Home » इंस्टाग्रामवर असे तयार करा तुमचे Broadcast channel

इंस्टाग्रामवर असे तयार करा तुमचे Broadcast channel

सोशल मीडियावरील प्रसिद्ध प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम जगभरात वापरले जाते. याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ, रिल्स आणि कंटेट दररोज शेअर करू शकता.

by Team Gajawaja
0 comment
Instagram Broadcast Channel
Share

सोशल मीडियावरील प्रसिद्ध प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम जगभरात वापरले जाते. याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ, रिल्स आणि कंटेट दररोज शेअर करू शकता. हे अगदी फ्री अॅप आहे. व्हॉट्सअॅप प्रमाणेच मेटाने ही काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलचे फिचर लॉन्च केले आहे. जे सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. ब्रॉडकास्ट चॅनल फिचर कंटेट क्रिएटर्स आणि युजर्सला आपल्या फोलोअर्सला मेसेज पाठवण्यासाठी चॅनल बनवण्याचे पॉवरफुल टुल आहे. मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी स्वत: ब्रॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून या फिचरची माहिती दिली होती. (Instagram Broadcast Channel)

खरंतर मेटाने या वर्षीच फेब्रुवारीत अमेरिकात लॉन्च करुन या फिचरची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू अन्य देशांमध्ये रोलआउट केले. आता भारतातील इंस्टाग्राम युजर्सने सुद्धा याची सुरुवात केली आहे. या फिचरच्या मदतीने फॉलोअर्स क्रिएटरच्या अॅक्टिव्हिटीसोबत जोडले जाऊ शकतात. मात्र हे क्रिएटर्स आणि एडमिनला रिप्लाय करू शकत नाहीत.

इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनल हे टेलिग्राम प्रमाणेच काम करते. त्यामुळे टेलिग्राम युजर्सला यामुळे काही समस्या येणार नाहीत. मात्र एखादा इंस्टाग्राम क्रिएटर आपला चॅनल सुरु करेल तेव्हा त्याच्या फॉलोअर्सला एक नोटिफिकेशन जाईल आणि त्यांना सहभागी होण्यासाठी इन्वाइट करेल. मात्र कोणत्याही क्रिएटरला त्या नोटिफिकेशनचे उत्तर देता येणार नाही. मात्र इमोजीच्या माध्यमातून फॉलोअर्सच्या अॅक्टिव्हिटीला फिडबॅक देऊ शकतो. कोणताही युजर क्रिएटरचा कंटेट पाहू शकतो.

कसे तयार कराल ब्रॉडकास्ट चॅनल
इंस्टाग्रामवर ब्रॉडकास्ट चॅनल तयार करणे अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या स्टेप्सनुसार तुम्ही तुमचा ब्रॉडकास्ट चॅनल तयार करू शकता.

-सर्वात प्रथम तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट सुरु करा. खास गोष्ट अशी की, तुमचे इंस्टाग्राम अपडेट असावे
-फिडवर डाव्या बाजूला मेसेज आयकॉनवर टॅप करा आणि DM सुरु करा
-आता त्यावर डाव्या बाजूला टॅप करा
-असे केल्यानंतर ब्रॉडकास्ट चॅनल तयार करण्यावर टॅप करा
-आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला नाव द्या, प्रोफाइल पेजला सेट केल्यानंतर ब्रॉडकास्ट चॅनलवर टॅप करा आणि आपल्या चॅनलसाठी ऑडियन्स निवडा (Instagram Broadcast Channel)

हेही वाचा- इंटरनेट डिवाइसमध्ये सॉफ्टवेअर अपडेटेड ‘या’ कारणास्तव गरजेचे

आपल्या चॅनलवर ऑडियंन्सला इन्वाइट करण्यासाठी तुम्ही लिंक सुद्धा तयार आणि रिक्रिएट करू शकता. याच्या माध्यमातून ही तुम्ही फोलॉअर्सला अपडेट देऊ शकता. या व्यतिरिक्त आता सर्व कंटेट क्रिएटर्स या ब्रॉडकास्ट चॅनलचा वापर करत आहेतच. पण त्याचसोबत ते आपल्याबद्दलचे प्रत्येक अपडेट्स ही शेअर करण्यास विसरत नाहीत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.