देशात आणि जगात काही अशा परंपरा आहेत त्याबद्दल चर्चा, वाद आणि टीका केल्या जातात. काही वेळेस लग्नापूर्वी मुलीचे किंवा मुलाचे झाडासोबत लग्न, काही जण तर आपल्याला मामाची मुलगी-मुलासोबत लग्न केल्यानंतर त्याबद्दल जोरदार चर्चा केली जाते. सामान्य आयुष्यात महिला आणि पुरुषांसाठी सुद्धा बनवण्यात आलेल्या काही परंपरा या जगभरात प्रचलित आहेत. मात्र भारतात असे एक गाव आहे जेथे महिला आणि पुरुषांसाठी एक विचित्रच प्रथा आहे. (Indian Village Tradition)
हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटातील पिणी गावात वर्षानुवर्ष चालत आलेल्या एका परंपरेनुसार आज ही तेथील महिला कपडे घालत नाहीत. तर पुरुषांसाठी सुद्धा या गावात कठोर परंपरा आहे. ज्याचे पालन करणे त्यांना करणे ही अनिवार्य आहे. परंपरेअंतर्गत महिलांचे ५ दिवस असतात की, त्या एक ही कापड अंगावर घालू शकत नाहीत. तर पुरुष मंडळी दारु आणि भांगचे सेवन करु शकत नाहीत.
आजही का पाळली जाते ही परंपरा?
पिणी गावात या परंपरेमागील इतिहास फार रंजक आहे. दरम्यान, आता या खास ५ दिवशी बहुतांश महिला घरातून बाहेर पडत नाहीत. मात्र काही महिला आपल्या इच्छेमुळे आज सुद्धा ही परंपरा मानतात. पिणी गावात महिला प्रत्येक महिन्यात श्रावण महिन्यात ५ दिवस कपडे घालत नाही. असे म्हटले जाते की, या परंपरेचे पालन न करणाऱ्या महिलांना काही दिवसानंतर एखादी वाईट बातमी ऐकायला मिळते. याच दरम्यान, संपूर्ण गावात पती-पत्नी एकमेकांशी बोलत ही नाहीत. ऐवढेच नव्हे ते दोघे एकमेकांपासून दूर रहातात.
पुरुषांनी परंपरेचे पालन केले नाही तर काय?
पुरुषांना सुद्धा या परंपरेचे पालन करणे गरजेचे मानले जाते. दरम्यान, त्यांचे नियम काही वेगळे असतात. पुरुषांना श्रावणाच्या या पाच दिवसात दारु आणि मांसचे सेवन केले जात नाही. असे म्हटले जाते की, जर एखाद्या पुरुषाने ही परंपरा पाळली नाही तर देव नाराज होतात आणि त्यांचे नुकसान होते. या दोन्ही परंपरा पालन करण्यामागे एक रोचक कथा सुद्धा आहे.
काय आहे परंपरेमागील कथा?
असे म्हटले जाते की, काही वर्षांपूर्वी पिणी गावात राक्षसांचे राज होते. त्यानंतर लाहुआ घोंड नावाच्या एक देवता पिणी गावात आले. देवाने राक्षसांचा वध केला आणि पिणी गावाला त्यांच्यापासून बचावले. असे सांगितले जाते की, सर्व राक्षस गावातील सजलेल्या आणि सुंदर महिलांना घेऊन जायचे. देवतांनी राक्षसांचा वध करुन महिलांना बचावले. यानंतर देवता आणि राक्षस यांच्यामध्ये ५ दिवसापर्यंत महिलांनी कपडे न घालण्याची परंपरा चालत आली आहे. असे मानले जाते की, जर महिला कपड्यांमध्ये सुंदर दिसत असतील तर राक्षस आजही त्यांना घेऊन जातील. (Indian Village Tradition)
हे देखील वाचा- सोन्याची जीभ आणि हृदय असलेल्या Mummy च्या रहस्यमय गोष्टी
नवरा-बायको हसू सुद्धा शकत नाहीत
श्रावणाच्या या पाच दिवसात नवरा आणि बायको एकमेकांकडे पाहून हसू सुद्धा शकत नाहीत. परंपरेनुसार, दोघांवर यासाठी बंदी असते. महिला या दरम्यान, केवळ एक वस्र घालू शकतात. ही परंपरा मानणाऱ्या पिणी गावातील महिला लोकरीपासून बनवलेले एक वस्र घालू शकते. पिणी गावातील लोक या दरम्यान, बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश करु ही देत नाहीत. ऐवढेच नव्हे तर बाहेरील लोक त्यांच्या या खास सणात भाग ही घेऊ शकत नाहीत.