आजकाल इंस्टाग्राम-फेसबुकवर प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर असते. बहुतांश लोक या प्लॅटफॉर्म्सवर व्हिडिओ-रिल्स तयार करुन प्रसिद्ध होऊ पाहतात. यामधून कमाई सुद्धा केली जाते. मात्र कितीही प्रयत्न केले तरीही तुमच्या रिल्स व्हायरल होत नाहीत का? याच बद्दलच्या खास ट्रिक्स आपण पाहणार आहोत. खरंतर इंस्टाग्रामवर रिल्स टाकतायं हे खरं आहे. पण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे काय करता हे सर्वात महत्त्वाचे आहे. (Instagram Reels)
पुढील टीप्स करा फॉलो
-आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. अशातच तुम्ही त्यांच्यामध्ये राहून वेगळे काय करू शकता हे पहा. म्हणजेच आजकाल गाण्यांचे लिप्सिंग करून काहीही होणार नाही. तुम्हाला त्या गाण्यावर एखादा कंटेट तयार करावा लागेल.
-जेव्हा तुम्ही रिल्स बनवता तेव्हा एक गोष्ट जरुर लक्षात घ्या की, कोणते गाणे ट्रेंन्डिंगमध्ये आहे. जर तुम्ही ट्रेंन्डिंग गाण्याचा वापर करत असाल तर रिल्स अधिक व्हायरल होण्याची शक्यता अधिक असते.
-कोणताही व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी हे जरुर पहा की, व्हिडिओची एचडी क्वालिटी. जर तुमची रिल्स एचडी क्वालिटीची नसेल तर तुम्ही कितीही चांगला कंटेट तयार करा तो अधिक व्हायरल होणार नाही.
-नेहमीच असा टॉपिक निवडा जो लोकांशी रिलेट करु शकतो. म्हणजेच इंन्फोर्मेटिव्ह कंटेट. जेणेकरुन तुमच्या रिल्समधून त्यांना एखाद्या गोष्टीची अधिकाधिक माहिती कळेल.
-दररोज रिल्स पोस्ट करणे शक्य नसेल तर आठवड्यातून चार व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. जी लोक तुम्हाला फॉलो करत आहेत त्यांना तुमचा नवा कंटेट पाहता येईल. तर महिन्यातून अधूनमधूनच पोस्ट करत असाल तर फॉलोअर्सची संख्या वाढली जाणार नाही.
-ट्रेन्डिंग गाण्यासह फिल्टर्सचा वापर करा. व्हिडिओ कॅप्शनकडे लक्ष द्या. रिल्सचे कवर पेज तयार करा. लोकेशन ही टाका. या व्यतिरिक्त फोटो-व्हिडिओ संबंधित काही ट्रेन्डिंग हॅशटॅग ही वापरा.
-प्रत्येक दिवशी काही ना काही शेअर करत रहा. जेणेकरुन फॉलोअर्स तुम्हाला रिप्लाय करतील. अशातच तुम्ही त्यांना स्टोरीमधून काही प्रश्न विचारू शकता किंवा व्हिडिओवर रिअॅक्शन ही मागू शकता. (Instagram Reels)
हेही वाचा- इंस्टाग्रामवर असे तयार करा तुमचे Broadcast channel
-आपल्या फॉलोअर्सला कमेंट-मेसेजचा रिप्लाय जरुर करा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकदा जरुर लाइव्ह या. जेणेकरुन तुमच्या फॉलोअर्ससोबत तुम्हाला बोलता येईल आणि अधिकाधिक लोक लाइव्ह पाहून प्रश्न विचारतील.
