जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये लोक वेगवेगळ्या परंपरा आणि चालीरीतींचे पालन करतात. धर्मानुसार लोक परंपरा आणि श्रद्धा जपतात. काही समाजातील लोकांच्या अशा परंपरा असतात, ज्या जगातील इतर लोकांसाठी खूप विचित्र असतात. (children becomes tree)
आज आम्ही तुम्हाला इंडोनेशियातील एका अशा समुदायाविषयी सांगणार आहोत, जिथे लहान मुलाच्या मृत्यूनंतर लोक त्याचा मृतदेह झाडाच्या खोडामध्ये पुरतात. होय, एखाद्याचे मूल मरण पावले तर झाडाचे खोड पोकळ करून त्यात त्याला पुरायचे, अशी येथील लोकांची परंपरा आहे. या अनोख्या परंपरेबद्दल जाणून घेऊया. (children becomes tree)

काय आहे ही निराळी परंपरा?
लहान मुले आणि वृद्ध यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व धर्म आणि जमातींमध्ये वेगवेगळे नियम आहेत. काही समाजात लहान मुलाचा मृतदेह जमिनीत खड्डा खणून पुरला जातो, तर कोणी जाळतात. इंडोनेशियातील ताना तारोजामध्ये या विचित्र परंपरेला खूप मानले जाते. येथे मुलाचा मृतदेह झाडामध्ये पोकळी निर्माण करून त्यात पुरला जातो. (children becomes tree)

झाडाच्या आत दफन केले जातात मृतदेह
इंडोनेशियाच्या मकासरपासून १८६ मैल दूर असलेल्या ताना तरोजामध्ये लोक शतकानुशतके ही परंपरा पाळत आले आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर येथील लोक ही अनोखी पद्धत अवलंबतात. झाडाचे खोड आतून पोकळ करून त्यात जागा बनवली जाते. यानंतर मृतदेह कापडात गुंडाळून झाडाच्या पोकळ खोडात टाकला जातो. हळूहळू मृतदेह नैसर्गिकरित्या झाडाचा एक भाग बनतो. (children becomes tree)
हे देखील वाचा: विचित्र हॉटेल! ना भिंत ना छत, फक्त ‘यासाठी’ लोक देतात पैसे
मूल नेहमी राहते सोबत
या परंपरेबद्दल स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे मूल आता राहिले नाही. परंतु ते नेहमी त्यांच्यासोबत झाडाच्या रूपात असेल जिवंत असेल. ज्या झाडात मुलाचा मृतदेह पुरला जातो, त्या झाडाची देखभाल कुटुंबीय करतात. त्यांचा असा विश्वास आहे की, त्यांचे मूल नेहमी झाडाच्या रूपात पालकांसोबत राहते. (children becomes tree)