करण्यासाठी अजयने त्याच्या रेनवे 34 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंह आहेत.
‘रनवे 34’ चित्रपटाचा टीझर तिघांनी आपल्या सोशल मीडिया अंकाऊट शेअर केला आहे. टीझर खूपच चांगला आहे, तुम्हाला त्यात थ्रिलर आणि सस्पेन्स दोन्ही पाहायला मिळणार आहे. टीझर पाहिल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी अजयने ट्रेलरची तारीख ही जाहीर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर 21 मार्चला भेटीला येणार आहे.
वादळात अडकलेल्या विमानाने या टीझरची सुरुवात होते. रकुल आणि अजय विमानात एकत्र बसले आहेत. दोघांना स्पीकरवर आवाज ऐकू येतो, खूप पाऊस पडतोय, काहीच दिसत नाही. त्याचवेळी अजय म्हणतो की, आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. मग अमिताभ बच्चन दिसतात जे म्हणतात की गोष्ट जितक्या वेगाने वर जाते तितक्या वेगाने खाली येते.

चित्रपटात अमिताभ, अजय आणि रकुल प्रीत यांच्याशिवाय बोमन इराणी आणि कॅरी मिनाती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कॅरी मिनाती ही एक लोकप्रिय YouTuber आहे आणि या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
टीझर शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले, ‘सत्य जमिनीपासून 35 हजार फूट उंचीवर लपलेले आहे. रनवे 34 चा टीझर पहा. हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
अजयने चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे
विशेष म्हणजे अजय देवगणने या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली होती. अजयने स्वतः एकदा या चित्रपटाबद्दल सांगितले होते की हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे आणि या कारणांमुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खास आहे. अजय देवगणने दिगदर्शित केलेला हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. या आधी त्याने ‘शिवाय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. शिवाय या चित्रपटानंतर अजयच्या चित्रपटाचे दिग्दर्शनाचे सगळीकडे कौतुक झाले.
====
हे देखाल वाचा: या कारणांमुळे अमिताभ बच्चन झाले कर्जबाजारी – ‘एबीसीएल’ कंपनीच्या अपयशाची कहाणी
====
सलमान खानने चित्रपटाचे टीझर शेअर करुन दिल्या शुभेच्छा
टीझर शेअर करताना सलमान खानने लिहिले की, माझ्याकडे अद्याप कोणताही चित्रपट तयार नाही. मी अजय देवगणला ईदला येण्याची विंनती केली. चला ही ईद साजरी करूया आणि Runway34 पाहूया.
====
हे देखील वाचा: द काश्मीर फाईल्सः काश्मिरी पंडीतांच्या वेदनेची वादग्रस्त कथा…
====
‘हिरोपंती 2′ आणि ‘रनवे 34’ भिडणार एकाच दिवशी
टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’ हा चित्रपटही त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे, ज्या दिवशी रनवे 34 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिरोपंती मध्ये टायगरसोबत तारा सुतारियाही या चित्रपटात आहे. त्यामुळे या दिवशी बॉक्स ऑफिसवर 2 मोठ्या चित्रपटांची टक्कर पाहायला मिळणार.