तुम्हाला काही वर्षांपूर्वी ऋतिक रोशनचा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा सिनेमा आठवत असेलच. अतिशय सुंदर असा हा सिनेमा म्हणजे तीन मित्रांची गोष्ट. या सिनेमाने आपल्याला आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शिकवल्या, मात्र यातही एक सर्वात जास्त हायलाइट झालेली एक गोष्ट म्हणजे ‘हे मिळालेले आयुष्य आपल्याला पुन्हा मिळणार नाही’ त्यामुळे जे काय करायचे ते आजच करून घ्या सर्व अनुभव घ्या आणि आयुष्य मनमुराद जगा. कोणत्याही इच्छा अपुऱ्या ठेऊ नका. (Skydiving)
याच सिनेमातून एक साहसी खेळ कमालीचा प्रसिद्धीच्या झोतात आला आणि तो म्हणजे Skydiving. Skydiving म्हणजे काय तर विमानातून जमिनीवर उडी मारणे. आजच्या काळात Skydiving माहित नाही असे अगदी बोटावर मोजण्याइतके लोकं असतील. Skydiving साठी सध्या सर्वच वयोगटातील लोकांमध्ये खूपच क्रेझ पाहायला मिळत आहे. पूर्वी भारताबाहेर होणारी Skydiving आता भारतात देखील सहज होताना दिसते. (Marathi News)
अनेक लोकांना आयुष्यात नेहमीच काहीतरी साहसी करायचे असते. ते सतत काहींना काही साहसी खेळ खेळताना दिसतात. या साहसी खेळांमध्ये रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि स्कूबा डायव्हिंग अशा अनेक खेळांचा समावेश होतो. यातलाच एक कमालीचा ट्रेंडिंग साहसी खेळ म्हणजे स्कायडायव्हिंग! जरा भीतीदायक मात्र कमालच वसमरणीय अनुभव देणारी ही एक साहसी ऍक्टिव्हिटी आहे. यामध्ये लोकं हार्नेसच्या मदतीने विमानातून हवेत झेप घेतात. (Top Stories)
या Skydiving साठी साधारण २० ते २५ हजार खर्च येतो. जर तुम्हाला नक्कीच हे करायचे असेल तर हा सुख अनुभव एकदा घ्याच.आयुष्यात तुम्हाला जर या अविस्मरणीय खेळाचा अनुभव घ्यायचा असेल तर भारताबाहेर जायची गरज नाही. आता तर Skydiving भारतात देखील अनेक ठिकाणी सुरु झाले आहे. भारतातील अनेक पर्यटन ठिकाणी हे Skydiving सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जाऊन नक्कीच या Skydiving ऍक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता. मग जाणून घ्या भारतात नक्की कुठे कुठे Skydiving होते. (Marathi Latest News)
पाँडिचेरी
जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर स्काय डायव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल तर पाँडिचेरी हे उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला समुद्राच्या नेत्रदीपक दृश्यांना बघत स्काय डायव्हिंगचा अनुभव घेता येतो. ज्यांना निसर्गासोबतच ॲडव्हेंचरचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे. तुम्ही वर्षातले नोव्हेंबर ते मार्च पर्यंत येथे जाऊ शकता. येथे तुम्ही १० हजार फूट उंचीवर स्काय डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतात. (Top Marathi News)
बिर बिलिंग
हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग हे ठिकाण भारताची पॅराग्लायडिंग राजधानी म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण स्काय डायव्हिंगसोबतच इतर अनेक ॲडव्हेंचरच्या खेळांसाठी प्रसिद्ध आहे.
हैदराबाद
भारतातील प्रसिद्ध शहर म्हणजे हैदराबाद. हे भारतातील सर्वात मोठे शहर आणि आयटी हब म्हणून सगळ्यांनाच माहित आहे. मात्र यासोबतच हैदराबादची एक नवीन ओळख म्हणजे, स्कायडायव्हिंग. संपूर्ण भारतात स्कायडायव्हिंगसाठीचे हैद्राबाद एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे तुम्ही नागार्जुन सागर विमानतळावर स्कायडायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. टँडम जंपिंगसाठी हे उत्तम ठिकाण आहे. हैदराबादमध्ये, सुमारे १०-१२ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग जंप केले जाते. यासाठी आधी पर्यटकांना स्कायडायव्हिंगचे ट्रेनिंग देखील दिले जाते. (Top Marathi Headline)
डीसा
डीसा शहर तलावाच्या काठावर वसलेले आहे. हे गुजरातमधील एक शहर आहे. गुजरात क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय पॅराशूटिंग फेडरेशन येथे अनेक स्काय डायव्हिंग कॅम्प आयोजित केले जातात. मात्र इथे स्काय डायव्हिंग करण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करावे लागतात.
अॅम्बी व्हॅली
जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्ही अॅम्बी व्हॅलीमध्ये स्काय डायव्हिंग करू शकता. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे अम्बी व्हॅलीमध्ये तुम्हाला १० हजार फूट उंचीवरून टँडम उडी मारली जाते. येथे उडी मारताना, दोन लोक एकत्र डायव्हिंग करतात आणि संपूर्ण वेळ एकमेकांशी बांधलेले राहतात.
मैसूर स्कायडायव्हिंग
म्हैसूर हे कर्नाटकातील एक सुंदर ठिकाण आहे येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात. इथे तुम्हाला स्कायडायव्हिंगचा देखील आता अनुभव घेता येतो. म्हैसूरमध्ये प्रथम स्कायडायव्हिंगचे ट्रेनिंग दिले जाते आणि त्यांनतर सुमारे १० हजार फूट उंचीवरून उडी मारली जाते. (Social Updates)